शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

क्वॉरी बंद कधी करणार ?

By admin | Updated: June 12, 2015 00:48 IST

विलवडेतील ग्रामस्थांचा आरोप : मालक व नेता, प्रशासनाचे सलोख्याचे संबंध

ओटवणे : तहसीलदार, तलाठी यांनी विलवडे येथील क्रशर क्वॉरीला बंद करण्याचे आदेश देऊनही बंद का केली जात नाही? असा प्रश्न ग्रामस्थांकडून व्यक्त केला जात आहे. गेली अनेक वर्षांपासून विलवडे येथे पाझर तलाव परिसरात अनधिकृत क्रशर क्वॉरी बिनदिक्कतपणे चालू आहे. या क्वॉरीला ग्रामस्थांकडून प्रचंड विरोध होत आहे. क्वॉरीमुळे पाझर तलावात माती जाऊन तलावात पाणीसाठा कमी होत चालला आहे. याचबरोबर वरचीवाडी येथील घरांनाही तडे गेले आहेत. यामुळे ग्रामस्थांनी तलाठी प्रशांत पास्ते यांची भेट घेऊन समस्यांचा पाढा वाचला. त्यांनी तत्काळ पंचनामा करून क्वॉरी बंद करण्याचे आदेश दिले. पण या क्वॉरीमध्ये बड्या राजकीय व्यक्तींचा हिस्सा असल्याकारणाने ही क्वॉरी चालूच राहिली. यानंतरही काही महिन्यापूर्वी या क्वॉरीला तहसीलदारांकडून सील ठोकण्यात आले होते. तसेच या क्वॉरीजवळ मिळालेला ५० किलो अमोनियासह जेसीबी आणि हत्यारे जप्त करण्यात आली होती, पण राजकीय हस्तक्षेप व वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या हातमिळवणीमुळे या वस्तू परत करण्यात आल्या. विशेष म्हणजे याचा दंडदेखील भरून घेण्यात आला नाही. जिल्ह्यादत काही गांवामध्ये उत्खनास बंदी असतानाही, तसेच ग्रामस्थांचा प्रचंड विरोध असतानाही अशा क्वॉरीना कशी काय परवानगी दिली जाते? अशा प्रश्न ग्रामस्थांकडून उपस्थित केला जात आहे. याबाबत ग्रामस्थ संतप्त असून प्रशासनाविरुद्ध लोकायुक्त कार्यालयात तक्रार देण्याचा निर्णय ग्रामस्थांनी घेतला आहे. (वार्ताहर)क्वॉरीमुळे घरांची पडझडगेली दोन वर्ष येथील सामान्य माणसांचा हा लढा सुरू असून क्वॉरीमुळे ग्रामस्थांच्या घरांची पडझड होत आहे. असेच हे सत्र चालू राहिल्यास ऐनवेळी आम्ही कायदा हातात घेऊ, अशी धमकी ग्रामस्थांनी दिली आहे. ओटवणे-विलवडेचे तलाठी प्रशांत पास्ते यांनी यासंदर्भात पाठपुरावा केला असून आता तरी शासन अंतिम निर्णय घेतील, अशी अपेक्षाही ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.