शहरं
Join us  
Trending Stories
1
जगदीप धनखड नेमके आहेत तरी कुठे? ते सध्या काय करतात?; महत्त्वाची माहिती समोर आली, पत्ता लागला!
2
Video : उत्तराखंडमधील चमोलीत मध्यरात्री ढगफुटी! थरालीत कहर, अनेक घरं ढिगाऱ्याखाली; लोकही बेपत्ता!
3
एकावर एक बोनस शेअर देणार HDFC Bank, रेकॉर्ड डेट येत्या काही दिवसांत; गुंतवणूक करणं योग्य ठरेल?
4
फडणवीस-शिंदे-पवारांची 'वर्षा' बंगल्यावर दीडतास खलबते; तीन पक्षांमधील समन्वयावर चर्चा
5
कुठे मिळेल सर्वाधिक व्याज? बँक FD vs पोस्ट ॲाफिस RD; पाहा ५ वर्षाचा संपूर्ण हिशोब, कोण आहे खरा किंग?
6
CM फडणवीस-राज ठाकरेंमध्ये ५५ मिनिटे केवळ रस्ते-पार्किंगवर चर्चा? दया कुछ तो ‘राज’ की बात है...
7
डोनाल्ड ट्रम्प यांची मोठी घोषणा, 'फार्मा'नंतर आता या क्षेत्रावरही लावणार टॅरिफ; भारतावर काय परिणाम होणार?
8
हरित इंधनात रूपांतर करण्यासाठी बेकरींना एक वर्षाची मुदतवाढ नाही; १२ बेकरींचा अर्ज फेटाळला
9
यंदा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विजयादशमी उत्सवात माजी राष्ट्रपती कोविंद मुख्य अतिथी
10
‘चाकरमानी’ नव्हे तर आता ‘कोकणवासीय’ म्हणावे; अजित पवारांचे निर्देश, लवकरच शासन परिपत्रक
11
१८ वर्षे असते राहु महादशा, ‘या’ राशींना लॉटरी लागते; श्रीमंती-सुबत्ता लाभते, कल्याणच होते!
12
‘बेस्ट पतपेढी’ अपयशानंतर सामंतांनी दिला राजीनामा; पराभव का झाला ते कारणही सांगितलं
13
असं आहे 'बिग बॉस १९'चं घर! पाहा लिव्हिंग रूमपासून गार्डन एरियापर्यंतचे खास फोटो
14
आजचे राशीभविष्य : शनिवार, २३ ऑगस्ट २०२५; आज विविध क्षेत्रातून फायदा होईल, शारीरिक व मानसिक दृष्टया आनंदी आणि स्वस्थ राहाल
15
सार्वजनिक ठिकाणी मोकाट कुत्र्यांना खाऊ घातल्यास कारवाई; सर्वोच्च न्यायालयाचे आदेश
16
लोकमत इम्पॅक्ट: दूषित पाणीपुरवठ्याची मंत्री आशिष शेलारांकडून दखल; तत्काळ कार्यवाहीच्या सूचना
17
विशेष लेख: ५० रुपयांत कोट्यवधी जिंका? - आता विसरा ! ऑनलाइन मनी गेम्सच्या 'जुगारा'वर बंदी
18
भर पावसात गर्भवतीला घेऊन निघाली रुग्णवाहिका; वाटेतच कळा अन् डॉक्टरांनी घेतला स्तुत्य निर्णय
19
लेख: आपला गाढवपणा सोडून गाढवे का जपली पाहिजेत? आता गर्दभ संगोपनाचे प्रयत्न झालेत सुरू
20
कैद्यांना मोकाट सोडणारे ठाणे मुख्यालयातील दोन पोलीस कर्मचारी बडतर्फ, पोलिस आयुक्तांचे आदेश

ढेबेवाडीकरांनू... आपले कोकणात स्वागत असा!

