शहरं
Join us  
Trending Stories
1
अल्पसंख्याक अन् एससी-एसटींविरुद्ध भेदभाव केल्यास होणार तुरुंगवास; काँग्रेसच्या 'रोहित वेमुला' विधेयकात काय?
2
...नाहीतर भारत-पाकिस्तानमध्ये अण्वस्त्र युद्ध झालं असतं; डोनाल्ड ट्रम्प यांचा स्फोटक दावा
3
Video: प्रतीक्षा संपली, इलॉन मस्क यांची भारतात एन्ट्री! असं आहे Tesla चं मुंबईतील पहिलं शोरुम
4
"कमी बोला, जास्त काम करा"; पक्षातील नेत्यांना एकनाथ शिंदेंच्या कानपिचक्या, म्हणाले...
5
जगातील सर्वात वृद्ध धावपटू फौजा सिंग यांचे वयाच्या ११४ व्या वर्षी निधन; महामार्गावर झाला होता अपघात
6
क्रूरतेचा कळस! सैनिकाचे पोट फाडून त्यात ठेवला बॉम्ब; नक्षलवादी योगेंद्र कसा पकडला गेला?
7
हुंड्यासाठी छळ केल्याचा आरोप, विवाहितेचे कापले केस; दीड वर्षाच्या चिमुकलीसह महिलेनं संपवलं आयुष्य
8
हे तर भयंकरच! मुंबई लोकल की, मृत्यूचे कारण?; 8 वर्षात 8 हजार 273 प्रवाशांचा मृत्यू
9
इराणची भीती संपेना! इस्राइलवर आता विश्वासच नाही; पुन्हा करतायत युद्धाची तयारी
10
पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला पाकिस्तानी नेत्यांनी घडवून आणला होता, अहवालात मोठा दावा
11
पडघम वाजले; मात्र प्रत्यक्ष बंधुऐक्य दूरच; उद्धव ठाकरेंना हवीय इंडिया आघाडीची बैठक...
12
ओला इलेक्ट्रीक स्कूटरवर महाराष्ट्रात गंडांतर; ३८५ शोरूम पडले बंद
13
म्हाडाने घर विक्रीसाठी प्रतिनिधी नेमलेले नाहीत; ५,२८५ घरांसाठी नोंदणी सुरू; १३ ऑगस्टपर्यंत करा अर्ज 
14
आजचे राशीभविष्य, १५ जुलै २०२५: नकारात्मक वृत्ती दूर ठेवल्याने आर्थिक लाभ होईल
15
दीड महिना झाला... भोलानाथ, सांग पाऊस कधी येणार! शहर, उपनगरात हजेरी; मात्र मोठ्या पावसाची प्रतीक्षा
16
शिवसेना, धनुष्यबाण कुणाला मिळणार? आता फैसला महापालिका निवडणुकीपूर्वी 
17
संपादकीय: रयतेच्या राजाचा वारसा! आपल्याला तरी समजला आहे का?
18
कुचकामी कायदा, बनावट प्रमाणपत्रे आणि खोटे दिव्यांग; पूजा खेडकर एकटी नाही...
19
बोइंग विमानांची इंधन लॉकिंग प्रणाली तपासा; अहमदाबाद विमान अपघाताच्या प्राथमिक अहवालानंतर डीजीसीएची सूचना
20
नवीन शिक्षण धोरणानुसार राज्यातील पुस्तके टप्प्याटप्प्याने बदलणार!

वेंगुर्लेतील कार्यकर्ते द्विधा मनस्थितीत

By admin | Updated: September 23, 2014 00:16 IST

२००९ साली झालेल्या विधानसभा निवडणुकीला काँगे्रस- राष्ट्रवादी, शिवसेना -भाजप व अपक्ष अशी लढत झाली होती. यावेळी नारायण राणे व समर्थकांनी आघाडीचा धर्म पाळून केसरकर यांना सहकार्य केले होते.

