शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

रेडी बंदराची बाजू घेण्याचे कारण काय?

By admin | Updated: June 29, 2015 00:24 IST

मालवणातील बैठकीत राजन तेली यांचा काँग्रेसला सवाल

मालवण : सहा वर्षे झाली तरी रेडी बंदराचे काम अपूर्णावस्थेत आहे. रेडी बंदर विकासकाने अंदाजपत्रकानुसार केलेले नसताना काँग्रेसचे नेते या बंदराविषयी बाजू घेण्याचे कारण काय? रेडी बंदरासाठी जेवढी तसदी काँग्रेसच्या नेत्यांनी घेतली त्याऐवजी तोंडवळी वायंगणी येथील सी वर्ल्ड प्रकल्पाविषयी घेतली असती तर जनतेचा फायदा झाला असता असा टोला भारतीय जनता पार्टीचे प्रदेश सरचिटणीस राजन तेली यांनी मालवण येथील पत्रकार परिषदेत लगावला.मालवण तालुका भारतीय जनता पार्टीची बैठक प्रदेश सरचिटणीस राजन तेली यांच्या मार्गदर्शनाखाली रविवारी पार पडली. यावेळी राजन तेली यांचा भाजपाच्या सरचिटणीसपदी निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला. या बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत तेली बोलत होते. तालुकाध्यक्ष बाबा मोंडकर, विलास हडकर, भाऊ सामंत, गजानन ठाकूर, अ‍ॅड. पूर्वा ठाकूर, धोंडी चिंदरकर, गोपी पालव, संतोष लुडबे, आबा कुर्ले, सदाशिव राऊळ आदी उपस्थित होते.तेली म्हणाले, रेडी बंदराचे काम ज्या विकासकाने महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाच्या अंदाजपत्रकानुसार पूर्ण न केल्याने नागरिकांचा विरोध आहे. असे असताना काँग्रेसचे नेते रेडी बंदराचे समर्थन करत बाजू घेतात याचा अर्थ काय? काँग्रेसची सर्व मंडळी आजूबाजूची कामे घेऊन ठेकेदारीमध्ये गुंतली आहेत. रेडी बंदराऐवजी सी वर्ल्ड प्रकल्पाबाबत तसदी घेतली असती तर त्याचा फायदा नागरिकांना झाला असता. सत्तेत असताना सी वर्ल्डविषयी नागरिकांशी चर्चा करण्याचे सौजन्य काँग्रेसच्या नेत्यांनी दाखविले नाही. भाजप युती सत्तेत आल्यावर काँग्रेसच्या कालावधीत खितपत पडलेले तिलारी वनटाईम सेटलमेंट हत्तीचा प्रश्न, चौपदरीकरण, आकारफोड, वनसंज्ञा आदी प्रश्न मार्गस्थ होण्यासाठी प्रयत्न झाले. आज कोकणला योग्य दिशा मिळत असताना काँग्रेसचे नेते दिशाभूल करण्याचे काम करीत असल्याचे तेली यांनी सांगितले. सिंधुदुर्ग-रत्नागिरी जिल्ह्यातील प्रकल्पांना चालना देण्याचे काम भारतीय जनता पक्ष करेल.आरोंदा जेटीविषयी आपल्यावर वैयक्तिक पातळीवर काँग्रेसच्या नेत्यांनी आरोप केले. जमीन खरेदी अन्य कोणत्याही संदर्भात सीआयडीच काय तर जगातली कुठल्याही यंत्रणेमार्फत माझी चौकशी करावी. मात्र याचबरोबर चिपी विमानतळानजीकची जागा पेन्सिल नोंद कशी झाली व कोणी केली याचीही चौकशी व्हावी असे तेली यांनी सांगितले. (प्रतिनिधी)