शहरं
Join us  
Trending Stories
1
"आशिष शेलारांनी एकाच दगडात अनेक पक्षी मारले.."; उद्धव ठाकरेंनी केले कौतुक, नेमकं काय म्हणाले?
2
Gen Z युवकांना सरकार का घाबरतंय?; उद्धव ठाकरेंचा सवाल, शाखेत उभी राहणार 'मतदार ओळख केंद्र'
3
टाटा ट्रस्ट्समध्ये नवा पेच! पुनर्नियुक्ती नाकारल्यानंतर मेहेली मिस्त्री यांचं मोठं पाऊल; सर्वांनाच पाठवली नोटीस
4
राज ठाकरे सकाळी ९च्या गर्दीत बदलापूर-कल्याणला चढून लोकल ट्रेनमध्ये विंडो सीट पकडू शकतील का?
5
एकनाथ खडसेंच्या बंगल्यातून CD, पेनड्राईव्ह, कागदपत्रे चोरी झालेच नाहीत?, पोलीस तपासात काय समोर आलं?
6
पाकिस्तानने अणुबॉम्ब फोडला, डोनाल्ड ट्रम्प यांचा सनसनाटी दावा, दक्षिण आशियात तणाव वाढणार?
7
राज ठाकरेंना दोन लाख मुस्लीम दुबार मतदार का दिसले नाहीत? शेलार म्हणाले, 'अजून वेळ गेलेली नाही'
8
'सीपीआर द्यायचं माहीत नाही, व्हिडीओ काढले'; महिला वकिलाचा कोर्टातच दुर्दैवी मृत्यू, शेजारीच होते रुग्णालय
9
हनिमूनसाठी जोडप्याने बुक केली दुबई ट्रीप, लाखो रुपये दिले; परदेशात पोहोचल्यावर बसला मोठा धक्का!
10
यूपी, बंगाल, तामिळनाडूसह 12 राज्यांमध्ये उद्यापासून SIR प्रक्रिया सुरू; 'या' पक्षांचा तीव्र विरोध...
11
'भुल भूलैया ४'मध्ये अक्षय कुमार-कार्तिक आर्यन एकत्र येणार? चर्चा सुरु; दिग्दर्शक म्हणाले...
12
टिंडरवरची गर्लफ्रेंड महागात पडली! तोंडओळखीतच इंजिनियर तरुण लट्टू झाला अन् कंगाल होऊन बसला! 
13
"मी ऐकलंय की मराठी अभिनेत्रीसोबत त्याचं अफेअर...", गोविंदाबद्दल पत्नी सुनीता आहुजाचा खुलासा
14
₹३४,००० पगार असेल तर ८ व्या वेतन आयोगानंतर किती होईल? जाणून घ्या कॅलक्युलेशन
15
Tulsi Vivah 2025: ज्यांना मुलगी नाही त्यांनाही तुळशी विवाह लावल्याने मिळते कन्यादानाचे पुण्य!
16
चीन-पाकिस्तानसह अमेरिकेलाही एकाचवेळी बसेल चाप; 'बगराम एअरबेस' भारतासाठी किती महत्त्वपूर्ण?
17
OPEC+ Oil Output: आणखी एक अग्निपरीक्षा; ८ देशांनी मिळून घेतला असा निर्णय ज्याचा थेट भारतावर होणार परिणाम, का वाढलं टेन्शन?
18
देशातील सर्वात श्रीमंत राजघराणे! अजूनही जगतात राजेशाही जीवन! कमाईचे मुख्य साधन कोणतं?
19
क्रिकेट लीगसाठी गेल, गप्टिलसह ७० क्रिकेटपटूंना श्रीनगरला नेले, अन् आयोजकच फरार झाले, नेमकं प्रकरण काय? 
20
IAS Anuradha Pal : स्वप्न होती मोठी! घरची परिस्थिती बिकट, वडील विकायचे दूध; लेक झाली IAS, डोळे पाणावणारी गोष्ट

