शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
2
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
3
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
4
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
5
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
6
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
7
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
8
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
9
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
10
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
11
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
12
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
13
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
14
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
15
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
16
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
17
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
18
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
19
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
20
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
Daily Top 2Weekly Top 5

सावंतवाडी ‘अर्बन’ची निवडणूक का नाही?

By admin | Updated: June 22, 2016 00:14 IST

प्रशासक नेमा : स्वराज्य संघटनेचा सवाल, उपनिबंधकांना निवेदन

सावंतवाडी : सावंतवाडी अर्बन बँकेच्या संचालक मंडळाची पाच वर्षांची मुदत संपली असून बँकेची निवडणूक घ्या, अन्यथा बँकेवर प्रशासक नेमा, अशी मागणी स्वराज्य संघटनेने केली आहे. तसेच १७ पैकी ८ संचालकांनी राजीनामे दिले असतानाही बँकेचे निर्णय कसे काय घेतले जातात, असा सवालही यावेळी स्वराज्य संघटनेने विचारला आहे. त्यांनी याबाबतचे निवेदन उपनिबंधक यांनाही दिले आहे.शासन निर्णयानुसार व धोरणानुसार सहकारी बँकांच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुका या मुदतीत घेणे बंधनकारक आहे. मात्र, बँकेची मुदत संपली असतानाही निवडणूक न घेणे योग्य नाही. संचालकांना मुदतवाढ देण्याबाबत कोणताही निर्णय शासनपातळीवर घेण्यात आला नाही. त्यामुळे महाराष्ट्र शासनाच्या सहकारी संस्था अधिनियमातील तरतुदीनुसार संचालक मंडळांची पाच वर्षे मुदत संपल्यानंतर तत्काळ या बँकेवर प्रशासक नेमणे गरजेचे असतानाही अद्यापपर्यंत प्रशासक नेमण्यात आला नाही. हे योग्य नाही, असेही यावेळी स्वराज्य संघटनेने स्पष्ट केले.सावंतवाडी अर्बन को-आॅपरेटीव्ह बँकेत सुमारे १७ संचालक पाच वर्षांसाठी निवडून देण्यात आले. मात्र, यातील ८ संचालकांनी तर अवघी दोन वर्षे होताच आपले राजीनामे दिले आहेत. तर चार संचालक बँकेच्या कामकाजात सहभागीच होत नाहीत. त्यामुळे बँकेच्या प्रगतीचे निर्णय अवघे पाच संचालक घेतात. ते कोणते निर्णय घेतात ते १२ संचालकांना माहिती नाही. त्यामुळे भविष्यात सावंतवाडी अर्बन को-आॅपरेटीव्ह बँकेच्या प्रगतीसाठी निवडणुका होणे बंधनकारक आहे. अन्यथा बँकेवर प्रशासक तरी नेमला जावा, अशा मागणीचे निवेदन स्वराज्य संघटनेचे अध्यक्ष अमोल साटेलकर, सुनिल पेडणेकर, अ‍ॅड. प्रसाद कासकर, एल. एस. निचम यांनी उपनिबंधक ओरोस यांच्याकडे दिले आहे. (प्रतिनिधी)आमचा प्रस्ताव निबंधक कार्यालयाकडे : पास्तेअर्बन बँकेच्या संचालक मंडळाला पाच वर्षे पूर्ण झाली आहेत. आम्ही याबाबत निबंधक कार्यालयाला कळविले असून, त्यांनी निवडणुकीबाबत पत्रव्यवहारही केला आहे. आता सर्वस्वी निर्णय हा निबंधक कार्यालयाचा आहे. आमचा त्यांच्याशी कोणताही संबंध नाही. आमच्यामुळे निवडणूक होत नाही, हे म्हणणे चुकीचे आहे. असे मत बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिनेश पास्ते यांनी व्यक्त केले.