शहरं
Join us  
Trending Stories
1
“PM मोदींच्या नेतृत्वाखालील सक्षम, नवीन भारत आपले परराष्ट्र धोरण स्वतः ठरवतो”: CM फडणवीस
2
गोपाळ शेट्टींसह मेहता, गुप्ता, मिश्रा अन् शर्मा यांच्यावर मुंबई भाजपानं दिली मोठी जबाबदारी
3
अमेरिका निघाली होती रशियाला पंगू बनवायला, आता स्वतःवरच आली अंडी खरेदीची वेळ! ३२ वर्षांत पहिल्यांदाच...
4
CM फडणवीसांकडून ग्रीन सिग्नल मिळताच अजित पवार गटाला बसणार झटका?; भाजपा आमदार लागले कामाला
5
राज ठाकरेंना मिळणार खास मान...यंदाचा शिवसेनेचा 'दसरा मेळावा' ठाकरे बंधू गाजवणार?
6
जगातील सगळ्यात महागडी शाळा; वर्षाची फी तब्बल १,१३,७३,७८० रुपये! आहे तरी कुठे नक्की?
7
चंद्रग्रहण २०२५: तुमच्या राशीनुसार करा ‘हे’ दान, धनवान बनाल; कल्याण होईल, सुख-सुबत्ता लाभेल
8
DCM अजित पवार अन् पोलीस अधिकारी अंजना कृष्णा यांच्यात नेमका काय झाला संवाद? वाचा शब्द न् शब्द
9
भारत, पाकिस्तान, अमेरिका अन् जपानमध्ये आपत्ती येणार; बाबा वेंगाची 'ती' भविष्यवाणी खरी होणार?
10
ATM मधून पैसे काढताना तुम्हीही दोनदा Cancel बटन दाबता का? खरंच कामाची आहे का ही ट्रिक
11
VIRAL : खोदकाम करताना सापडलं १९९७चं जलजीऱ्याचं पाकिट; पण सोशल मीडियावर का होतंय व्हायरल?
12
“...तोपर्यंत मराठा समाजाला कायमस्वरूपी टिकणारे आरक्षण मिळणार नाही”: बाळासाहेब थोरात
13
BCCI नं श्रेयस अय्यरला दिलं कॅप्टन्सीचं गिफ्ट; ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या मालिकेसाठी असा आहे भारतीय संघ
14
'तो खोटं बोलला, हॉटेलमध्ये जाताच त्याने माझी...'; विधवा सासूने जावयावर केला खळबळजनक आरोप
15
“आज BJP आहे, उद्या बाजी पलटेल, काँग्रेस सत्तेत येईल”; कोणत्या नेत्यांनी व्यक्त केला विश्वास?
16
५०० वर्षांनी चंद्रग्रहणात शुभ योग: ५ राशींचे पंचक सुटेल, लाभ मिळेल; ४ राशींनी सावध राहावे!
17
मनोज जरांगे पाटलांचा फॉर्म्युला ‘हिट’, शेतकरी, धारावी पुनर्वसन आंदोलन याच मार्गाने जाणार?
18
Raja Raghuvanshi : कट, खून अन् पुरावे... मेघालय पोलिसांनी तब्बल ७९० पानांमध्ये नोंदवला सोनम रघुवंशी आणि राजचा गुन्हा!
19
जीएसटी कपातीमुळे कुटुंबाच्या मासिक खर्चात होणार बचत; पण वाचलेल्या पैशांची कुठे, कशी गुंतवणूक कराल?
20
रश्मिका मंदानाने घातली डायमंड रिंग, विजय देवरकोंडाशी झाला साखरपुडा? चर्चांना उधाण