पाणलोटचे कर्मचारी अद्याप वाऱ्यावरच

By admin | Updated: November 27, 2015 00:14 IST

प्रश्न जैसे थे : देवरूख तहसीलदारांना निवेदन सादर

सचिन मोहिते -- देवरुख--एकात्मिक पाणलोट व्यवस्थापन कार्यक्रमांतर्गत तालुका कृषी कार्यालय, संगमेश्वर (देवरुख) येथे कार्यरत असणाऱ्या आठ कंत्राटी कर्मचाऱ्यांचा प्रश्न अद्याप मार्गी लागलेला नाही. तालुका कृषी कार्यालयाने त्यांना सध्या वाऱ्यावरच सोडल्याने स्थानिकांमधून त्याचे पडसाद उमटत आहेत. गेल्या महिन्यापासून आपली व्यथा मांडणाऱ्या त्या आठ कर्मचाऱ्यांनी गुरुवारी देवरुख तहसीलदारांना याबाबत निवेदन देऊन आपल्याला न्याय न मिळाल्यास तीव्र आंदोलन छेडावे लागेल, असा इशारा दिला आहे.एकात्मिक पाणलोट विकास व्यवस्थापन कार्यक्रमामध्ये प्रकल्प स्तरावर तीन प्रकारच्या पाणलोट विकास पथक सदस्यांच्या सेवा कंत्राटी स्वरुपात आवश्यकतेनुसार घेण्याची तरतूद केंद्र शासनाने सामायिक मार्गदर्शक सूचना २००८ (सुधारित २०११) नुसार केली आहे. यानुसार हे स्थानिक आठ कर्मचारी कृषितज्ज्ञ, समूह संघटक, उपजीविकातज्ज्ञ अशा पदांवर कार्यरत होते. त्यांनी पाच वर्षांपेक्षा अधिक कालावधी कंत्राटी कर्मचारी म्हणून सेवा दिली आहे. त्यांची नियुक्ती ३० सप्टेंबर २०१५ पर्यंत करण्यात आली होती. मात्र, प्रकल्पाच्या आवश्यकतेप्रमाणे त्यांना पुन्हा सामावून घेण्याचेही निर्देश त्या परिपत्रकात (शासन निर्णयात) असताना संगमेश्वर तालुका कृषी अधिकारी त्या आठ स्थानिक कामगारांना हेतुपुरस्सर डावलण्याचा प्रयत्न करत असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.जिल्हाभरात अन्य तालुक्यांतून प्रकल्प पूर्ण झालेले नसल्याने अशा कंत्राटी कर्मचाऱ्यांना कोणतीही परीक्षा, मुलाखत अशी कोणतीही विनंजीअर्ज न घेता पुन्हा सामावून घेण्यात आले आहे. मात्र, संगमेश्वर तालुक्यातच या आठ कंत्राटी कर्मचाऱ्यांना सामावून का घेण्यात येत नाही, असा सवाल या आठजणांनी उपस्थित केला आहे. आपल्यावर अन्याय होत असल्याने त्या आठही कर्मचाऱ्यांनी स्थानिक लोकप्रतिनिधी, नेते, सामाजिक संस्था आणि आमदारांपर्यंत आपली कैफियत मांडली आहे. यावेळीच त्यांनी तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांना जाब विचारण्यासाठी वेळोवेळी जाण्याचा प्रयत्न केला होता. तब्बल तीन-चारवेळा या अधिकाऱ्यांनी अन्य ठिकाणी काम काढून त्यांना सामोरे जाण्याचे टाळल्याचे स्पष्ट झाले आहे.दरम्यान, लोकप्रतिनिधींचे सहकार्य आणि लोकमतच्या वृत्तामुळे त्यांची दखल वरिष्ठ कार्यालयाने घेतली होती. मात्र, संबंधित तालुका कृषी अधिकाऱ्यांनी प्रत्येकाचे वैयक्तिक विनंती अर्ज मागवले होते. मात्र, यावर या आठजणांनी विनंती अर्जाची गरजच काय, असा सवाल करत नियमाप्रमाणे आम्हाला पुन्हा सामावून घ्या, असे स्पष्ट केले आहे.मात्र, या साऱ्या पार्श्वभूमीवर त्या आठ कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नावर अजूनही तालुका कृषी कार्यालय ठोस भूमिका घेत नसल्याने या कर्मचाऱ्यांनी अखेर गुरुवारी देवरुख तहसीलदारांना निवेदन दिले. यामध्ये म्हटले आहे की, वरिष्ठ कार्यालयाचा आदेश असतानाही आम्हाला पुन्हा सेवेत घेत नसल्याने या अन्यायाविरोधात आपण तीव्र आंदोलनाची भूमिका घेऊ. याबाबत तहसीलदार वैशाली माने यांनी सांगितले की, येत्या दोन दिवसात तुमचा प्रश्न मार्गी लावू, अशी खात्री दिली आहे.मनमानी : तीव्र आंदोलनाचा इशाराअनेक दिवसांपासून एकात्मिक पाणलोट व्यवस्थापन कार्यक्रम राबवणाऱ्या कर्मचाऱ्यांचा विषय ऐरणीवर आला आहे. या कर्मचाऱ्यांनी त्यांच्या विविध प्रश्नांबाबत आवाज उठवला, याबाबत आंदोलनेही करण्यात आली. मात्र त्याकडे संबंधित अधिकारी दुर्लक्ष करत असल्याने या कर्मचाऱ्यांनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली आहे. आता याबाबत तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात देण्यात आला आहे.आमदारांचे दुर्लक्षस्थानिक लोकप्रतिनिधी, सामाजिक संस्था आणि आमदारांपर्यंतही हा विषय नेण्यात आला. तरीही हा प्रश्न सुटलेला नाही.