शहरं
Join us  
Trending Stories
1
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
2
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
3
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
4
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
5
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
6
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
7
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
8
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
9
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
10
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
11
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
12
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
13
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
14
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
15
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
16
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
17
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
18
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
19
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
20
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

अरबी समुद्रात वादळसदृश स्थिती

By admin | Updated: April 5, 2015 00:52 IST

मच्छिमारी ठप्प : मुंबई, गुजरातमधील नौका देवगड बंदरात

पुरळ (ता.देवगड) : अरबी समुद्रामध्ये उत्तरेकडील वाऱ्याचा जोर वाढून वादळसदृश परिस्थिती निर्माण झाल्याने मुंबई, गुजरात भागातील मच्छिमार नौका देवगड बंदरात दाखल झाल्या आहेत. यामुळे मच्छिमारी व्यवसाय ठप्प झाला आहे. अचानक उत्तरेकडील वाऱ्यांचा जोर समुद्रामध्ये वाढून वादळ परिस्थिती निर्माण झाल्याने संपूर्ण कोकण किनारपट्टी भागातील नौका त्या-त्या बंदरांमध्ये सुरक्षित ठिकाणी दाखल झाल्या आहेत. देवगड बंदरामध्ये मुंबई, गुजरातमधील बऱ्याचशा नौका सुरक्षिततेसाठी दाखल झाल्या आहेत. स्थानिक नौकांनीही देवगड बंदरामध्ये आश्रय घेतला आहे. यावर्षी मत्स्य व्यवसायावर दुष्काळ ओढवला असतानाच समुद्रामध्ये वादळी वारे वाहून मत्स्य व्यावसायिकांच्या समस्या वाढत आहेत. (वार्ताहर) आचऱ्यात घरावर झाड पडून नुकसान आचरा परिसरात गेले दोन दिवस जोरदार वारा सुटल्याने आचरा-गाऊडवाडी येथील जॉनिता फर्नांडीस यांच्या घराच्या मागील बाजूस पडवीवर शनिवारी सकाळच्या सुमारास माडाचे झाड कोसळले. पडवीच्या छपरावरील कौले, वासे, टीव्हीची डिश मोडून दोन हजार रुपयांचे नुकसान झाले. मात्र, सुदैवाने जीवितहानी झाली नाही. याबाबतची माहिती मिळताच आचरा तलाठी मुंबरकर, पोलीस पाटील जगन्नाथ जोशी, ग्रामसेवक संतोष गावडे यांनी घटनास्थळी जाऊन नुकसानीबाबत पंचनामा केला.