शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
US Israel Iran War : युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
4
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
5
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
6
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
7
मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
8
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
9
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
10
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
11
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
12
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
13
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
14
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
15
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
16
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
17
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
18
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
19
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
20
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
Daily Top 2Weekly Top 5

कोकण साहित्य यात्रेचे रत्नागिरीत स्वागत

By admin | Updated: November 17, 2015 00:04 IST

कोमसाप : करुळ ते मुंबई होणार साहित्याचा जागर

रत्नागिरी : कोकण मराठी साहित्य परिषदेच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त करुळ ते मुंबई अशी कोकण साहित्य यात्रा काढण्यात आली. रत्नागिरी येथे या साहित्य यात्रेचे आज (सोमवारी) स्वागत करण्यात आले. आमदार उदय सामंत, कोकण मराठी साहित्य परिषदेच्या केंद्रीय कार्याध्यक्षा नमिता कीर, विश्वस्त अरूण नेरुरकर, भास्कर शेट्ये यांनी साहित्य यात्रेचे स्वागत केले.पटवर्धन हायस्कूल येथे साहित्य यात्रेचे आगमन होताच ढोल वादनाने स्वागत करण्यात आले. त्यानंतर केंद्रीय कार्याध्यक्ष नमिता कीर यांनी पारंपरिक पद्धतीने औक्षण केले. विश्वस्त भास्कर शेट्ये व अरुण नेरुरकर यांनी साहित्य दिंडीला पुष्पहार अर्पण केला. त्यानंतर पटवर्धन हायस्कूलच्या सभागृहात दिंडीचे आगमन झाल्यानंतर स्वागत सोहळा पार पडला. गजानन पाटील यांनी प्रास्ताविकात साहित्य यात्रेचा उद्देश व मार्ग याबाबत माहिती दिली. २० ते २२ नोव्हेंबरअखेर दादर येथे होणाऱ्या साहित्य संमेलनापूर्वी दिंडी मुंबईत पोहोचणार असल्याचे सांगितले. कोमसापची स्थापना २५ वर्षांपूर्वी मधु मंगेश कर्णिक यांनी केल्याचे कोमसाप केंद्रीय कार्याध्यक्षा नमिता कीर यांनी सांगितले. रौप्य महोत्सव साजरा करीत असतानाच करुळ ते मुंबई साहित्याचा जागर आयोजित केला असून, सोळावे साहित्य संमेलन मुंबईत होणार असल्याचे त्यांनी सांगितले.आमदार उदय सामंत यांनी मार्गदर्शन करताना २५ वर्षांपूर्वी कोमसापची मधु मंगेश कर्णिक यांनी मुहूर्तमेढ रोवली असून, त्याला पुढे नेण्याचे व राजाश्रय देण्याचे कर्तव्य आमचे असल्याचे सांगितले. वाचन संस्कृ ती व सांस्कृतिक कार्य वाढवित असताना कोकण मराठी साहित्य परिषदेच्या ज्येष्ठ मंडळींनी मुलांसमवेत संवाद साधण्याची अपेक्षा व्यक्त केली. लहान मुले केवळ अनुकरणप्रिय असतात. पडद्यावरील व्यक्तींची ओळख होते. मात्र, स्थानिक संस्था ज्येष्ठ मंडळींनी जर त्यासाठी पुढाकार घेतला तर निश्चितच मुलांवर चांगले संस्कार होतील, असे सांगितले.साहित्य यात्रेत रौप्यमहोत्सव कमिटीचे अध्यक्ष व ज्येष्ठ कवी प्रा. एल. व्ही. पाटील व कवी अ. वि. जंगम सहभागी झाले आहेत. ज्येष्ठ कवी प्रा. एल. व्ही. पाटील यांनी मार्गदर्शन करीत असताना कोमसाप केवळ कोकणाची नाही, तर अवघ्या महाराष्ट्राची आहे, असे सांगितले. कवी, लेखक यांना व्यासपीठ मिळवून देण्याचे काम कोमसाप करीत आहे. साहित्य संमेलनामध्येही अनेक नवोदित कवींना सन्मान दिला आहे. बोली भाषा, विचार, तत्व यांना एकत्र करण्याचे काम कोमसाप करीत असल्याचे सांगितले. यावेळी त्यांनी काही कविता सादर केल्या. यात्रेच्या स्वागताचे औचित्य साधून विश्वस्त भास्कर शेट्ये, अरूण नेरुरकर, ज्येष्ठ कवी एल. व्ही. पाटील, कवी अ. वि. जंगम, आमदार उदय सामंत यांचा सत्कार करण्यात आला. विनायक हातखंबकर यांनी सूत्रसंचालन केले.यावेळी उपनगराध्यक्ष संजय साळवी, नगरसेवक राहुल पंडित, सलील डाफळे, कोमसापचे जिल्हाध्यक्ष सुरेश खटावकर आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)रत्नागिरीत पारंपारिक ढोलवादनाने स्वागत.दादर येथील साहित्य संमेलनापूर्वी दिंडी मुंबईत पोहोचणार.कोमसापकडून बोली भाषा, विचार, तत्व यांना एकत्र आणण्याचे काम :पाटील.कोमसापला राजाश्रय देण्याचे काम आमचे : सामंत.