शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

रेडी येथील ग्रामस्थांचा वीज अभियंत्याला घेराओ

By admin | Updated: June 10, 2014 01:36 IST

रेडी परिसरात वीजपुरवठा वारंवार खंडित होत आहे. त्यामुळे संतप्त झालेल्या वीजग्राहकांनी रेडी कार्यालयाचे कनिष्ठ अभियंता राकेश कुंंभार यांना घेराव घालून धारेवर धरले.

रेडी : रेडी परिसरात गेले काही दिवस कोणत्याही वेळी पूर्वकल्पना न देता वीजपुरवठा वारंवार खंडित होत आहे. त्यामुळे संतप्त झालेल्या वीजग्राहकांनी विद्युत वितरण कंपनीच्या कार्यालयावर धडक देत रेडी कार्यालयाचे कनिष्ठ अभियंता राकेश कुंंभार यांना घेराव घालून धारेवर धरले. रेडी हा औद्योगिक गाव आहे. या गावात सुमारे २५०० वीजग्राहक आहेत. त्यामुळे विद्युत वितरण कंपनीला वीजबिलापोटी मोठ्या प्रमाणात उत्पन्न मिळत असते. परंतु रेडी गावात अल्प वीज कर्मचारी असल्याने ग्राहकांच्या तक्रारींचे वेळीच निराकारण होत नाही. गावातील वीज खांबांवरील जीर्ण झालेल्या तारा वारंवार तुटून पडतात. विद्युत तारांवरील झाडी पावसाळ्यापूर्वी तोडण्यात आलेली नाही. त्यामुळे सध्या दिवस-रात्र वारंवार विद्युत पुरवठा खंडित होतो. याचा परिणाम विजेवर चालणाऱ्या व्यवसायांवर होऊन नुकसान होत आहे. विजेचे पंखे बंद राहिल्याने उष्मा आणि डासांमुळेही जनता हैराण होत आहे. तसेच बदली झालेले कर्मचारी गजा कांबळी हे पुन्हा रेडी येथे आल्यापासून विजेच्या तक्रारी वाढल्याचे कनिष्ठ अभियंता कुंभार यांच्या निदर्शनास आणून कांबळी यांची बदली करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली. वीज पुरवठ्यात सुधारणा न के ल्यास वीजबिले भरणार नाही, असा इशारा देण्यात आला. कनिष्ठ अभियंता म्हणून रेडी येथे नेमणूक झाली असूनही तुम्ही वेंगुर्लेत का राहता, अशी विचारणा कुं भार यांना करण्यात आली. यावर त्यांनी रेडी येथे मुक्कामासाठी राहण्याचे मान्य केले. तसेच मळेवाड-आरोंदा रेडी या समस्याग्रस्त फिडरला पर्याय म्हणून शिरोडा फिडरमधून वीजपुरवठा देण्याचे मान्य केले. तसेच वीज कर्मचाऱ्यांना दूरध्वनीवरून संपर्क साधला असता ते फोन उचलत नाहीत किंवा अन्य कोणीतरी फोन उचलून ते बाहेर गेल्याचे सांगतात, अशी तक्रार ग्राहकांनी केली. यावेळी वीज कर्मचाऱ्यांना तातडीने पाचारण करून वीजग्राहकांसमोर त्याला समज देण्यात आली. यावेळी अजित सावंत, उपसरपंच दीपक राणे, ग्रामपंचायत सदस्य चक्रपाणी गवंडी, राजेंद्र राणे, स्वप्निल नाईक व इतर उपस्थित होते. (वार्ताहर)