शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

बळीराजा वन्यप्राण्यांमुळे त्रस्त

By admin | Updated: May 16, 2016 00:23 IST

दोडामार्गमधील स्थिती : प्राण्यांकडून लाखोंची नुकसानी, भरपाई मात्र हजारात

वैभव साळकर / दोडामार्ग तालुक्यात पडणाऱ्या पावसाचा लहरीपणा, भातशेती करताना मिळणाऱ्या उत्पादनापेक्षा होणारा जादा खर्च आदीमुळे त्रस्त झालेला दोडामार्गातील शेतकरीवर्ग मोठ्या प्रमाणात काजू, नारळ, आंबा, केळी या फळझाडांबरोबरच बांबू लागवड करू लागला आहे. मात्र, या फळझाडांचे जंगली प्राण्यांकडून नुकसान केले जात आहे. गवारेडे, रान डुक्कर, सांबर व माकड आदी वन्यप्राणी शेतकऱ्यांच्या बागायती उद्ध्वस्त करीत आहेत. वन्यप्राण्यांनी केलेल्या नुकसानाची भरपाई मात्र शासन तुटपुंजी देण्यात येत आहे. त्यामुळे हत्तीसंकटानंतर आता बळीराजा शासनाच्या उदासीन धोरणामुळे पुन्हा एकदा कोलमडतो आहे. तालुक्यातील कित्येक हेक्टर भातशेती योग्य जमीन शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या न परवडणारी ठरत असल्याने वापराविना पडून आहे. पावसाचा लहरीपणा, नांगरणी, रासायनिक खते यांच्यावर खर्च करावा लागणारा पैसा तसेच या शेतीची देखभाल आदींचा ताळमेळ घालता मिळणाऱ्या उत्पादनापेक्षा खर्च अधिक होत असल्याने तालुक्यातील कित्येक शेतकऱ्यांनी भातशेती करण्याचे केव्हाच सोडून दिले आहे. शेतकऱ्यांनी फळ बागायतीकडे वळावे, यासाठी शासनाकडून वेळोवेळी प्रयत्न केले जात असून, याकरिता शंभर टक्के अनुदान फलोत्पादन योजनाही राबविली गेली. या योजनेचा लाभ घेत अनेक शेतकरी आपल्या डोंगर कपारीतील जमिनीत काजू, आंबा आदींची लागवड मोठ्या प्रमाणात करताना आढळून येतात. या जमिनीत फळ झाडांची लागवड करण्यात आली. आंबा, काजू, नारळ आदीसह अनेक फळझाडांच्या संकरीत जाती तयार करून कमीतकमी वेळेत ही फळझाडे उत्पादन देण्यास सुरूवात करतील, असा प्रयत्नही कृषी विद्यापीठामार्फत करण्यात येत आहे. त्यामुळेच काजू कलमे लागवडीच्या तिसऱ्या वर्षीपासून उत्पादन देण्यास सुरूवात होते. तालुक्यात केरळमधील शेतकरी मोठ्या प्रमाणात दाखल झाले असून, या शेतकऱ्यांनी येथील जमिनी खरेदी करून अनेक फळझाडांची लागवड केली आहे. याच धर्तीवर तालुक्यातील शेतकरी योग्य पध्दतीने फळझाडे लावताना आढळून येतात व त्याची जोपासनाही तितक्याच मेहनतीने घेत आहेत. तालुक्यातील शेतकरी मोठ्या प्रमाणात फळाबागायती करतानाच आपल्या बागायतीमधील जमिनीचा प्रत्येक भाग लागवडीखाली कसा येईल, याच प्रयत्नात असतो. त्यामुळे फळबागायतींच्या चारही बाजूच्या कंपाऊंडच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात बांबू लागवड करताना आढळून येते. बाजारपेठेत दिवसेंदिवस बांबूची वाढती मागणी व व्यावसायिकांना जाणवत असणारी बांबूची कमतरता आदीमुळे बांबूला आज बाजारपेठेत बऱ्यापैकी भाव निर्माण झाला आहे. बांबूचे उत्पादन शेतकरी बारमाही घेत असल्याने या लागवडीकडे शेतकऱ्यांचा अधिक कल जाणवतो. मात्र, तालुक्यात वाढलेल्या माकडांच्या उच्छादामुळे येथील बांबूचे उत्पादन धोक्यात आले असून, शेतकऱ्यांना अपेक्षेप्रमाणे उत्पादन मिळत नाही. त्यामुळे येथील शेतकरी वर्ग भातशेतीकडून फळझाडांच्या लागवडीकडे मोठ्या प्रमाणात वळला असला, तरी या शेतीतही त्यांना अनेक संकटांना सामोरे जावे लागत आहे. फळबागायतीची नुकसान जंगली प्राण्यांकडून झाल्यास त्याची भरपाई शासन देते. मात्र, ती अत्यल्प असल्याने शेतकऱ्यांना ती मिळूनही न मिळाल्यासारखीच आहे. त्यामुळे या नुकसान भरपाईत वाढ करण्यात यावी, अशी मागणी तालुक्यातील शेतकऱ्यांतून होत आहे.