शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

‘सी-वर्ल्ड’ ला वायंगणी सरपंचांचे समर्थन

By admin | Updated: December 10, 2015 22:15 IST

मालवण तालुका सरपंच समिती सभा : आचरा सरपंचांनी मांडला ठराव

मालवण : सी-वर्ल्ड (ओशियानिक वर्ल्ड) प्रकल्पाबाबत शासन स्तरावर गतिमान हालचाली सुरु असताना प्रकल्पाला तीव्र विरोध दर्शवणाऱ्या वायंगणी गावातून प्रकल्पास समर्थन प्राप्त झाले आहे. मालवण तालुका सरपंच समितीच्या बैठकीत आचरा सरपंच मंगेश टेमकर यांनी वायंगणी-तोंडवळी येथे होत असलेल्या कमी जागेतील सी-वर्ल्ड प्रकल्पाचा प्रारंभ लवकरात लवकर व्हावा, असा ठराव घेतला. यावेळी वायंगणी सरपंच प्रज्ञा धुळे यांनी स्थानिक ग्रामस्थांना विश्वासात घेवून प्रकल्प साकारला जावा, असे सकारात्मक विधान केल्याने प्रकल्पाला गावातून विरोध मावळत असल्याची स्थिती समोर आली आहे.सरपंच समितीची सभा मालवण पंचायत समिती येथे उपसभापती देवानंद चिंदरकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी आचरा सरपंच मंगेश टेमकर, वायंगणी सरपंच प्रज्ञा धुळे, तारकर्ली सरपंच मोहन केळुसकर, गुरामवाड सरपंच किशोरी काराणे, गोळवण सरपंच प्रज्ञा चव्हाण आदी सरपंच उपस्थित होते. आज २५ वर्षांनी हा अहवाल तयार झाला. त्या कालावधीत जी घरे बांधली गेली, ज्यांना ग्रामपंचायतीनी परवानगी दिली ती अनधिकृत न ठरविता अधिकृत जाहीर व्हावीत असे सांगत किनारपट्टीवरील मच्छिमारांना १०० मीटर क्षेत्रात विशेष सवलत मिळावी, असे उपसभापती देवानंद चिंदरकर यांनी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)सरपंचांच्या दाखला अधिकारावर गदाशासनाच्या नव्या निर्णयानुसार सरपंचाना दाखले देण्याचे अधिकार गोठवण्यात आले आहेत. याबाबत सरपंच समितीत तीव्र स्वरुपात नाराजी व्यक्त करण्यात आली. एकीकडे शासन ग्रामपंचायतीना विकास निधी वाढवत असताना अशाप्रकारे दाखल्याने अधिकार हिरावून घेतल्याने व ग्रामसेवकांना ते अधिकार दिल्याने सरपंचाचा उपयोग केवळ चेकवरील सही आणि प्रस्ताव पाठविण्यासाठीच की काय असा सवाल उपस्थित करण्यात आला. कांदळवनाची नोंदशासनाकडून कांदळवन क्षेत्र घोषित करण्यात आले आहे. मात्र ज्या ग्रामस्थांच्या खासगी जमिनीत सातबारावर माड बागायती म्हणून नोंद आहे ते बागायती क्षेत्र काही ठिकाणी कांदळवन म्हणून जाहीर झाले आहे. याबाबत नाराजी व्यक्त करण्यात आली. तर आचरा गावात जी शासनाची जमीन होती ती खासगी लोकांना दिली आहे, ते क्षेत्र कांदळवन असल्याचे टेमकर यांनी सांगितले. तर सीआरझेड क्षेत्र निश्चिती करताना वर्ग १ -५०० मीटर, वर्ग २-२०० मीटर, वर्ग ३- १०० मीटर अशा प्रमाणात सीआरझेडचे वर्गीकरण आहे. १९९१ पासून शासनाने हा अहवाल तयार करण्यास सांगितला. घरपट्टी वाढीबाबत४२५ हरकतीशासनाच्या नव्या निर्णयानुसार घरपट्टी नव्या घरांना तिप्पट वाढली आहे. तर जुन्या घरांना घसारा वजा करून घरपट्टी वसूल करायची आहे. शासन निर्णयाविरोधात ४२५ हरकती प्राप्त झाल्या आहेत. वाढीव घरपट्टी नव्या घरांना अन्यायकारक आहे असे सांगत या बैठकीत शासनाकडून घरपट्टी वसुलीबाबत सॉफ्टवेअर ग्रामपंचायतीना उपलब्ध करून द्यावे त्यानुसार घरपट्टी वसूल करणे सुलभ होईल असे सरपंच टेमकर यांनी सुचित केले.