लोकमत न्यूज नेटवर्कसावंतवाडी : नारायण राणे यांना काँग्रेसमध्ये येऊन बारा वर्षे झाली. त्यात त्यांना अनेक पदे दिली. असे असताना त्यांनी काँग्रेस सोडताना आपल्यावर अन्याय झाल्याचे सांगितले. मग या बारा वर्षाच्या काळात त्यांनी आमच्यासारख्या निष्ठावंतांवर कितीवेळा अन्याय केला? त्याला काय म्हणायचे? याची तक्रार कोणाकडे करायची? असा सवाल काँग्रेसचे नूतन जिल्हाध्यक्ष विकास सावंत यांनी केला. जर तुम्ही चांगले काम केले असे म्हणता, तर काँग्रेसमध्ये राहणाºयांना धमकावता कशाला, असा सवालही त्यांनी यावेळी केला.
काँग्रेस नेते नारायण राणे यांनी गुरूवारी केलेल्या आरोपांना उत्तर देण्यासाठी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष विकास सावंत यांनी शुक्रवारी येथील आरपीडी कॉलेजमध्ये पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. यावेळी माजी नगराध्यक्ष दिलीप नार्वेकर, राजू मसूरकर आदी उपस्थित होते.यावेळी विकास सावंत म्हणाले, माझ्यावर व्यक्तिगत पातळीवर टीका केली जाते. ही टीका करीत असताना माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी काही विचार केला पाहिजे होता. भाईसाहेब सावंत पतपेढीबाबत चुकीची भूमिका जनतेसमोर मांडत आहते. हा विषय सहकार न्यायालयात आहे आणि ते अठरा कोटी म्हणतात तसे काही नाही. दोन अंकी संख्या या कर्जाची नाही, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.विजय सावंतांकडून दत्ता सामंताना फोनप्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्याशी आमच्या बैठका झाल्या, असे नारायण राणे यांनी सांगितले. यावेळी त्यांनी साक्षीदार म्हणून माजी आमदार विजय सावंत यांच्या नावाचा उल्लेख केला. त्यांनी दत्ता सामंत यांना फोन करून माहिती दिली, असे सांगितले. त्यामुळे वस्तुस्थिती काय हे मला माहीत नाही. सावंत हे सामंत यांच्या संपर्कात असल्याचे आपल्याला माहीत नाही, असेही जिल्हाध्यक्ष विकास सावंत यांनी यावेळी जाहीर केले.