शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

दिग्गजांना नव्या उमेदवारांचे आव्हान

By admin | Updated: November 16, 2016 00:19 IST

वेंगुर्ले नगर परिषद निवडणूक : प्रभाग चारमधील लढत होणार रंगतदार; दोन जागांसाठी ११ उमेदवार रिंगणात

वेंगुर्ले : वेंगुर्ले नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुकीत प्रभाग ४ मध्ये माजी चार दिग्गज नगरसेवकांसमोर दमदार नव्या उमेदवारांची ‘एंट्री’ झाल्याने या प्रभागात लढत रंगतदार होणार आहे. या प्रभागातून दोन जागांसाठी ११ उमेदवार रिंगणात असून, नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला एका जागेसाठी चार, तर सर्वसाधारण एका जागेसाठी तब्बल सात उमेदवार लढत देत आहेत. मात्र, दिग्गजांच्या मांदियाळीत मतदार राजा कोणाला कौल देतील, याकडेच नागरिकांचे लक्ष लागले आहे. प्रभाग ४ मध्ये १ व ७ वॉर्ड येत असून, उत्तरेकडून दाभोली डोंगर सर्व्हे नं. ७४ पूर्व तांबळेश्वर रस्ता ते गाडीअड्डा रस्त्याच्या पश्चिम बाजूने भाजी मार्केट रस्ता ते राम मारुती रस्त्याच्या पश्चिम बाजूने नाथ पै रस्त्यालगत व पुढे रामेश्वर गल्लीपर्यंत, दक्षिण रामेश्वर गल्ली ते वाडकर जंक्शनपर्यंत, उत्तर बाजू पिराचा दर्गा तिठ्यापर्यंत, पश्चिम दाभोली डोंगरापासून गिरपवाडा रस्त्याच्या पूर्व बाजूने पुढे खर्डेकर रस्त्यापासून पिराचा दर्गा गल्लीच्या पूर्व बाजूने नाथ पै रस्त्यापासून पुढे वाडकर गल्ली जंक्शनपर्यंत असा भाग येतो. या प्रभागात ४५६ स्त्रिया व ४५० पुरुष मिळून ९०६ मतदार आहेत. प्रभागात नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला जागेसाठी राष्ट्रीय काँग्रेसकडून कृपा भालचंद्र गिरप, भारतीय जनता पक्षाकडून संगीता सदानंद पांजरी, राष्ट्रवादीकडून माजी नगरसेविका गीता गजानन अंधारी, तर शिवसेनेकडून भाग्यश्री रमाकांत कुडतरकर रिंगणात आहेत. अंधारी राजकारणात जुन्या असून, काँग्रेसच्या कृपा गिरप, शिवसेनेच्या भाग्यश्री कुडतरकर व भाजपच्या संगीता पांजरी राजकारणात ‘फ्रेश’ असल्या तरी टक्कर देण्यास समर्थ आहेत. याच प्रभागातून सर्वसाधारण जागेसाठी सात उमेदवार लढत देणार आहेत. यामध्ये राष्ट्रीय काँग्रेसकडून महेश सूर्यकांत डिचोलकर, राष्ट्रवादीकडून माजी नगरसेवक अवधूत शिवराम वेंगुर्लेकर, शिवसेनेकडून विवेकानंद शशिकांत आरोलकर, भाजपकडून नरेश मोहन गावडे, तर अपक्ष म्हणून माजी उपनगराध्यक्ष अभिषेक राजीव वेंगुर्लेकर, माजी उपनगराध्यक्ष व भाजपशी बंडखोरी केलेले चंद्रशेखर लक्ष्मण कोयंडे आणि सुहास पांडुरंग मांजरेकर निवडणूक रिंगणात उतरले आहेत. माजी नगरसेवकांचा भरणा असलेल्या या प्रभागात नवे सक्षम उमेदवार निवडणूक लढवित असल्याने येथे चुरशीची लढत होणार हे नक्की! मात्र या जागेसाठी महिलांची मते निर्णायक ठरणार आहेत. भाजपशी बंडखोरी केलेले चंद्रशेखर कोयंडे हे माजी उपनगराध्यक्ष, तर माजी नगरसेवक गीता अंधारी व अवधूत वेंगुर्लेकर यांना राजकीय अनुभव आहे. मागील निवडणुकीत मनसेकडून लढलेले अभिषेक वेंगुर्लेकर यांना ५९७ मताधिक्य मिळाले होते. यावेळी ते अपक्ष उमेदवार झाले आहेत. तर राष्ट्रवादीचे अवधूत वेंगुर्लेकर यांना ८४३ मते मिळाली होती. मात्र, यावेळी त्यांना नवोदित उमेदवारांचा अडथळा आहे. काँग्रेसचे महेश डिचोलकर यांचा जनसंपर्क दांडगा आहे. शिवसेनेचे विवेकानंद आरोलकर यांना पालकमंत्री दीपक केसरकर यांची साथ आहे, तर भाजपच्या नरेश गावडे यांना राजकीय वारसा आहे. मात्र, मर्यादित (९०६) मतदार असलेल्या या प्रभागात उमेदवारांची संख्या जास्त असल्याने एक-एक मत निर्णायक ठरणार आहे. त्यामुळे सर्वच पक्ष मतांसाठी व्यूहरचना आखत आहेत. वैयक्तिक गाठीभेटींवर भर देत आहेत. (वार्ताहर) एक दिवसाचे नगराध्यक्ष पुन्हा रिंगणात वेंगुर्ले नगरपरिषदेच्या राजकीय घडामोडीत माजी उपनगराध्यक्ष अभिषेक वेंगुर्लेकर हे एक दिवसाचे प्रभारी नगराध्यक्ष होते. यंदाच्या निवडणुकीत ते पुन्हा एकदा नगरसेवक पदासाठी रिंंगणात आहेत. त्यांचेही विरोधकांना तगडे आव्हान आहे.