किल्ल्याला ‘अच्छे दिनां’ची प्रतीक्षा

By admin | Updated: November 23, 2014 00:38 IST

शिवछत्रपतींचे खरे स्मारक : उद्धव ठाकरेंच्या भेटीकडे लक्ष

संदीप बोडवे ल्ल मालवणमुंबईजवळील अरबी समुद्रात हजारो कोटी रूपये खर्च करून कथित शिवस्मारक उभारले जाणार आहे. दुसरीकडे औरंगाबाद जिल्ह्यातील बीबीका मकबरा आणि दौलताबाद किल्ल्याला जागतिक वारसा घोषित करण्यासाठी पावले उचलली जात असतील तर छत्रपतींचे खरेखुरे स्मारक असलेल्या सिंधुदुर्ग किल्ल्याला आता तरी अच्छे दिन येतील काय? असा प्रश्न शिवप्रेमींमधून उपस्थित होत आहे. रविवारी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे सिंधुदुर्ग किल्ल्याला भेट देणार आहेत. ठाकरे यांच्या जिल्हा भेटीकडे जिल्ह्यातील शिवप्रेमींचे लक्ष लागून राहिले आहे.विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या यशानंतर जिल्हावासीयांचे आभार मानण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे कोकण दौऱ्यावर आले आहे. रविवारी ठाकरे सिंधुदुर्ग किल्ल्याला भेट देवून शिवछत्रपतींचे दर्शन घेणार आहेत. ठाकरे यांच्या दौऱ्यामुळे किल्ल्यासंदर्भातील अनेक प्रश्न मार्गी लागतील, अशी अपेक्षा केली जात आहे. मुंबई जवळील अरबी समुद्रात शिवछत्रपतींचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे भव्य स्मारक बांधण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतला आहे. मात्र, शिवाजी महाराजांचे एकमेव मंदिर असलेल्या सिंधुदुर्ग किल्ल्याच्या वाट्याला नेहमीच उपेक्षा आली आहे. कृत्रिम शिवस्मारकासाठी शासनाने हजारो कोटी रूपये खर्च करण्याचा घाट घातला असतानाच दुसरीकडे शिवस्मारकाकडे राज्य शासनाने आतापर्यंत जाणूबुजून दुर्लक्ष केले आहे. साहजिकच अरबी समुद्रात शिवस्मारक बांधण्याचा निर्णय घेणाऱ्या राज्य शासनाचे कौतुक होत असताना ऐतिहासिक वारशाबद्दल उदासिन असल्याचा आरोपही जिल्हावासीयांकडून नेहमीच होत आहे.शिवाजी महाराजांच्या आरमारी दलाची साक्ष देणारा अभेद्य सिंधुदुर्ग किल्ला हा ऐतिहासिकदृष्ट्या कितीतरी महत्वाचा आहे. या किल्ल्याला आता साडेतिनशे वर्षे पूर्ण होणार आहेत. जिल्ह्यातील पर्यटनाचा मानबिंंदू म्हणून सिंधुदुर्ग किल्ल्याकडे संपूर्ण जग पाहत आहे. बिबीका मकबरा आणि दौलताबाद किल्ल्याला जागतिक वारसा घोषित करण्यासाठी भारतीय पुरातत्व विभागाकडून प्रयत्न करण्यात आले असतानाच ‘चौऱ्यांशी बंदरा ऐसा जागा, दुसरा नाही’ असे वर्णन केलेल्या शिवलंकेला चांगले दिवस यावेत. अशी अपेक्षा शिवप्रेमी करत आहेत. सिंधुदुर्ग किल्ल्यावर छत्रपती राजाराम महाराजांनी १६९५ साली स्थापन केलेले एकमेवाव्दितीय असे शिवछत्रपतींचे मंदिर आहे. हेच खरेखुरे छत्रपतींचे स्मारक आहे. या स्मारकाची जपणूक व्हावी, अशी मागणी शिवप्रेमींची आहे.सिंधुदुर्ग किल्ला राष्ट्रीय स्मारक म्हणून गौरविला जावा. किल्ल्याची पडझड थांबवावी. मंदिर आणि ऐतिहासिक ठेव्यांचा जीर्णोद्धार व्हावा आणि सिंधुदुर्ग किल्ल्यावर प्रशस्त उद्यान बांधण्यात यावे. तसेच वृक्षलागवड करण्यात यावी. अशी शिवप्रेमींची इच्छा आहे.४ एकीकडे संस्कृती व पर्यटनाचे प्रतिक असलेला सिंधुदुर्ग किल्ला आता शासनाकडून दुर्लक्षित होणे हे दुर्दैवी आहे. ढासळत चाललेले बुरूज, पडझड झालेली तटबंदी, वैराण माळरान, जीर्ण झालेले ऐतिहासिक ठेवे, मंदिराची दुरवस्था, सोयी सुविधांचा अभाव, प्लास्टिक प्रदूषणाचा विळखा यामुळे सिंधुदुर्ग किल्ल्याचे बकाल चित्र पर्यटकांमार्फत जगासमोर जात आहे.