शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

वाफोली धरण ‘ओव्हर फ्लो’

By admin | Updated: July 25, 2016 00:25 IST

सह्याद्री पट्ट्यात संततधार सुरुच : पर्यटकांसाठी धबधब्यांचे आकर्षण

ओटवणे : सह्याद्री पट्ट्यात पावसाची संततधार सुरू आहे. यंदा पाऊस नियमित असल्याने वाफोली धरण जुलैच्या सुरूवातीस तुडुंब भरले आहे. वाढत जाणाऱ्या पावसामुळे धरण ओव्हरफ्लो झाले असून त्यामुळे निसर्गाचा एक नवीन आविष्कार येथे पहावयास मिळत आहे. धरणातून बाहेर पडणाऱ्या पाण्याने सुंदर, मनमोहक असा धबधबा येथे निर्माण झाला असून हे ठिकाण सध्या पर्यटकांसाठी आकर्षण ठरत आहे. बांदा-दाणोली या मार्गावर वाफोली येथील हे धरण आणि निर्माण झालेला सुंदर धबधबा प्रवाशांच्या तसेच पर्यटकांच्या दृष्टीस पडतो. गोवा राज्यातून आंबोली या थंड हवेच्या ठिकाणी जाणाऱ्या पर्यटकांची गर्दी सध्या वाढत आहे. आंबोलीत उंचावरून फेसाळत कोसळणारे धबधबे पाहण्यासाठी, आंघोळीची मजा लुटण्यासाठी गोवा तसेच अन्य ठिकाणच्या पर्यटकांची ये-जा सुरू आहे. आंबोली येथे जाण्यासाठी बांदा-दाणोली हा पर्यायी आणि सुलभ रस्ता असल्याने या मार्गानेच गोवा राज्यातील पर्यटक प्रवास करतात. या मार्गावर वाफोली येथे धरणाच्या पाण्याच्या विसर्गाने आकर्षक असा धबधबा निर्माण झाला आहे. त्यामुळे वाटसरू पर्यटक नकळत आणि कुतुहलाने काही क्षण या धबधब्याखाली मौजमस्ती करतात. अगदी रस्त्यालगतच हा धबधबा निर्माण झाल्याने पर्यटकांची पावले नकळत याठिकाणी वळत आहेत. निसर्गाचा हा आविष्कार वाफोली येथील वैशिष्ट्य ठरत असून, या ठिकाणानजीक साफसफाई व काही प्रमाणात दुरूस्ती केल्यास पर्यटकांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. त्यासाठी शासनस्तरावरून प्रयत्न होणे गरजेचे आहे. (प्रतिनिधी) साफसफाई आवश्यक : शासनस्तरावरुन प्रयत्नांची गरज ४निसर्गाचा हा आविष्कार वाफोली येथील वैशिष्ट्य ठरत असून, या ठिकाणानजीक साफसफाई व काही प्रमाणात दुरूस्ती केल्यास पर्यटकांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. त्यासाठी शासनस्तरावरून प्रयत्न होणे गरजेचे आहे.