शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताने ५ फायटर जेट पाडले'; पाकिस्तानचा थयथयाट, संरक्षण मंत्री आसिफ म्हणाले...
2
वैष्णो देवी दर्शनाचा मार्ग आणखी सुकर होणार; तर महाराष्ट्राला मिळणार आणखी एक वंदे भारत, 'या' मार्गावर धावणार?
3
महाराष्ट्रातील 'या' नऊ राजकीय पक्षांना निवडणूक यादीतून हटवले; निवडणूक आयोगाची कारवाई कुणावर?
4
नागपूर: महालक्ष्मी मंदिराच्या प्रवेशद्वाराचे छत कोसळले, अनेक मजूर जखमी; NDRF कडून शोध कार्य सुरू
5
'निघालो तेव्हा बाजार होता, परतलो तेव्हा स्मशान'; धरालीतील ढगफुटीनंतर लोकांनी सांगितला थरारक अनुभव
6
ती आली अन् पाहुणेही आले... हार, तोरणं, पताका आणि फुलांनी भव्य सभामंडपही सज्ज
7
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
8
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
9
धक्कादायक! डोनाल्ड ट्रम्प यांनी फायद्यासाठी पहिल्या पत्नीला गोल्फ कोर्समध्ये पुरलं? केला जातोय असा दावा
10
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
11
महान तपस्वी, ऋषिमुनीसारखा तो २३३ वर्षांपासून देतो आहे आसरा
12
हा निर्णय सोपा नाही; त्यात संघातून बाहेर फेकले जाण्याचीही जोखीम! रहाणेचं बुमराहसंदर्भात मोठं वक्तव्य
13
जीर्ण पाईप फुटून आण्विक कचरा समुद्रात पडला, नौदलाच्या चुकीमुळे या देशात हाहाकार
14
'अजिबात तडजोड स्विकारणार नाही', डोनाल्ड ट्रम्प-पुतीन भेटीआधीच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा इशारा
15
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा
16
रिंकूच्या प्रॅक्टिस वेळी खासदार मॅडम प्रिया सरोज यांची थेट ग्राउंडमध्ये एन्ट्री, व्हिडिओ व्हायरल
17
मिस्टर इंडियाप्रमाणे तुरुंगातून गायब कैदी झाला, बाहेर गेला की आतच लपला? काही कळेना, झाडांपासून, गटारांपर्यंत पोलीस घेताहेत शोध  
18
भाजप खासदार निशिकांत दुबे आणि मनोज तिवारी यांच्या विरोधात गुन्हा, वैद्यनाथ मंदिर प्रकरण काय?
19
'शरद पवारांवर राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम' निवडणूक आयोगाबाबत केलेलं वक्तव्य फडणवीसांना खटकलं
20
१५ दिवस चहा प्यायला नाहीत तर काय होईल? तुम्हाला आवडतील शरिरातील 'हे' ५ पॉझिटिव्ह बदल

नळपाणी योजना बंद पडण्याच्या मार्गावर

By admin | Updated: August 11, 2015 23:15 IST

लेखा परीक्षण : आक्षेपामुळे वायंगणे ग्रामपंचायत अडचणीत--भ्रष्टाचाराविरुध्दचा लढा भाग-२

