शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

पावसासह वन्यप्राण्यांचा धुडगूस

By admin | Updated: October 21, 2015 21:52 IST

भात कापणीचा हंगाम : कडावल-हिर्लोक परिसरातील शेतकरी चिंतेत

सुरेश बागवे -कडावल व हिर्लोक परिसरात खरीप भात कापणीस सुरूवात झाली आहे. मात्र, पाऊस व वन्य प्राण्यांच्या उपद्रवामुळे शेतकरी संकटात सापडले असून, अंतिम टप्प्यात आलेली शेती कशी वाचवायची, असा प्रश्न त्यांना पडला आहे. हिर्लोक येथील आपट्याची मळी, सतीचा उचवळा, भिकेडोंगरी, दासशेळ भागातील शेती गवे व वनगार्इंनी उद्ध्वस्त केली आहेत. त्यामुळे शेतकरी चिंतेत सापडला आहे. निसर्गाच्या दृष्टचक्राचा फटका यंदा शेतकऱ्यांना हंगामाच्या सुरूवातीपासूनच बसत आहे. तरवा लावणीच्यावेळी गरज असताना पाऊस गायब झाला. आता भातकापणीवेळी पावसाने हजेरी लावली आहे. त्यातच वन्य प्राण्यांनीही धुडगूस घालायला सुरूवात केली आहे. पावसाचे अरिष्ट आणि वन्य प्राण्यांचा उपद्रव अशा दुहेरी अडचणीत कडावल परिसरातील शेतकरी सापडला आहे. परिसरात हळव्या जातीचे काही वाण गणेशोत्सव कालावधीतच कापणीयोग्य झाले होते. मात्र, गणेशोत्सव व त्यानंतर म्हाळवसाच्या धामधुमीमुळे शेतकऱ्यांना भातकापणीचा मुहूर्त करता आला नाही. आता काही प्रमाणात भातकापणीस सुरूवात झाली असली, तरी पावसामुळे शेतकरी मेटाकुटीला आले आहेत. पावसामुळे भातकापणीत वारंवार अडथळा येत आहे. याचा परिणाम भात उत्पादन व वैरण उत्पादनावर होणार आहे. भातलावणीनंतर कडावल व हिर्लोक पंचक्रोशीतील अनेक गावांमध्ये गवे व वनगार्इंनी शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले होते आणि आता भात कापणी हंगामातही हा उच्छाद सुरूच आहे. येथील आपट्याची मळी, सतीचा उचवळा, भिकेडोंगरी, दासशेळ भागातील शेती गवे व वनगाईनी उद्ध्वस्त केली असून, दत्ताराम बागवे, सीताराम सावंत, एकनाथ बागवे, प्रदीप साटम, सुवर्णा साटम तसेच इतर शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. वन्यप्राण्यांच्या उपद्रवाने शेतकरी हैराणशेतीवर पावसाचे संकट कायम असतानाच दुसरीकडे वन्यप्राण्यांच्या उपद्रवामुळे शेतकऱ्यांची पाचावर धारण बसली आहे. कडावल परिसरातील कडावल, आवळेगाव, पांग्रड, निरूखे आदी तर हिर्लोक पंचक्रोशीमधील किनळोस, हिर्लोक, कुसगाव, गिरगाव, नारूर, रांगणातुळसुली व निवजे आदी गावांमध्ये गवे व वनगार्इंचा उपद्रव वाढला आहे. हंगामाच्या पहिल्या टप्प्यापासून म्हणजे तरवा लावणीपासून हंगामाच्या अंतिम टप्प्यापर्यंत वन्य प्राण्यांचा उपद्रव येथील शेतकऱ्यांना सहन करावा लागत आहे.शेतकरी निसर्गाच्या दृष्टचक्रात अडकलायंदा निसर्गाच्या दृष्टचक्राचा फटका शेतकऱ्यांना हंगामाच्या सुरूवातीपासून बसत आहे. गरज असतेवेळी पाऊस गायब झाला. आता भातकापणीच्या हंगामात पावसाने पुन्हा हजेरी लावली आहे. त्यातच वन्यप्राण्यांनीही धुडगूस घालायला सुरूवात केली आहे. त्यामुळे शेतकरी संकटात सापडले असून, शेती वाचवायची कशी, या विवंचनेत सापडले आहेत.