शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
3
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाद यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
6
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
7
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
8
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
9
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
10
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
11
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
12
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
13
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
14
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
15
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
16
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
17
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
18
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
19
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
20
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
Daily Top 2Weekly Top 5

राणेंना रेडीपोर्टचा पुळका कशासाठी : काळसेकर

By admin | Updated: June 27, 2015 00:17 IST

चौपदरीकरणाचा आराखडा २०११ मध्ये मंजूर होऊनही एकही काम राणे करू शकले नाहीत. इंदापूर-पळस्पे या टप्प्यासाठी राज्यशासन निधी देऊ शकले नाही. मात्र,

कणकवली : गेल्या सहा वर्षांत एक पैशाचा विकास न करणाऱ्या आणि कोट्यवधींचा महसूल बुडविणाऱ्या जॉन अर्नेस्ट कंपनीचा माजी पालकमंत्री नारायण राणे यांना पुळका येण्यामागे कारण काय? पोर्ट व्यवहारातील मलिदा कोणी खाल्ला आहे? असे प्रश्न उपस्थित करीत राणेंचे आरोप निराधार असून, सत्तेपासून दूर गेल्याने त्यांची तगमग बाहेर पडली आहे, अशी टीका भाजपचे जिल्हाध्यक्ष अतुल काळसेकर यांनी येथील पत्रकार परिषदेत केली. विकासाचे प्रकल्प बंद होत असल्याचे सांगून राणे यांनी भाजपच्या मंत्र्यांवर टीका केल्यासंदर्भात काळसेकर बोलत होते. रेडी बंदर जॉन अर्नेस्ट कंपनीला नारायण राणे यांनी शासनाचा कोट्यवधींचा महसूल बुडवून दिले. गेल्या सहा वर्षांत बंदरातून कोट्यवधींचे खनिज निर्यात झाले आणि कोट्यवधींच्या शुल्काला सरकार मुकले. राणे कुटुंबीयांकडूनच मडुरा की मळगाव असा रेल्वेस्थानकांचा वाद घातला गेला. भाजप सरकारने प्रकल्प लवकर सुरू करण्यावर भर देत कामाला सुरुवात केली. विकासाला चालना देणाऱ्या या प्रकल्पाचे श्रेय भाजप शासनाचेच आहे, असे काळसेकर म्हणाले.‘फोर सी’ प्रकारातील चिपी विमानतळाच्या ३४५० मीटर धावपट्टीचे काम ९० टक्के पूर्ण झाले आहे. दहाही इमारती पूर्ण झाल्या असून, पार्किंग सुविधेचे काम वेगाने होत आहे. प्रकल्पासाठी आवश्यक सर्व २७२ हेक्टर जमीन वर्ग करण्यात आली आहे. नारायण राणे यांनी पेन्सिलने नोंद केलेल्या जागेचा विचार करू नये. या विमानतळावर ४० टनांची बोर्इंग विमाने उतरू शकतात. चौपदरीकरणाचा आराखडा २०११ मध्ये मंजूर होऊनही एकही काम राणे करू शकले नाहीत. इंदापूर-पळस्पे या टप्प्यासाठी राज्यशासन निधी देऊ शकले नाही. मात्र, भाजप शासन सत्तेवर येताच सहा महिन्यांच्या आत पुलांची कामे सुरू झाली. भूसंपादनाची जमीन मोजणी ८० टक्के सुरू झाली आहे. सी-वर्ल्ड प्रकल्पाचे खरे नुकसान तडिपारीची भाषा करून राणेंनी केले. राणेंच्या वक्तव्यानंतर ग्रामस्थ प्रकल्पाच्या विरोधात गेले. मुख्यमंत्री फडणवीस यांनी जास्तीची जमीन परत करण्याची ग्वाही दिल्यानंतर प्रकल्पाचे वाटोळे होताना वाचले. कॉँग्रेस-राष्ट्रवादीच्या सत्ताकाळात ३८ वर्षे रखडलेल्या तिलारी धरणग्रस्तांचे प्रश्न सुटू शकले नव्हते. गोवा भाजप सरकारने ३८ कोटी रुपये वर्ग केले. महाराष्ट्राचे १२ कोटी रुपये देण्याच्या प्रस्तावावर भाजपचे जलसंपदामंत्री गिरीश बापट यांनी सही केली असून, १२०० लाभार्थ्यांसाठी ५० कोटी रुपये मिळणार आहेत. राणे हा निधी आणू शकले नाहीत, असे काळसेकर यांनी सांगितले. यावेळी राजू राऊळ, राजश्री धुमाळे, प्रभाकर सावंत, आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)