शहरं
Join us  
Trending Stories
1
वेळागर समुद्रात आठजण बुडाले; तिघांचे मृतदेह हाती, एकीचा जीव वाचला, किनाऱ्यावर आक्रोश
2
"तुम्ही आम्हाला शिकवू नका..."; भारताने पाकिस्तानला चांगलंच सुनावलं, UN मध्ये काय घडलं?
3
२ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना कफ सिरप देऊ नका, केंद्राचा सल्ला; राजस्थान, मध्य प्रदेशात ११ बालकांचा मृत्यू
4
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा. पाटलांचे नाव; PM मोदींची राज्य सरकारच्या निर्णयाला मंजुरी
5
'फिट' है तो 'हिट' है... बॉलिवूड अभिनेत्रीचा कमालीचा फिटनेस, या वयातही चाहत्यांना करते घायाळ
6
राज्यात अतिवृष्टी, पूरस्थिती; अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची ४-६ ऑक्टोबरला अंतिम विशेष फेरी
7
शेतकऱ्यांसाठी काँग्रेस रस्त्यावर; नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत मिळण्यासाठी राज्यभर आंदोलन
8
“बावळट-मूर्ख, मनोज जरांगेंसारखा नेता मिळणे मराठ्यांचे दुर्दैव”; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
9
IND vs AUS : तिलक वर्माचं शतक थोडक्यात हुकलं; ऑस्ट्रेलियाविरुद्ध अभिषेकवर 'गोल्डन डक'ची नामुष्की
10
RSS च्या पथसंचलनात ढोल वाजवणाऱ्या स्वयंसेवकाचा हृदयविकाराने मृत्यू; व्हिडिओ व्हायरल
11
वैभव खेडेकरांचा तीनदा भाजपा प्रवेश रखडला, आता शिवसेनेत जाणार? शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
12
आशाबाई, अंबिका अन् सुनीता... सोलापुरात दोन दिवसांत तीन महिलांची हत्या, कारण एकच
13
काँग्रेसनेही निवडणुकांसाठी कंबर कसली! नागपुरात ४, ५ ऑक्टोबरला विचारमंथन कार्यशाळा
14
बेडरूममध्ये कॅमेरा बसवून खासगी व्हिडीओ काढले अन् परदेशात...; पत्नीने समोर आलं पतीचे किळसवाणं कृत्य
15
IND vs WI: ‘ध्रुव तारा’ चमकला! पहिल्या सेंच्युरीनंतर बॅटची बंदूक करून 'बाप-माणसाला' सेल्युट! (VIDEO)
16
Business: २ मित्रांनी सोडली कॉर्पोरेट नोकरी, दूध विकून झाले कोट्यधीश, तयार केला मोठा ब्रँड!
17
सणासुदीच्या तोंडावर सोन्या-चांदीचे दर घसरले! तुमच्या शहरात आज एका तोळ्याची किंमत किती?
18
POKमध्ये पाकचे अत्याचार, भारताची पहिली प्रतिक्रिया; असीम मुनीर यांचा घेतला खरपूस समाचार
19
'आता संयम ठेवणार नाही; पाकिस्तानला जगाच्या नकाशावरुन मिटवू...', लष्करप्रमुखांचा पाकला थेट इशारा
20
भारीच! महागडे प्रोडक्ट सोडा... गळणाऱ्या केसांवर रामबाण उपाय; एकदा करून बघाच

‘ते’ पाच कोटी गेले कुठे ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2016 23:46 IST

युवक काँग्रेसचा सवाल : गाळ उपसण्यासाठी तत्कालिन पालकमंत्र्यांचा निधी

कणकवली : गाळ उपशासाठी ५ कोटी रूपयांचा निधी मागील वर्षी मंजूर झाला होता. मात्र, वर्षभरानंतरही या निधीतील कामे झाल्याचे दिसत नाहीत. या निधीतील कामे येत्या आठ दिवसांत सुरू करण्यात यावीत, अन्यथा लघुपाटबंधारे कार्यालयाला टाळे ठोकण्यात येईल, असा इशारा युवक कॉँग्रेसतर्फे देण्यात आला आहे. युवक कॉँग्रेस विधानसभा अध्यक्ष संदीप मेस्त्री आणि कार्यकर्त्यांनी तहसीलदार समीर घारे यांची बुधवारी यासंदर्भात भेट घेऊन निवेदन दिले.तालुक्यातील जानवली, कलमठ, वरवडे या गावात दरवर्षी पावसामध्ये पूरस्थिति असते. याची दखल घेत तत्कालिन पालकमंत्री नारायण राणे यांनी उपरोक्त गावातील नदीमध्ये असलेला गाळ उपशासाठी ५ कोटी निधी मंजूर केला होता. सन २०१५ मध्ये फक्त १५ दिवस काम करून पावसाळ्यानंतर उर्वरित काम करण्यात येईल, असे सांगितले होते. मात्र, पावसाळा संपून ५ महिने लोटले तरी गाळ उपशाचे काम सुरु झालेले नाही. जानवली, कलमठ गावातील कलेश्वर नगर, महाजनी नगर, टेंबवाडी, वरवडे फणसनगर येथील २०० पेक्षा जास्त घरे अतिवृष्टीमुळे पाण्याखाली असतात आणि लाखोंचे नुकसान होते. मात्र लघुपाटबंधारे कार्यालयामध्ये संपर्क केला असता सबंधित अधिकारी रत्नागिरी येथे असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे तालुका आपत्ती व्यवस्थापन अधिकारी म्हणून तहसीलदार समीर घारे यांची युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी विधानसभा अध्यक्ष संदिप मेस्त्री यांच्या नेतृत्वाखाली भेट घेतली. संबंधित अधिकाऱ्यांची आपण एकत्रित बैठक घेऊ, असे आश्वासन तहसीलदार तथा तालुका आपत्ती व्यवस्थापन अधिकारी समीर घारे यांनी दिले. यावेळी संदिप मेस्त्री, सुनील साळसकर, मंगेश सावंत, कमलेश नरे, महेश आंबेरकर, गौरव यादव, चानी जाधव, अपु देसाई, अविराज मराठे, आशीष सावंत, अभी लाड, भाई कदम, चेतन गवाणकर आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)आंदोलनाचा इशारागाळ उपशाचे काम सुरू करताना तीन गावातील सरपंचांना कळवले होते का? गेल्या वर्षी झालेल्या कामाचे मूल्यांकन किती? काढलेला गाळ लिलाव पद्धतीने देणे बंधनकारक असताना लिलाव का झाला नाही? असे प्रश्न यावेळी उपस्थित केले. गाळ उपशाचे काम ८ दिवसात सुरु न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल आणि लघुपाटबंधारेच्या कार्यालयाला टाळे ठोकण्यात येईल, असा इशारा यावेळी दिला.