मिलिंद पारकर -- कणकवली -स्थानिक युती करण्याचा कोसळलेला डाव आणि विजय सावंत यांच्याकडून कोणतीही तडजोड न झाल्याने कणकवली विधानसभा मतदारसंघात आता बहुरंगी लढत होणार हे निश्चित झाले आहे. युती करून शिवसेनेला थंड करण्याबरोबर कॉँग्रेसचे बंडखोर उमेदवार आमदार विजय सावंत यांना विविध मार्गांनी शांत करण्याचे प्रयत्न भाजपाकडून करण्यात आले. यामुळे दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा लाभ होणार काय? अशी चर्चा मतदारांमधून रंगते आहे.कणकवली मतदारसंघात छाननीत शिल्लक राहिलेल्या अकरा जणांपैकी बुधवारी तिघांनी अर्ज मागे घेतले. यापैकी एक राष्ट्रवादीचा बंडखोर उमेदवार होता. त्यामुळे आता आठ उमेदवार रिंंगणात आहेत. यापैकी विद्यमान आमदार प्रमोद जठार, कॉँग्रेसचे आमदार विजय सावंत, कॉँग्रेसचे अधिकृत उमेदवार नितेश राणे, शिवसेनेचे सुभाष मयेकर, राष्ट्रवादी कॉँग्रेसचे अतुल रावराणे यांच्यात खरी लढत होईल, असे चित्र आहे.कणकवली आणि कुडाळ या दोन मतदारसंघात युती करून भाजपा आणि शिवसेनेने आपल्या उमेदवाराचा बचाव करावा अशी रणनीती आखली जात होती. त्यासाठी अनेकांनी प्रयत्न केले. राज्यात युती तुटली असताना फक्त या दोन मतदारसंघासाठी युती व्हावी, असा प्रयत्न झाला. आमदार जठार यांनी अर्ज माघारी घेण्याच्या आदल्या दिवशी आपल्याकडून जाहीर आवाहन केले. मात्र, शिवसेनेने युती झाली तर तिन्ही ठिकाणी या आपल्या निर्णयावर कायम राहत भाजपाच्या आडमुठेपणाला दाद दिली नाही. कॉँग्रेसचे बंडखोर विजय सावंत खरेतर नारायण राणे यांना विरोध करण्यासाठी नितेश राणे यांच्या विरोधात उभे ठाकले. निवडणूक जिंकण्यापेक्षा कॉँग्रेसची मते फोडून नितेश राणे यांना पाडण्याचा त्यांचा डाव आहे. मात्र, भाजपाच्या आमदार प्रमोद जठार यांना राणे यांच्या विरोधातील मतांचे विभाजन होण्याची भीती वाटत आहे. असे झाल्यास ते विद्यमान आमदाराला धोक्याचे आहे. त्यामुळे विजय सावंत यांना हरतऱ्हेने समजावण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, त्या प्रयत्नांना न जुमानता विजय सावंत यांनी आपली उमेदवारी कायम ठेवली आहे. जेवढे जास्त उमेदवार उभे राहतील, तेवढी मतविभागणी होण्याचा धोका असल्याने त्याचा सर्वांत जास्त विचार विद्यमान आमदाराकडून केला जात आहे. मागील निवडणुकीत राष्ट्रवादीचे बंडखोर कुलदीप पेडणेकर यांनी तब्बल २४ हजार मते घेतली होती आणि जठार यांचा निसटता विजय झाला होता. त्यावेळी खरेतर शिवसेनेची मतेही जठार यांच्या खात्यावर होती. आता मात्र शिवसेनेचे उमेदवार सुभाष मयेकर हे रिंंगणात उतरले आहेत. यावेळी कॉँग्रेसच्या अधिकृत उमेदवाराला राष्ट्रवादीच्या अतुल रावराणे यांच्यासह बंडखोर आमदार विजय सावंत यांच्या मतविभाजनाचा सामना करावा लागेल. त्यामुळे दोन्ही बाजूंना मतविभाजनाचा फटका आहेच. युती तुटल्याने व कॉँग्रेसचा बंडखोर उमेदवार असल्याने कोणाला मत दिल्याने कोणाचा फायदा होईल, याचा विचार सिंधुदुर्गातील सूज्ञ मतदार करतीलच. राष्ट्रवादीतर्फे रिंगणात असलेले अतुल रावराणे यांचा वैभववाडी तालुक्यापुरता प्रभाव राहील. सुभाष मयेकर हे सिद्धिविनायक ट्रस्टच्या माध्यमातून केलेल्या मदतीचा प्रचारात जोरदार वापर करतील. कॉँग्रेसचे बंडखोर विजय सावंत यांनी ‘साखर कारखाना’ हा मोठा मुद्दा प्रचारासाठी वापरला आहे. प्रमोद जठार यांनी गेल्या पाच वर्षांतील आपल्या कामांचा आधार घेतला आहे. त्यांनी आतापर्यंत त्याचा प्रचारासाठी फायदा उचलला आहे. नितेश राणे यांनी ग्रामीण भागात कॉँग्रेसच्या नेटवर्कसह घरोघरी भेटी देण्याचा धडाका सुरू केला आहे. फोटो 01‘ंल्ल‘_स्र१ेंङ्म ्निं३ँं१प्रमोद जठार01‘ंल्ल‘_ल्ल्र३ी२ँ १ंल्लीनीतेश राणे01‘ंल्ल‘_२४ुँं२ँ ें८ी‘ं१सुभाष मयेकर01‘ंल्ल‘_ं३४’ १ं५१ंल्लीअतुल रावराणे01‘ंल्ल‘_५्र्नं८ २ं६ंल्ल३विजय सावंतनाकणकवली एकूण मतदार २२२२३३वपक्षप्रमोद जठारभाजपानितेश राणेकाँग्रेससुभाष मयेकर शिवसेनाअतुल रावराणे राष्ट्रवादी कॉँग्रेस चंद्रकांत जाधवबसपाडॉ.तुळशीराम रावराणे भारतीय शेकापविजय कृष्णाजी सावंतअपक्षविजय श्रीधर सावंतअपक्ष
अंतर्गत विरोधाचा लाभ कोणाला?
By admin | Updated: October 2, 2014 00:11 IST