By admin | Updated: April 10, 2015 23:46 IST

लवकरच सर्व्हे : महिंदमार्गे संगमेश्वर रस्त्याच्या हालचाली

बाळासाहेब रोडे - सणबूर  -माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या प्रयत्नातून मंजूर झालेल्या ढेबेवाडी ते महिंद या नऊ किलोमीटरच्या रुंदीकरणाचे काम गतीने सुरू आहे. येत्या पंधरा दिवसांत रस्त्याचे काम पूर्ण होणार असून, हा रस्ता संगमेश्वरला जोडण्यासाठी शासनस्तरावर हालचाली सुरू आहेत. त्यामुळे ढेबेवाडी विभागाच्या विकासाला चालना मिळणार आहे. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी पाटण तालुक्यासह संपूर्ण जिल्ह्याच्या विकासाच्या दृष्टिकोनातून झुकते माप दिले आहे. त्यांच्या प्रयत्नातून मंजूर झालेली विविध विकासकामे सध्या ढेबेवाडी विभागात गतीने सुरू आहेत. त्यामध्ये ढेबेवाडी ते महिंद हे नऊ किलोमीटर तर चाफेर ते संगमनेर हे दोन किलोमीटर अशा अकरा किलोमीटर रस्त्याच्या कामासाठी सव्वाचार कोटी रुपये मंजूर आहेत. ३.७५ मीटरच्या या जुन्या रस्त्याचे साडेपाच मीटरने रुंदीकरण होत आहे. रस्त्याच्या कामासाठी काँग्रेसचे प्रांतिक प्रतिनिधी हिंदुराव पाटील यांच्यासह राहुल चव्हाण यांनी सातत्याने पाठपुरवा केला आहे. हे काम उत्कृष्ठ दर्जाचे असल्याने प्रवाशांतून समाधान व्यक्त होत आहे. ढेबेवाडी ते महिंद या नऊ किलोमीटरचा रस्ता १५ दिवसांत पूर्ण होईल, असा अंदाज आहे. ढेबेवाडी पासून पश्चिमेला असणारे वाल्मीक पठार पर्यटकांसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू बनत आहे. त्याच बरोबर भोसगाव जवळ निसर्ग पर्यटन केंद्र साकारण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. तर वांग-मराठवाडी व महिंद या दोन धरणांमुळे भविष्यात पर्यटकांच्या गर्दीत वाढच होणार आहे. त्यामुळे पर्यटन व्यवसायाला चालना मिळणार आहे. त्यादृष्टीने ढेबेवाडी-महिंद हा रस्ता महत्त्वाचा मानला जात आहे. या रस्त्यामुळे सणबूर, महिंद, रुवले, बनपुरी, बाचोली या परिसरातील ग्रामस्थांना खराब रस्त्यामुळे होणारा त्रास कायमचा बंद होणार आहे. भविष्यात हा रस्ता कोकणातील संगमेश्वरलाही जोडण्यासाठी हालचाली शासनस्तरावर सुरू आहेत.हा रस्ता कोकणला जोडला गेल्यास संपूर्ण विभागाचा चौफेर विकास होणार आहे. सळवे अखेरचे टोकसळवे गाव हे ढेबेवाडी विभागाचे शेवटचे टोक आहे. या गावापासून पुढे एका बाजूला शिराळा तालुका व एका बाजूला रत्नागिरी जिल्ह्याची हद्द सुरू होते. सध्या रुंदीकरण होत असलेला ढेबेवाडी-सळवे हा रस्ता पुढे संगमेश्वरला जोडण्यासाठी प्रशासनाच्या हालचाली सुरू आहेत. सळवेपासून संगमेश्वरचे अंतर सुमारे सत्तर किलोमीटर आहे. साठ कि.मी.चा प्रवास वाचणारढेबेवाडी खोऱ्यातील जनतेला सध्या संगमेश्वरला जाण्यासाठी ढेबेवाडीपासून पाटण व तेथून चिपळूणमार्गे संगमेश्वरला जावे लागते. हे अंतर सुमारे १२० किलोमीटरचे आहे. मात्र, ढेबेवाडी ते संगमेश्वर हा रस्ता झाल्यास ते अंतर साठ किलोमीटरचे असणार आहे. त्यामुळे साठ किलोमीटरचा प्रवास वाचणार आहे. महिंदपासून पुढे डोंगरातून बोगदा करून हा रस्ता करण्यात येणार आहे. ढेबेवाडी ते संगमेश्वर हा रस्ता होण्यासाठी आम्ही पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे सातत्याने आग्रह धरला होता. त्याबरोबरच ढेबेवाडी खोरे कोकणशी जोडले जात असल्याने येथील बाजारपेठेला विशेष महत्त्व प्राप्त होणार आहे. - हिंदुराव पाटील, प्रांतिक प्रतिनिधीखोऱ्यातील महत्त्वाचे मार्गढेबेवाडी ते पाटण : २९ किलोमीटरढेबेवाडी ते कऱ्हाड : २७ किलोमीटरढेबेवाडी ते जिंती : १० किलोमीटरढेबेवाडी ते सळवे : ११ किलोमीटरढेबेवाडी ते काळगाव : १२ किलोमीटर