शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
6
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
7
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
8
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
9
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
10
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
11
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
12
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
13
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
14
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
15
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
16
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
17
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
18
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
19
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
20
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
Daily Top 2Weekly Top 5

दोन दिवसात चार हाणामाऱ्या

By admin | Updated: March 11, 2015 00:12 IST

पोलीस कारवाई शून्य : सावंतवाडीत चाललंय तरी काय?

सावंतवाडी : सावंतवाडीत चाललंय तरी काय? असा सवाल नागरिक विचारायला लागले आहेत. दोन दिवसात तब्बल चार हाणामाऱ्या होऊनसुध्दा यातील एकाही घटनेची नोंद पोलीस ठाण्यात नाही. मात्र, ज्या ठिकाणी घटना घडल्या, तेथे पोलीस हजर असल्याचे प्रत्यक्षदर्शी नागरिकांनी सांगितले. या हाणामारीत तीन ते चार जण जखमी झाले आहेत. शेवटची हाणामारी सोमवारी मध्यरात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास सावंतवाडीत घडली. याचा विस्तव मंगळवारी दिवसभर शहरात धुमसत होता.सावंतवाडी हे शांत शहर म्हणून जिल्ह्यात सर्वत्र परिचित आहेत. त्यामुळे अनेक पर्यटक तसेच शासकीय अधिकारी हे सर्वात प्रथम सावंतवाडीलाच पसंती देतात. पण याच शांत शहराची शांतता ऐन होळीच्या सणासुदीत धोक्यात आली आहे. याला कारण एकच, ते म्हणजे सावंतवाडीवाडीत गेल्या दोन दिवसात घडलेल्या वेगवेगळ्या हाणामारींच्या घटना. यामुळे शहराची शांतता धोक्यात आली आहे.रविवारी सायंकाळी सावंतवाडी शहरानजीक माजगाव येथे दोन गटात जोरदार हाणामारी झाली. या हाणामारीत तीन ते चार जणांना चांगलाच चोप देण्यात आला. या घटनेची कुणकुण पोलिसांना लागताच पोलिसांनी माजगाव नाला गाठला आणि प्रकरण मिटवले. परंतु अशा घटनेची पुनरावृत्ती टाळण्यासाठी प्रतिबंधात्मक कोणतीच कारवाई करण्यात आली नसल्याने हा वाद अजूनही धुमसत आहे.माजगावचे प्रकरण शमते ना शमते, तोच सोमवारी दुपारी सावंतवाडीतील संचयनी परिसरात दोन गटात तुफान हाणामारी झाली. यात एका युवकाच्या डोक्यालाही गंभीर दुखापत झाली असून त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार करण्यात आले. या हाणामारीची धगधग संपूर्ण शहरात सुरू असताना पुन्हा सायंकाळी संचयनी परिसरातच तुफान हाणामारी झाली. यात दुपारी युवकाला झालेल्या मारहाणीबाबत जाब विचारण्यासाठी दुसरा गट आमने-सामने आला होता. यावेळी दुपारच्या हाणामारीत सहभागी असलेल्या दुसऱ्या गटाला बेदम चोप देण्यात आला. हा प्रकार सायंकाळी ८ वाजल्यापासून ९ वाजेपर्यंत म्हणजेच तब्बल एक तास सुरू होता.तासाभरानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. तोपर्यंत संचयनी परिसराला मोर्चाचे स्वरूप आले होते. अनेक दुचाकी, वाहने रस्त्यावर उभी होती. बाहेरून येणाऱ्या-जाणाऱ्यांना रस्ताही शिल्लक नव्हता. पोलीस घटनास्थळी दाखल झाल्यानंतर वाहने बाजूला करण्यात आली. तसेच शंभर ते दीडशे युवकांचा जमाव तेथून निघून गेला. मात्र, पोलिसांनी एकाही युवकाला चौकशीसाठी ताब्यात घेतले नाही, हे विशेष. दरम्यान, सोमवारी घडलेल्या दोन्ही घटनांमधील युवकांना पोलिसांनी कोणताही जाब विचारला नसल्याने त्याचीच पुनरावृत्ती रात्री १ च्या सुमारास शहरात घडली. या घटनेतही रात्रीच्या सुमारास घडलेल्या घटनेतील युवकाला दुसऱ्या गटाने मारहाण केली म्हणून त्याला घरात जाऊन मारहाण करण्यात आली. या घटनांमुळे शहरात अशांतता पसरली आहे. (प्रतिनिधी)तक्रार देण्यास कोण पुढे येत नाहीसावंतवाडीत हाणामाऱ्या झाल्या, हे खरे आहे. आम्ही पोलीसही घटनास्थळी पाठवले. पण कोणीही तक्रार देण्यास पुढे येत नाही. मग पोलीस यंत्रणा तरी काय करेल? तरीही आम्ही खबरदारी घेऊ.- रणजीत देसाई, पोलीस निरीक्षक