शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

लाच घेताना पोलिसासह मध्यस्थी जाळ्यात

By admin | Updated: July 2, 2016 23:48 IST

कुडाळात ‘लाचलुचपत’ची कारवाई : गुन्ह्यात नाव न अडकविण्यासाठी मागितली लाच

कुडाळ : मुळदे येथील चोरीच्या गुन्ह्यात नाव अडकविण्याची धमकी देत नाव न अडकविण्यासाठी पाच हजारांची लाच मागून त्यापैकी रोख चार हजार रुपयांची रक्कम स्वीकारताना कुडाळचे पोलिस शंकर नाईक व मध्यस्थी प्रमोद सावंत या दोघांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलिसांनी रंगेहात पकडले. ही कारवाई शनिवारी दुपारी कुडाळ पोलिस ठाण्याच्या हाकेच्या अंतरावर करण्यात आली. या दोघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. एप्रिल महिन्यात तालुक्यातील मुळदे गावातील विहिरीवर लावलेले चार पंप चोरीला गेले होते. याप्रकरणी कुडाळ पोलिसांनी दोन संशयितांना अटक केली होती. या चोरीच्या प्रकरणात मुळदे येथील शंकर ऊर्फ महेश शिंदे याचे नाव अडकविण्यात येईल, अशी धमकी कुडाळ पोलिस ठाण्याचे वाहतूक शाखेतील पोलिस नाईक शंकर नाईक यांनी महेश शिंदे याला दोन महिन्यांपूर्वी दिली होती. या प्रकरणात पैसे घेण्यासाठी मुळदे येथील प्रमोद सावंत (वय ३३) याला पोलिस नाईक यांनी मध्यस्थी म्हणून ठेवले होते. ही रक्कम यावेळी सावंत यानेच स्वीकारली होती. अटक केलेल्या दोन्ही संशयित आरोपींना रविवारी न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याची माहिती उपअधीक्षक चिंदरकर यांनी दिली. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधीक्षक शंकर चिंदरकर यांच्यासह पोलिस निरीक्षक मितेश केणी, युवराज सरनोबत, सहाय्यक पोलिस कर्मचारी जळवी, परब, देवळेकर यांनी केली. (प्रतिनिधी) शिंदे यांनी दिली तक्रार गेल्या दोन महिन्यांपासून गुन्ह्यात नाव न अडकविण्यासाठी पाच हजारांची मागणी करून त्रास दिल्यामुळे वैतागलेल्या शिंदे यांनी याबाबतची तक्रार कुडाळ येथील सिंधुदुर्ग लाचलुचपत प्रतिबंध विभागाकडे ३० जून रोजी केली होती. ३० जून रोजी शिंदे यांनी तक्रार दाखल करताच लाचलुचपत प्रतिबंध विभागाने तत्काळ या प्रकरणाचा योग्य तपास व्हावा, याकरिता सर्व यंत्रणा कार्यान्वित केली. यादरम्यान पोलिस नाईक यांचा फोनही टॅपिंग करण्यात आला होता. या वर्षातील पाचवी कारवाई लाचलुचपत विभागाने यंदाच्या वर्षी ही केलेली पाचवी कारवाई असून, कुडाळ पोलिस ठाण्याचा पोलिस कर्मचारी पुन्हा एकदा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात सापडल्याने पुन्हा एकदा कुडाळ पोलिस चर्चेत आले आहेत.