प्रथमेश गुरव - वेंगुर्ले -सावंतवाडी मतदारसंघातील वेंगुर्ले तालुक्यात काँगे्रस - राष्ट्रवादी, शिवसेना युती तसेच मनसेचेही कार्यकर्ते खेडोपाडी विखुरलेले आहेत. २००९ साली झालेल्या विधानसभा निवडणुकीला काँगे्रस- राष्ट्रवादी, शिवसेना -भाजप व अपक्ष अशी लढत झाली होती. यावेळी नारायण राणे व समर्थकांनी आघाडीचा धर्म पाळून केसरकर यांना सहकार्य केले होते. तसेच दीपक केसरकर यांचाही लोकसंपर्क मोठा असल्याने ते चांगल्या मतांनी विजयी झाले होते. मात्र, सद्यस्थितीत राजकीय गणिते बिघडलेल्या स्थितीत असून, केसरकर शिवसेनावासी झाले असल्याने कार्यकर्त्यांमध्येही संदिग्धता आहे. तसेच अजूनही कोणाला उमेदवारी मिळणार निश्चित नसल्याने जनताही व्दिधा मनस्थितीत आहे. केसरकरांचे या मतदारसंघातील प्राबल्य पाहता वेंगुर्लेमधूनही त्यांना पाठिंबा मिळण्यात आघाडीची आडकाठी होणार आहे. यापूर्वी वेंगुर्र्ले तालुक्याचा समावेश नसताना मागील दोन वेळा शिवसेनेचे शिवराम दळवी काँग्रेस - राष्ट्रवादीअंतर्गत बंडखोरीमुळे निवडून आले होते. २००९ साली राष्ट्रवादीचे प्रवीण भोसले यांनी बंडखोरी केल्यामुळे दळवी हॅट्ट्रिक साधणार, असे मानले जात होते. परंतु मागील दोन वेळा संपूर्ण शिवसेना दळवींच्या मागे होती. त्यातील निम्मे राणेंसह काँगे्रसवासी झाले आणि त्यामुळेच शिवराम दळवी आमदार होऊ शकले नाहीत. राष्ट्रवादीच्या दीपक केसरकर यांना ६३,४३०, शिवसेनेच्या शिवराम दळवी यांना ४५,०१२, तर अपक्ष उमेदवार प्रवीण भोसले यांना १९,३६४ एवढी मते सावंतवाडी मतदारसंघातून पडली होती. त्यावेळी एकंदर वेंगुर्ले तालुक्यात नारायण राणेंचा प्रभाव जास्त होता. २०१४ सालच्या विधानसभा निवडणुकीमध्ये पुन्हा केसरकर हे उमेदवार म्हणून असून, फक्त यापूर्वी आघाडीतर्फे लढले होते. यावेळी ते शिवसेनेतर्फे लढत असल्याचे संकेत आहेत. राणेंचे कट्टर समर्थक राजन तेली यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्याने आघाडीतर्फे राजन तेली उमेदवार असल्याची चर्चा आहे. राडा प्रकरणानंतर वेंगुर्ले शहरातील जनतेने नगर परिषदेवर राष्ट्रवादीला एकहाती सत्ता दिली होती. परंतु राष्ट्रवादीच्या अंतर्गत वादामुळे नगराध्यक्ष निवडणुकीच्या वेळी दोन गट पडले. त्याचा शेवट म्हणून जिल्हाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादीच्या त्या १२ नगरसेवकांना अपात्र ठरवले. राष्ट्रवादीकडे एकहाती सत्ता देऊनही त्यांनी विश्वासघात केल्यामुळे विधानसभा निवडणुकीला येथील जनता पुन्हा राष्ट्रवादीला मतदान करील काय, हा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. नगरपरिषद निवडणुकीत शिवसेनेला खाते खोलता आले नव्हते. मात्र, नुकत्याच झालेल्या वेंगुर्ले तालुका पंचायत समितीच्या सभापती व उपसभापती निवडणुकीत शिवसेनेचा सभापती बसला असून, उपसभापती काँग्रेस-राष्ट्रवादीचा आहे. त्यामुळे पंचायत समिती मतदारसंघात दोघांचीही ताकद राहिल्याने मतदान विभागण्याची शक्यता आहे. पूर्वीचे राष्ट्रवादीचे जिल्हा परिषदेचे पदाधिकारी दीपक केसरकर यांच्यासमवेत शिवसेनेच्या कार्यक्रमांना हजेरी लावत आहेत. काँग्रेस, राष्ट्रवादी व शिवसेना युतीबरोबच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनेही आपला उमेदवार उभा करणार आहे. एकीकडे स्वातंत्र्यवीर सावरकर विचार प्रणालीच्या हिंदू महासभेनेही आपल्या पक्षाचे पुनर्गठन केले असून, त्यांनीसुध्दा आपला उमेदवार जाहीर केला आहे. एकंदर सध्याची राजकीय परिस्थिती पाहता, अजूनही येथील जनता कोणत्या पक्षाला आपले मत देईल, हे समजणे कठीणच आहे. वेंगुर्ले तालुक्याच्या समस्याही बरीच वर्षे सुटण्याचे नाव घेत नाहीत. मायनिंगमुळे खराब होणारे रस्ते, अपुऱ्या वैद्यकीय सुविधा, पर्यटनासाठी पयाभूत सुविधांचा अभाव, एस. टी.ची विस्कळीत सेवा, शहरातील भुयारी गटार योजना, पाणी या समस्या सोडवण्याच्या दृष्टीने पक्षाच्या उमेदवारांनी वरील समस्यांचा नुसताच विचार करु नये, तर त्यावर काही ठोस उपाययोजना करावी, अशीच मतदारांची अपेक्षा आहे.