शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
5
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
8
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
9
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
10
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
11
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
12
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
13
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
14
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
15
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
16
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
17
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
18
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
19
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
20
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
Daily Top 2Weekly Top 5

बेशिस्त वाहतुकीला लगाम कोणाचा ?

By admin | Updated: July 7, 2017 00:50 IST

बेशिस्त वाहतुकीला लगाम कोणाचा ?

लोकमत न्यूज नेटवर्करत्नागिरी : स्मार्ट सिटीच्या दिशेने वाटचाल करू पाहणाऱ्या रत्नागिरी शहरात अपघात होणे, ही बाब आता नित्याची झाली आहे. कोणीही यावे व बेदरकारपणे अपघात करून जावे, अशी स्थिती निर्माण झाली आहे. नियम पाळून वाहने चालवणाऱ्यांचे जीव या बेदरकार वाहनचालकांसाठी जणू स्वस्त झालेत की काय, सामान्य वाहनचालकांच्या जीवाशी बेशिस्त वाहनचालक किती काळ हा खेळ खेळणार आहेत, अशी संतप्त प्रतिक्रिया शहरवासीयांमध्ये उमटत आहे. या बेशिस्त व बेदरकार वाहतुकीला लगाम घालणार कोण, असा संतप्त सवालही केला जात आहे. रत्नागिरी शहरातील रस्त्यांना न पेलवण्याइतकी वाहनांच्या संख्येत वाढ झाली आहे. वाहतूक नियमनासाठी जिल्हा प्रशासन, पोलीस खाते व रत्नागिरी नगर परिषद यांच्या संयुक्त समितीचे गठन करून शहरात वाहतुकीला शिस्त लावण्याचा चांगला प्रयत्नही झाला. गेल्या दोन वर्षांपासून शहरात राबविण्यात येत असलेल्या वाहतूक नियमन व्यवस्थेचा परिणाम सुरूवातीच्या काळात चांगला दिसून आला. मात्र, नंतर त्यामध्ये शिथिलता आली. भरधाव वेगाने वाहने हाकणाऱ्यांवर कठोर कारवाई न झाल्याने दररोज भर गर्दीच्या वेळी ‘पळा पळा कोण पुढे पळेतो...’ अशी अतिवेगाने वाहनांची स्पर्धाच होत असल्याचे दिसून येत आहे. या वेगवान वाहने हाकणाऱ्यांना आवरले नाही तर यापुढेही नियम पाळणाऱ्यांना मुठीत जीव घेऊनच वाहने चालवावी लागणार आहेत.शहरात वाढत असलेल्या वाहतुकीतील बेशिस्तीमुळे नियम पाळून वाहने चालवायची की नाहीत, असा प्रश्न सर्वसामान्य वाहनचालकांना पडला आहे. रस्त्यांवरून दाटीवाटीने जाणाऱ्या वाहनांच्या मधील गॅप शोधत आपण आॅलिम्पिकमध्ये उतरल्याच्या तोऱ्यात वाहने चालविण्याचे प्रकार सतत होत आहेत. बेशिस्तीचा हा तोरा खरोखरच उतरवण्याची यंत्रणा शहरात आहे काय, असा प्रश्नही विचारला जात आहे. रत्नागिरी शहरात बेदरकारपणे, बेशिस्तपणे, अतिवेगाने वाहने हाकणाऱ्या दुचाकी व चारचाकी वाहनांवर दंडात्मक कारवाई केली जाते. मात्र, एखादे वाहन अतिवेगाने शहरात येत आहे किवा जात आहे, त्याद्वारे अपघात होत आहेत, ब्रेक फेल झाल्याने वाहन अतिवेगात आहे, कोणाला तरी डॅश केल्याने त्या वाहनाचा पाठलाग होत असल्याने गाडी अतिवेगाने पळवली जात आहे, असे घडत असताना त्याचा संदेश पोलिसांपर्यंत वेळेत पोहोचतो का, यासारखे प्रश्नही निर्माण झाले आहेत. शहरातील वाहने लक्षात घेता वाहतूक शाखेतील कर्मचारी वाढणेही गरजेचे असल्याचा मुद्दा पुढे येत आहे.वाहतूक विभाग अलर्ट : तीन महिन्यात दोन लाख रूपयांचा दंडरत्नागिरीतील वाहतूक व्यवस्थेबाबत बोलताना वाहतूक पोलीस निरीक्षक अयुब खान म्हणाले की, गेल्या तीन महिन्यात रत्नागिरी शहरात अतिवेगाने वाहने हाकणाऱ्या १५९ वाहनचालकांना १ लाख ९७ हजार रुपये दंड करण्यात आला. या सर्वांचे वाहन परवाने निलंबित करावेत, असा प्रस्तावही प्रादेशिक परिवहन विभागाला नुकताच पाठविण्यात आला आहे. वाहतूक पोलिसांकडे ४ वॉकीटॉकी असून, बंदोबस्त व महत्त्वाच्या वेळी त्याचा वापर होतो. अतिवेगाने जाणाऱ्या वाहनांचे नंबर पुढील नाक्यावरील पोलिसांना तत्काळ दिले जातात, असेही खान यांनी सांगितले.