शहरं
Join us  
Trending Stories
1
Breaking: पाकिस्तानकडून दिल्लीवर फतेह २ बॅलेस्टीक मिसाईल हल्ल्याचा प्रयत्न; हरियाणाच्या सिरसामध्ये हवेतच नष्ट करण्यात यश
2
१४ मे पर्यंत ३२ विमानतळ बंद; पाकिस्तानसोबतच्या तणावादरम्यान भारताचा मोठा निर्णय
3
पाकिस्तानवर काऊंटर अ‍ॅटॅक सुरू! रावळपिंडी सह तीन एअरबेसवर हल्ला, इस्लामाबाद, लाहोरमध्ये मोठे स्फोट
4
संपादकीय: बीसीसीआयचे चुकलेच! खेळाडूंना दंडांवर काळ्या फिती बांधायला लावली, स्पर्धा रेटली...
5
प्रवासी विमानांना ढाल बनवतोय पाक; कर्नल सोफियांनी पुढे आणला पाकचा चेहरा
6
आकाशातून भारताचे हल्ले होत असतानाच पाकिस्तानात भूकंप; पाकिस्तानी जागच्याजागी हादरले...
7
भारत-पाकिस्तान युद्धाच्या तोंडावर आयएमएफ देणार १ अब्ज डॉलर; पाकिस्तानच्या बेलआऊट पॅकेजला मंजुरी
8
महाराष्ट्रात अधिकाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द; प्रत्येक जिल्ह्यात ‘वॉररूम’
9
रात्र वैऱ्याची! दोन्ही देश रात्रीचेच हल्ले का करत आहेत? मागे कारण काय... अंधार पडला की...
10
Operation Sindoor Live Updates: थोड्याच वेळात परराष्ट्र मंत्रालयाची पत्रकार परिषद; पहाटे ५:४५ वाजता ऑपरेशन सिंदूर बद्दल माहिती देणार
11
रक्तसाठा मुबलक ठेवा; आरोग्य यंत्रणा अलर्ट मोडवर; तातडीची बैठक : सचिवांच्या आरोग्य विभागाला सूचना
12
Pakistan Drone Attack: बारामुल्लापासून भूजपर्यंत पाकिस्तानकडून २६ ठिकाणी ड्रोन हल्ल्याचा प्रयत्न, भारतीय सुरक्षा यंत्रणांनी उधळले मनसुबे 
13
पंतप्रधान नरेंद्र मोदींची सैन्य प्रमुखांसह अजित डोवाल यांच्यासोबत बैठक, परिस्थितीचा घेतला आढावा, पुढचा प्लॅन तयार?  
14
आयपीएल आठवडाभर स्थगित; बीसीसीआय : राष्ट्रहित सर्वांत महत्त्वाचे, नवे वेळापत्रक योग्य वेळी देणार
15
‘हॅलो, मुरली तुमचा कोण? अन् आईला भोवळ; शहीद नाईक यांचा ‘तो’ व्हिडीओ कॉल अखेरचा
16
सखे मी निघतो... परत या वाट पाहते; मेहंदीच्या हातांची ‘सिंदूर’ला पाठवणी
17
लेकीच्या वाढदिवसासाठी गावी आले; अवघ्या चार तासांतच कर्तव्यावर परतले
18
भारताचा संयम, पाकचा पर्यायांवर विचार; संघर्ष थांबण्याची चिन्हे दिसत आहेत का?
19
"भारतीय सैन्याचा जोश... High! पाकिस्तानला तोडीस तोड उत्तर मिळेल"; उरी भेटीनंतर LGचे विधान
20
India Pakistan Tensions: बिथरलेल्या पाकिस्तानकडून नागरी विमानांचा ढाल म्हणून वापर, परराष्ट्र मंत्रालयाची माहिती

२0१९ मध्ये कोणती क्रांती?

By admin | Updated: October 8, 2014 00:14 IST

नीतेश राणे : वैभववाडीतील प्रचारसभेत जठार, सावंतांवर टीका

वैभववाडी : काँग्रेस नेते नारायण राणे यांनी २५ वर्षात जनतेशी विश्वासाचे नाते निर्माण केले आहे. त्यामुळे येथील जनता त्यांच्या पाठीशी आहे. दर पाच वर्षांनी निवडणुकीपूर्वी नवीन क्रांती उदयास येते. २००९ मध्ये दूधक्रांती, २०१४ मध्ये हरितक्रांती झाली. २०१९ मध्ये कोणती क्रांती येतेय कोणास ठाऊक? अशा शब्दात जठारांची डेअरी व सावंतांच्या कारखान्याची टर उडवत नीतेश राणे यांनी विरोधकांवर चौफेर टीका केली.वैभववाडी येथे आयोजित प्रचारसभेत नीतेश राणे बोलत होते. यावेळी पुढे बोलताना ते म्हणाले, प्रमोद जठारांचे प्रगतीपुस्तक हीच आमच्या प्रचाराची खरी ताकद आहे. पुस्तकात छापलेली सगळी कामे त्यांनी केली असतील तर प्रतिस्पर्धी उमेदवारांचे डिपॉझिट घालविण्याएवढा आत्मविश्वास जठारांमध्ये असायला हवा होता. मग ३४ हजारच का? त्यांच्या मागच्या जाहीरनाम्यातील कुठे दिसतोय बस डेपो, कुठे आहे हॉस्पिटल, शौचालय तरी बाजारपेठेत दिसतेय का? असा सवाल करीत पाच वर्षात तुम्हाला आमदार कितीवेळा गावात दिसला? याचे आत्मपरीक्षण करून तुम्हीच निर्णय घ्या, असे आवाहन केले.रक्ताचे पाणी करून वाढवलेली वृत्तपत्रे विकली गेली आहेत. पत्रकारितेचा धंदा केला आहे. पॅकेज संपले की बातमी बंद ही संघाची पत्रकारिता आहे. ही पॅकेज पत्रकारिता लोकशाहीला घातक आहे, असे मत मधुकर भावे यांनी यावेळी येथे बोलताना व्यक्त केले.यावेळी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सतीश सावंत, कोकण सिंचन महामंडळाचे माजी उपाध्यक्ष संदेश पारकर यांनी यावेळी मार्गदर्शन करताना प्रमोद जठार आणि भाजप, शिवसेनेवर जोरदार टीका केली. (प्रतिनिधी)पहिला बाण मोदींना : मधुकर भावेधर्माचा आणि रामाचा संबंधच काय? असा सवाल करीत मधुकर भावे यांनी भाजपवर तोफ डागली. भाजपाएवढे खोटारडे लोक कुठेही सापडणार नाहीत. देश स्वयंपूर्ण करण्याचे काम काँग्रेसने केले. मात्र रामाच्या नावाने राजकारण करणारे भाजपवाले सत्तेवर येताच रामाला विसरले. राम पुन्हा जन्मला तर पहिला बाण मोदीला आणि दुसरा गडकरीलाच मारेल. १२ वर्षे मुख्यमंत्री असताना साबरमती स्वच्छ न करू शकलेले मोदी गंगा काय स्वच्छ करणार? असा सवालही त्यांनी केला. तर राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजे लबाड कंपनीचे एम.डी. आहेत, अशी टीका भावे यांनी केली.