शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
6
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
7
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
8
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
9
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
10
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
11
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
12
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
13
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
14
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
15
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
16
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
17
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
18
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
19
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
20
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
Daily Top 2Weekly Top 5

पर्यटनातूनच गावचा विकास

By admin | Updated: June 5, 2016 00:09 IST

शेखर सिंह : विजयदुर्गमध्ये सर्कीट आराखडा सादरीकरण

देवगड : जनतेची संकल्पना त्यांचे विचार घेतल्याने एखादी योजना दिर्घकाळ टिकू शकते, यामुळेच पर्यटनाच्या दृष्टीकोनातून विजयदुर्ग सर्कीटचा आराखडा तयार करण्यात आला आहे. पर्यटन एके पर्यटनाच्या माध्यमातून गावचा विकास होऊ शकतो, यामुळे लोकांना रोजगार मिळू शकतो यासाठी पर्यटनाला चालना देण्यासाठी लोकांचा उत्साह आणि सहभाग महत्वाचा आहे, असे मत जिल्ह्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी शेखर सिंह यांनी विजयदुर्ग येथे व्यक्त केले. विजयदुर्ग येथे कोकण ग्रामीण पर्यटनांतर्गत ग्रामीण पर्यटन विजयदुर्ग सर्कीट आराखड्याचे सादरीकरण शनिवारी करण्यात आले. हा आराखडा रचना संसदच्या विद्यार्थ्यांनी सादर केला. यावेळी उपसचिव लिना बनसोड, उपमुख्यकार्यकारी अधिकारी रणदिवे, देवगड तहसीलदार जीवन देसाई, गटविकास अधिकारी विजय चव्हाण, ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे देशमुख, माजी आमदार प्रमोद जठार, विजयदूर्ग सरपंच महेश बिडये आदी उपस्थित होते. यावेळी बोलताना शेखर सिंंह म्हणाले की, रचना संसदच्या विद्यार्थ्यांनी विजयदुर्ग, गिर्ये, तिर्लोट, वाघोटण, पोंभुर्ले, मालपे या गावांमध्ये पर्यटन सर्कीट तयार केले असून या सर्कीटला विजयदुर्ग सर्कीट असे नाव देण्यात आले आहे. अतिशय विवेकबुध्दीने येथील जनतेची संकल्पना घेऊन, येथील गावची परंपरा अबाधित राखून पर्यटन वाढीसाठी आपण काय केले पाहिजे. हे यात नमूद करण्यात आले आहे. पर्यटक वाढले पाहिजेत या दृष्टीकोनातून काम केले पाहिजे. पर्यटनाच्या माध्यमातून गोवा राज्याने मोठी प्रगती केली आहे. यामुळे आपणही गोवा राज्याच्या पूढे जाऊन पर्यटनाची प्रगती केली पाहिजे. कारण गोवा राज्यापेक्षाही कोकणामध्ये विशेषत: सिंंधुदुर्गमध्ये आणि त्यातून देवगडमध्ये अतिशय सुंंदर पर्यटन स्थळे आहेत. विजयदुर्ग, गिर्ये, तिर्लोट, वाघोटण, पोंभुर्ले, मालपे या २७ किलोमीटर अंतर असलेल्या गावांमध्ये रचना संसदच्या विद्यार्थ्यांनी गेली सहा महिने पर्यटनाच्या दृष्टीकोनातून अभ्यास करून येथील जनतेच्या समस्या, पारंपरीक पध्दती, येथील संस्कृती, येथील पारंपरिक नृत्य याची माहिती घेऊन आराखडा तयार करण्यात आला आहे. या पाचही गावांमध्ये खाडी असून या खाडींमध्ये पर्यटन बोटींची सोय कशा पध्दतीने केली पाहिजे. अशा विचारांची सांगड घालून विजयदुर्ग सर्कीट ग्रामीण पर्यटन आराखड्याचे सादरीकरण केले आहे. (प्रतिनिधी)