शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
3
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
4
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
5
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
6
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
7
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
8
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
9
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
10
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
11
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
12
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
13
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
14
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
15
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
16
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
17
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
18
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
19
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
20
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
Daily Top 2Weekly Top 5

प्रतीक्षा स्मशानशेडच्या दुरूस्तीची

By admin | Updated: August 5, 2014 00:20 IST

रहिवाशांमध्ये नाराजी : निर्णय कधी होणार याकडे लक्ष

चिपळूण : तीन महिन्यांपूर्वी वादळी वाऱ्याने उद्ध्वस्त झालेली उक्ताड येथील स्मशानशेड दुरुस्त करण्यासाठी नगर परिषद प्रशासनाला अद्याप वेळ मिळालेला नाही. एखादी दुर्दैवी घटना घडल्यास पत्र्याचा आधार घेऊन अंत्यसंस्कार करण्याची वेळ येथील रहिवाशांवर आली आहे. या साऱ्या प्रकाराबद्दल रहिवाशांमध्ये नाराजीचा सूर असून, नगर परिषद कार्यालयावर प्रेतयात्रा मोर्चा काढण्याचा इशारा देण्यात आला आहे. प्रभाग क्रमांक ४ मध्ये अंदाजे ६ हजारांपर्यंत लोकसंख्या आहे. खेंड चौक, खेंड बडदेवाडी, उक्ताड कानसेवाडी आदी भागात एखादी व्यक्ती मृत झाल्यास तिच्यावर अंत्यसंस्कार करण्यासाठी उक्ताड येथे अंत्यसंस्कार करण्यासाठी स्मशानशेड बांधण्यात आली आहे. मात्र, ७ मे रोजी झालेल्या चक्रीवादळाने ही शेड उद्ध्वस्त झाली आहे. यामुळे अंत्यसंस्काराचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. तत्कालीन नगराध्यक्ष रिहाना बिजले व अन्य सहकाऱ्यांनी या शेडची पाहणी करुन अहवाल प्रशासनाकडे सादर केला आहे. मात्र, तीन महिन्यांचा कालावधी झाला तरी नादुरुस्त शेड दुरुस्त करण्यात आली नसल्याने या परिसरातील रहिवाशांमध्ये नाराजीचा सूर आहे. वारंवार सभेमध्ये चर्चा करुनही शेडचे काम लवकरच होईल, असे आश्वासन सत्ताधारी गटाकडून दिले जात आहे, अशी खंत शिवसेनेच्या नगरसेवक सुरेखा खेराडे यांनी व्यक्त केली आहे. उक्ताड परिसरात शौचालयाचीही दुरवस्था आहे. याबाबत गेली दोन वर्षे महिलांनी आपली गाऱ्हाणे नगर प्रशासनाकडे मांडूनही अद्याप गांभीर्याने दखल घेण्यात आलेली नाही. नागरिकांना योग्य त्या सेवा सुविधा मिळाल्या पाहिजेत. मग तो कोणत्या पक्षाचा आहे हे न पाहता सेवा देणे प्रशासनाचे काम असताना याकडे सत्ताधारी जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहेत. दुर्लक्ष होत असल्याने प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी नगर परिषद कार्यालयावर येत्या काही दिवसांत प्रेतयात्रा मोर्चा काढण्यात येईल, असा इशारा नगरसेवक खेराडे यांनी दिला आहे. (वार्ताहर)