शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
2
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
3
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
4
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
5
परळ- सीएसएमटी रेल्वे मार्गासाठी स्वदेशी मिल भागातील चाळी पडणार, ७१४ बाधित कुटुंबांचे पुनर्वसन पूर्ण
6
२१ तास बैठक झाली, चर्चा फिस्कटली; जे.डी. व्हान्स अमेरिकेत परतणार, इराणने अटी अमान्य केल्या!
7
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
8
NIRDPR मध्ये जॉब मिळवण्याची संधी; जाणून घ्या पात्रता आणि अर्ज प्रक्रिया!
9
भाजप सरकार बंगालमधील ‘सिंडिकेट राज’ संपवेल, अमित शाह यांचं आश्वासन
10
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
11
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
12
घुसखोरांना बंगाल सोडावेच लागेल, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सक्त इशारा
13
‘....तोपर्यंत मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा नाही’, केरळबाबत काँग्रेसने घेतला मोठा निर्णय
14
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
15
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
16
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
17
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
18
उत्तर प्रदेशात बोट दुर्घटनेतील मृतांची संख्या पोहोचली ११ वर
19
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
20
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
Daily Top 2Weekly Top 5

लाटांमुळे सागरेश्वर येथील वुड हाऊसचे नुकसान,एका बाजूने खचले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2020 14:35 IST

पर्यटनवृद्धीच्या उद्देशाने वेंगुर्ला सागरेश्वर किनारी उभारण्यात आलेल्या वुड हाऊसचे समुद्राच्या लाटांनी प्रचंड नुकसान झाले आहे. या प्रकल्पातील वुड हाऊस एका बाजूने खचले असून समुद्रात वाहून जाण्याच्या स्थितीत आहे. तर चुकीच्या पद्धतीने बांधकाम झाल्याने शासनाचे लाखो रुपये पाण्यात गेल्याचा आरोप येथील ग्रामस्थांनी केला आहे.

ठळक मुद्देलाटांमुळे सागरेश्वर येथील वुड हाऊसचे नुकसान,एका बाजूने खचलेसमुद्रात वाहून जाण्याच्या स्थितीत, चुकीच्या पद्धतीने बांधकाम, लाखो रुपये पाण्यात

वेंगुर्ला : पर्यटनवृद्धीच्या उद्देशाने वेंगुर्ला सागरेश्वर किनारी उभारण्यात आलेल्या वुड हाऊसचे समुद्राच्या लाटांनी प्रचंड नुकसान झाले आहे. या प्रकल्पातील वुड हाऊस एका बाजूने खचले असून समुद्रात वाहून जाण्याच्या स्थितीत आहे. तर चुकीच्या पद्धतीने बांधकाम झाल्याने शासनाचे लाखो रुपये पाण्यात गेल्याचा आरोप येथील ग्रामस्थांनी केला आहे.वेंगुर्ला तालुक्यातील पर्यटनाचा केंद्रबिंदू समजल्या जाणाऱ्या सागरेश्वर किनारी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्यावतीने गेली दीड ते दोन वर्षे या वुड हाऊस प्रकल्पाचे काम सुरू होते. या प्रकल्पाचे जवळजवळ ८० टक्के काम हे पूर्ण झाले होते.काही दिवसांपूर्वी झालेल्या अतिवृष्टीमुळे समुद्राच्या लाटांचा जोर वाढून या प्रकल्पासाठी समुद्रकिनाऱ्यांवर उभारण्यात आलेला पाया हा ढासळण्यास सुरुवात झाली होती. दरम्यान, मागील दोन दिवस पडणाऱ्या पावसामुळे समुद्रालाही मोठे उधाण आले होते. शनिवारी रात्रीपासून समुद्राच्या लाटांचा जोर हा पुन्हा वाढला होता. यामुळे रविवारी पहाटे या प्रकल्पाच्या शेवटी असणारे वुड हाऊस हे एका बाजूने खचले असून ते समुद्रात वाहून जाण्याच्या स्थितीत आहे.दरम्यान, या प्रकारची माहिती मिळताच उभादांडा गावचे ग्रामविकास अधिकारी अरुण जाधव, तलाठी गोरड, ग्रामपंचायत सदस्य मधुकर तिरोडकर, आशु फर्नांडिस, पोलीस पाटील विजय नार्वेकर, भाजप युवा मोर्चा जिल्हा सरचिटणीस हितेश धुरी, भूषण आंगचेकर, ग्रामस्थ डुमिंग डिसोजा यांनी तत्काळ याठिकाणी पाहणी केली. याबाबत पाहणीचा अहवाल आम्ही वरिष्ठ पातळीवर व पर्यटन विकास महामंडळ यांच्याकडे पाठविणार आहोत असे ग्रामविकास अधिकारी जाधव यांनी सांगितले. याबाबत धुरी यांनी महाराष्ट्राचे पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांच्याकडे टिष्ट्वटरद्वारे चौकशीची मागणी केली आहे.सखोल चौकशी करावीएमटीडीसीमार्फत पर्यटनाच्या नावाखाली पैसे कसे पाण्यात घालविले जातात याचे हे उत्तम उदाहरण आहे. या अगोदर जे जे पकल्प एमटीडीसीने या सागरेश्वर किनारी राबविले आहेत ते किती यशस्वी झाले याचाही खुलासा त्यांनी करावा. शासनाने सखोल चौकशी करावी, अशी मागणी भाजप युवा मोर्चा जिल्हा सरचिटणीस हितेश धुरी यांनी केली आहे.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्ग