शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

मागण्या लक्षात घेऊन कार्यवाही

By admin | Updated: June 13, 2015 00:20 IST

अनंत गीते : मुंबई-गोवा महामार्ग चौपदरीकरणाबाबत बैठक

सिंधुदुर्गनगरी : जास्तीत जास्त धोरण लवचिक ठेवून कमीत कमी नुकसान, जास्तीत जास्त भरपाई, कमीत कमी विस्थापन आणि लवकरात लवकर पुनर्वसनाला प्राधान्य देऊ. लोकांच्या मागण्या लक्षात घेऊन चौपदीकरण करण्यासाठीची कार्यवाही करण्यात येत आहे. रस्त्यासाठी ६० मीटरऐवजी ४५ मीटर भूसंपादन केले जावे, ही मागणी केंद्राकडे सादर करू. त्याबाबतीत सर्वांना मान्य होईल व कायद्यात बसेल असाच निर्णय घेण्यात येईल, अशी ग्वाही केंद्रीय अवजड उद्योगमंत्री अनंत गीते यांनी दिली.जिल्हाधिकारी कार्यालयात राष्ट्रीय महामार्गासंदर्भात बैठकीत गीते बोलत होते. यावेळी पालकमंत्री दीपक केसरकर, खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक, आमदार नीतेश राणे, जिल्हा परिषद अध्यक्ष संदेश सावंत, जिल्हाधिकारी ई. रविंद्रन, मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप पांढरपट्टे, अतिरिक्त जिल्हाधिकारी रविंद्र सावळकर, पोलीस उपअधीक्षक अनंत आरोसकर आदी उपस्थित होते.गीते म्हणाले, रस्ता चौपदीकरणासाठी ४ हजार कोटी मंजूर आहेत. जनतेच्या मागण्या वाढल्यास केंद्र सरकार यासाठी अजून निधी वाढविण्यासाठी तयार आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी प्रत्येक गावनिहाय व शहरनिहाय झालेली मोजणीचा मोबदल्याचा आराखडा तयार करून तो जाहीर करावा. पुनर्वसन होणार आहे. त्या लोकांना विश्वासात घेऊन सर्व कार्यवाही करावी. रस्त्यांना जास्त वळणे असणार नाहीत याची खबरदारी घेण्यात आली आहे. चौपदरीकरणात जास्त वळणे येणार नाहीत याची काळजी घेण्यात येईल. जास्तीत जास्त नागरिकांच्या रास्त मागण्या विचारात घेऊन योग्य ते निर्णय घेण्यात येतील, असेही गीते म्हणाले. (प्रतिनिधी)मोबदल्याबाबत माहितीराष्ट्रीय महामार्गासंदर्भात स्थानिक लोकांची काही ठिकाणी मंदिर, समाजमंदिर, कुणाची नवीन घरे जात आहेत, अशा लोकांचे प्रश्न व त्यांना मिळणाऱ्या मोबदल्यासंदर्भात यावेळी पालकमंत्री दीपक केसरकर यांनी माहिती दिली.मांडल्या लोकांच्या मागण्याआमदार वैभव नाईक यांनी या बैठकीमध्ये महामार्गाचे चौपदरीकरण करताना कुडाळ शहरामधील लोकांना असणाऱ्या समस्या मांडल्या. लोकांच्या समस्या निराकरण करणे गरजेचे असल्याचे मतही त्यांनी व्यक्त केले.भूमिका स्पष्ट करामहामार्गासाठी करण्यात येणारे भूसंपादन सर्वांना समान न्यायाने व्हावे, ज्यांच्या जमिनी अथवा घर जाणार आहेत त्यांंना मोबदला किती मिळणार? याची प्रशासनाने भूमिका स्पष्ट करावी. अशी आग्रही मागणी यावेळी आमदार नीतेश राणे यांनी केली.