शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
Latest Marathi News LIVE Updates: 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चेनं राजकारणात खळबळ, शिंदेसेना-ठाकरेसेना आमनेसामने
3
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
4
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
5
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
6
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
7
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
8
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
9
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
10
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
11
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
12
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
13
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
14
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
15
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
16
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
17
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
18
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
19
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
20
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
Daily Top 2Weekly Top 5

‘डबलडेकर’चे जल्लोषी स्वागत

By admin | Updated: December 7, 2015 00:14 IST

भाजपची पाठ : मळगाव रेल्वे स्थानकात शिवसैनिकांनी साजरा केला आनंदोत्सव

सावंतवाडी : खास कोकणवासीयांसाठी सुरू केलेल्या डबलडेकर ट्रेनचा प्रारंभ गोवा-मडगाव येथून झाल्यानंतर सावंतवाडी-मळगाव रेल्वेस्थानक येथे तालुक्याच्यावतीने व शिवसैनिकांच्यावतीने भव्य स्वागत करण्यात आले. यावेळी उपस्थितांनी व प्रवाशांनी आनंदोत्सव साजरा केला. शिवसैनिकांच्या आनंदोत्सवात भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी मात्र पाठ फिरवल्याचे दिसून आले.नगराध्यक्ष बबन साळगावकर, शिवसेना तालुकाप्रमुख रूपेश राऊळ, उपनगराध्यक्ष राजन पोकळे, संपर्कप्रमुख राजू नाईक, शिवसेना शहरप्रमुख शब्बीर मणियार, पंचायत समिती सदस्य अशोक दळवी, लवू भिंगारे, कोकण रेल्वे वरिष्ठ अभियंता पी. एन. माळी, शाम तोडकर, जी. व्ही. तेली, मळगाव सरपंच गणेशप्रसाद पेडणेकर, सुनील गावडे, दिलीप सोनुर्लेकर, अजित सांगेलकर, आनंद देवळी, सोनू राऊळ, विजय राऊळ, प्रभाकर सामंत, चंद्रकांत जाधव आदी उपस्थित होते. रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी डबलडेकर रेल्वे गोवा मडगाव ते लोकमान्य टिळक मुंबईपर्यंत धावण्याची अधिकृत घोषणा २९ डिसेंबर रोजी केली होती. त्यानुसार त्याचा प्रारंभ गोवा-मडगाव येथून रविवारी करण्यात आला. याच पार्श्वभूमीवर मळगाव रेल्वेस्थानकावर शिवसेनेच्यावतीने या रेल्वेचे भव्य स्वागत करण्यात आले. (वार्ताहर)दोन स्थानकावर थांबाडबलडेकर रेल्वेला सावंतवाडी व कणकवली या दोनच ठिकाणी थांबा आहे. डबलडेकर रेल्वे रविवारी सायंकाळी साडेपाच वाजता सावंतवाडीतील मळगाव रेल्वेस्थानकावर आली. दरम्यान, यावेळी रेल्वेचे झेंडा फडकावून स्वागत करण्यात आले. शिवसैनिकांनी सायंकाळपासूनच गर्दी करण्यास सुरूवात केली होती. मात्र, या गर्दीत भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते कुठेच दिसत नव्हते. त्यामुळे हा आनंदोत्सव शिवसेनेचे कार्यकर्तेच साजरा करताना दिसत होते.