रत्नागिरी : संगमेश्वर तालुक्यातील वायंगणे ग्रामपंचायतीचे स्थानिक निधी लेखा विभागाकडून दोन वर्षांनंतर लेखा परीक्षण करण्यात आले आहे. याच्या अहवालानुसार ग्रामपंचायतीने राबवलेल्या अनेक योजनांमध्ये अनेक आक्षेप निदर्शनास आणल्याने ही ग्रामपंचायत अडचणीत आली आहे. त्यातच दोन वर्षे पाणीपट्टी थकीत असल्याने शासनाने लाखो रूपये खर्च केलेली नळपाणी योजनाही बंद पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. वायंगणे ग्रामपंचायतीचे २०११ - १२ अखेर लेखा परीक्षण करण्यात आले होते. यावेळीही तब्बल ७४ आक्षेप दाखवण्यात आले होते. या त्रुटी पूर्ण करण्याची सूचना देण्यात आली होती. तरीही ग्रामपंचायतीने त्याकडे दुर्लक्ष केले. या परीक्षणावेळी सरपंचपदी प्रणाली घडशी या होत्या, तर रवींद्र लोटणकर हे ग्रामसेवक होते. त्यानंतर २०१२ - १३ आणि २०१३ ते २०१४ या कालावधीत ग्रामपंचायतीचे लेखा परीक्षणच झाले नव्हते. या कालावधी फक्त ग्रामसेवक लोटणकर यांच्याऐवजी व्ही. एस. जाधव यांची नियुक्ती करण्यात आली. या ग्रामपंचायतीच्या अनेक सभांचे इतिवृत्त झालेलेच नाही. अनेक कामांसाठी निविदा न मागविताच त्यावर खर्च दाखवण्यात आला आहे. अनेक ठरावांवर उपस्थित नसलेल्या सदस्यांच्या सह्या असल्याचे अनेक वेळा उघडकीस आले आहे. या गोष्टी निदर्शनास येताच ग्रामपंचायत सदस्य सुरेश घडशी यांनी त्यांच्याविरोधात लढा सुरू ठेवला.लेखा परीक्षणात ग्रामपंचायतीचे गैरव्यवहार उघड होतील, हे लक्षात येताच लेखा परीक्षणासाठीही टाळाटाळ होऊ लागली. मात्र, लोकमतने हे प्रकरण उचलून धरल्याने अखेर दोन वर्षांनंतर का होईना लेखा परीक्षण करण्यात आले. यात अनेक बाबी उघड झाल्या आहेत.ग्रामपंचायतीने वार्षिक उत्पन्नाच्या १५ टक्के रक्कम मागासवर्गीय जाती व जमातींसाठी खर्च करणे बंधनकारक आहे. मात्र, पहिल्या वर्षी (२०१२ - १३) मध्ये २८,१०६ ऐवजी १४,३०० रूपये खर्च करण्यात आले आहेत. यातील ज्या लाभार्थ्यांना लाभ देण्यात आला, त्यांच्या जातीचे दाखलेच ग्रामपंचायतीच्या दफ्तरी नाहीत. दुसऱ्या वर्षी एकही रूपया खर्च झालेला नाही. महिला बालकल्याण योजनेंतर्गतही नियोजित खर्चापेक्षा अधिक खर्च अंगणवाडीसाठी टेबलखरेदीवर दाखवण्यात आला आहे. मात्र, रकमेची पोहोच ग्रामपंचायतीत नाही. अंशदान निधी भरणा केलेला नाही. जमीन महसुलाच्या ३५ टक्के निधी नळपाणी पुरवठ्याकडे वर्ग करणे आवश्यक असतानाही तो वर्ग केलेला नाही. संबंधीत ग्रामपंचायतीने या दोन्ही वर्षात विविध करांपोटी वसुली केल्याचे कुठेही कागदोपत्री दिसलेले नाही. विशेष म्हणजे या दोन वर्षात ग्रामपंचायतीची २४२५ रूपये इतकी पाणीपट्टी थकीत असल्याने नळपाणी योजना बंद पडल्यास या योजनेवरचा लाखो रुपयांचा खर्च वाया जाईल. यासाठी ग्रामपंचायतीला जबाबदार धरण्यात येईल, असे अनेक आक्षेप या अहवालात नोंदविण्यात आले आहेत. (प्रतिनिधी)वायंगणे ग्रामपंचायतीचे स्थानिक निधी लेखा विभागाकडून दोन वर्षांनंतर लेखा परीक्षण.ग्रामपंचायतीने वार्षिक उत्पन्नाच्या १५ टक्के रक्कम मागासवर्गीय जाती व जमातींसाठी खर्च करणे बंधनकारक.पहिल्या वर्षी २८,१०६ ऐवजी १४,३०० रूपये खर्च.लाभार्थ्यांच्या जातीचे दाखलेच ग्रामपंचायतीच्या दप्तरी नसल्याचे उघड.