शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

जलव्यवस्थापन सभा वादळी

By admin | Updated: April 13, 2016 23:33 IST

ग्रामीण पाणीपुरवठा विभाग दोषी : वैभववाडीतील विविध कामांवरून खडाजंगी

सिंधुदुर्गनगरी : जिल्हा ग्रामीण पाणी पुरवठा विभागामार्फत करण्यात आलेल्या कामाचा थेट पंचनामा जिल्हा परिषद अध्यक्ष संग्राम प्रभूगावकर व सभापती दिलीप रावराणे यांनी केला. धनगरवाड्यांमध्ये पाण्याची व्यवस्था न करणे, वैभववाडी तालुक्यातील लोरे नं. २ येथील नळपाणी पुरवठा योजनेत आर्थिक अपहार झाला असताना संबंधितांवर कारवाई करताना चालढकलपणा करणे, वैभववाडीतील नळपाणी योजनेची कामे एकाच ठेकेदाराला देणे यासह आदी विषयांवर आजची जलव्यवस्थापन समिती सभा चांगलीच वादळी ठरली. याप्रकरणी ग्रामीण पाणीपुरवठा विभागाला दोषी ठरवत आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करण्यात आले.जिल्हा परिषद जलव्यवस्थाप व स्वच्छता समितीची सभा अध्यक्ष संग्राम प्रभूगावकर यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी झाली. यावेळी उपाध्यक्ष एकनाथ नाडकर्णी, विषय समिती सभापती दिलीप रावराणे, आत्माराम पालेकर, रत्नप्रभा वळंजू, अंकुश जाधव, समिती सदस्य जर्नादन तेली, पंढरीनाथ राऊळ, वासुदेव परब, सुगंधा दळवी, भारती चव्हाण, संजिवनी लुडबे, समिती सचिव तथा अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी आर. के. जोशी तसेच अधिकारी खातेप्रमुख उपस्थित होते.बुधवारी झालेली सभा विविध विषयांवर गाजली. वैभववाडी तालुक्यातील लोरे नं. २ येथील नळपाणी पुरवठा योजनेत आर्थिक अपहार झाल्याचे चौकशी अंती स्पष्ट होऊन सुमारे दीड महिने लोटले तरी, संबंधित ठेकेदार व पाणी पुरवठा अध्यक्षांवर कोणती कारवाई केली, अशी विचारणा सभागृहात करण्यात आली. या मुद्द्यांवर स्पष्टीकरण देताना संबंधितांना मंगळवारी कारणे दाखवा नोटीस पाठविण्यात आले आहे, असे मराठे यांनी सांगितले. संबंधितांवर कारवाई करण्याचे गेल्या महिन्यात ठरले असतानाही कारवाई करण्यास विलंब का लागला? असा जाब जिल्हा परिषद अध्यक्षांनी मराठेंना विचारले. सात दिवसात याबाबतचा खुलासा मागवा व तो अमान्य असल्यास संबंधितांवर फौजदारी दाखल करा, असे आदेश यावेळी देण्यात आले. यामुळे काहीकाळ वातावरण संतप्त बनले होते. (प्रतिनिधी)‘ते’ ७0 लोक : केसरी गावचे नसल्याचा ग्रामपंचायतीचा अहवालकेसरी गावात तब्बल ७0 लोकसंख्या वस्तीची धनगरवाडी असून याठिकाणी सध्या भीषण पाणीटंचाई उद्भवली आहे. असे असताना केसरी ग्रामपंचायत मात्र, हे ७0 लोक आमच्या गावचे रहिवासी नसल्याचे सांगत आहेत. अशी माहिती पंढरीनाथ राऊळ यांनी दिली. याची जिल्हा परिषद अध्यक्ष संग्राम प्रभूगावकर यांनी गंभीर दखल घेत त्याठिकाणी तत्काळ बोअरवेल मंजूर केली. गेली कित्येक वर्षे ही लोक त्या गावात राहत असतील आणि संबंधित ग्रामपंचायत त्यांना रहिवासी नसल्याचा अहवाल देत असतील तर ते गंभीर आहे. या प्रकरणी चौकशी करून जो कोणी दोषी असेल त्याच्यावर कारवाई करा, असे आदेश संग्राम प्रभूगावकर यांनी दिले.जाधव यांच्या सूचनांची दखलच नाहीमी चार वर्षे पदाधिकारी म्हणून सातत्याने धनगरवाडीत पाणीपुरवठा व्हावा, यासाठी प्रयत्न करत आहे. मात्र, अद्याप त्यावर काहीच उपाय काढता आलेला नाही. माझ्या चार वर्षाच्या कारकिर्दीत अजूनपर्यंत योजना होऊ शकत नाही. माझ्या पाठपुराव्याचा काय उपयोग ? असा प्रश्न अंकुश जाधव यांनी सभागृहात उपस्थित केला. मात्र, यावर कोणीच जास्त खोलात न जाता हा विषय येथेच थांबविण्यात आला.