शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

विकासाच्या मुद्द्यावर निवडणुका लढणार

By admin | Updated: October 6, 2015 23:39 IST

नीलेश राणे : निवडणूक तयारीचा घेतला आढावा

मंडणगड : मंडणगड शहराच्या विकासाचा अजेंडा घेऊन काँग्रेस नगरपंचायत निवडणुका लढणार असल्याचे मत माजी खासदार नीलेश राणे यांनी केले़ प्रदेश काँग्रेस पार्टीच्या नगरपंचायत निवडणूक तयारीचा आढावा घेण्यासाठी मंगळवारी मंडणगड दौऱ्यावर ते आले होते़ येथील शासकीय विश्रागृहात आयोजित पत्रकार परिषदेत पक्षाची निवडणुकीसंदर्भातील भूमिका मांडताना राणे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीसोबत नगरपंचायत निवडणुकीदरम्यान आघाडी व्हावी यासाठी दोन्ही बाजूंकडून सकारात्मक चर्चा सुरु असल्याचे स्पष्ट केले. पण याचबरोबर आघाडी न झाल्यास पूर्ण १७ जागांवर उमेदवार उभे करणार असल्याचेही सांगितले. यावेळी त्यांनी आघाडी करताना मित्रपक्षाबरोबरील सन्मानपूर्वक जागा वाटपातील तोडग्यानंतर आघाडीची घोषणा करण्यात येणार असल्याचे सांगितले. काँग्रेसने आतापर्यंत मंडणगडच्या विकासासाठी प्रामाणिक प्रयत्न केले आहेत आणि भविष्यातही प्रयत्न करणार आहे. हा मुद्दा घेऊनच ही निवडणूक लढवली जाईल, असे नीलेश राणे म्हणाले.कोणावरही टीका न करता शहराचा विकास हाच आपला अजेंडा असणार आहे, त्यासाठी नागरिकांशी जनसंपर्क अधिक असणारेच उमेदवार असणार आहेत. भाजप - सेना युतीस राज्यासह शहरात सध्या अंतर्गत वादामुळे अत्यंत प्रतिकुल वातावरण असल्याने युतीच्या कारभारच्या विरोधात जनतेच्या मनात असलेला राग आगामी निवडणुकांत पूर्ण राज्यात विरोधी मतदानाच्या रुपाने व्यक्त होणार आहे.यावेळी राणे यांनी तालुक्यातील सर्व कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. यानंतर उमेदवारांशी निवडणुकांसंबधी सविस्तर चर्चा केली़ यावेळी तालुकाध्यक्ष मुश्ताक मिरकर, जिल्हा परिषद सदस्या अस्मिता केंद्रे, अशोक कोकाटे, तालुका सरचिटणीस संतोष मांढरे, मधुकर दळवी, राजाराम लेंडे, समंद मांडलेकर, प्रबोध कोकाटे, रघुनाथ देवरुखकर, राहूल अनिल कलमकर, राहूल कोकाटे, कादीर बुरोंडकर यांच्यासह काँग्रेसचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते़. (प्रतिनिधी)राजकीय हालचालींना वेगमंडणगड शहरात सध्या राजकीय हालचालींना वेग आला आहे. सर्वच पक्षांनी ही नगरपंचायतीची निवडणूक प्रतिष्ठेची केली असून, काँग्रेस राष्ट्रवादीसह शिवसेना भाजपनेही आपली प्रतिष्ठा पणाला लावली आहे. युती आणि आघाडी करण्याकडे चारही पक्षांचा कल आहे. त्यामुळे भविष्यात काय घडणार? याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे. इतर पक्षही या पहिल्या निवडणुकीत उतरणार आहेत.