शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
2
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
3
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
4
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
5
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
6
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
7
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
8
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
9
'शांतीदूत' बनल्याने पाकिस्तानचे पाप धुवून निघणार नाही! शशी थरूर यांची शेजारी राष्ट्रावर सडकून टीका
10
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
11
हॉस्पिटलचं बिल कमी होणार? IRDAI नं बनवली एक सब कमिटी, काय असेल याचं काम?
12
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
13
मृणाल ठाकूरची इंडस्ट्रीतली सर्वात जवळची मैत्रीण कोण? 'या' अभिनेत्रीचं घेतलं नाव, म्हणाली...
14
Peace Of Mind: मनावर ताबा मिळवण्यासाठी आणि जीवन समृद्ध करण्यासाठी भगवान बुद्धांनी सांगितले ९ सुवर्ण मार्ग
15
PSL 2026: "उस्मान तारिकच्या बॉलिंगवर खेळणार नाही" लाईव्ह सामन्यात डॅरिल मिशेलचा आक्षेप, असं का म्हणाला?
16
संतापजनक! मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा आठवीच्या पुस्तकातून NCERT ने वगळला
17
१२० किंवा १५० रुपयांऐवजी ₹१२३ किंवा ₹१४८ चं पट्रोल का भरताहेत लोक? राऊंड फिगरमुळे कमी मिळतं का Petrol?
18
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
19
वरुथिनी एकादशी २०२६: १० हजार वर्षांच्या तपश्चर्येचे फळ केवळ एका व्रतात! जाणून घ्या 'वरुथिनी एकादशी'चे पूजा विधी
20
Tripti Kalhans : डिप्रेशनवर मात अन् पाचव्या प्रयत्नात बाजी! सलग ४ वेळा नापास झालेली तृप्ती बनली IAS अधिकारी
Daily Top 2Weekly Top 5

वेंगुर्लावासीयांना सुसज्ज मच्छीमार्केटची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 5, 2020 11:03 IST

वेंगुर्ला बाजारपेठेच्या अर्थव्यवस्थेचा कणा असलेल्या मच्छीमार्केटचे काम पूर्ण होण्याच्या दिशेने वाटचाल करीत आहे. त्यामुळे मच्छी विक्रेत्यांना आपली हक्काची जागा आणि मत्स्य खवय्यांना एकाच ठिकाणी विविध प्रकारचे मासे मिळणे सुलभ होणार आहे.

ठळक मुद्देवेंगुर्लावासीयांना सुसज्ज मच्छीमार्केटची प्रतीक्षाबाजारपेठेच्या अर्थव्यवस्थेचा कणा : विक्रेत्यांना मिळणार हक्काची जागा

प्रथमेश गुरव वेंगुर्ला : वेंगुर्ला बाजारपेठेच्या अर्थव्यवस्थेचा कणा असलेल्या मच्छीमार्केटचे काम पूर्ण होण्याच्या दिशेने वाटचाल करीत आहे. त्यामुळे मच्छी विक्रेत्यांना आपली हक्काची जागा आणि मत्स्य खवय्यांना एकाच ठिकाणी विविध प्रकारचे मासे मिळणे सुलभ होणार आहे.पूर्वीप्रमाणेच वेंगुर्ला शहराच्या मध्यवर्ती असलेल्या बाजारपेठेलगतच हे मच्छी मार्केटचे काम होत असल्याने येथील नागरिकांसह व्यापारीवर्गही सुखावला आहे. मात्र, तोपर्यंत वेंगुर्ला बाजाराला मच्छीमार्केटची प्रतीक्षा आहे.क्रॉफर्ड मार्केटची प्रतिकृती असलेल्या वेंगुर्ला बाजारपेठेत एकाच ठिकाणी भाजी, फळे, फुले, विड्याची पाने, किराणा माल, मासे यांसह इतर जीवनावश्यक वस्तूंबरोबरच सोनार, कासार, कपडे यांचीही दुकाने असल्याने वेंगुर्ला ही सर्वसमावेशक बाजारपेठ आहे.

एकदा या बाजारात प्रवेश केलेली व्यक्ती सामानाच्या बऱ्याच पिशव्या सांभाळत बाहेर येताना दिसते. वरील सर्व व्यवसाय हे एकमेकांवर अवलंबून आहेत. यात महत्त्वाचा वाटा आहे तो मासेविक्रीचा आणि खरेदीचा. त्यामुळे हे एकत्रितपणे सुरू होणे आवश्यक आहे.मच्छी विक्री मैदानातमच्छीमार्केट बांधकामावेळी मच्छी विक्रीची जागा बदलण्यात आली. त्यामुळे या बाजारपेठेत येण्यासाठी असलेल्या अनेक मार्गांपैकी काही मार्ग सुनेसुने झाले. तेथील वर्दळ कमी झाली. सद्यस्थितीत कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संभाव्य गर्दी टाळण्यासाठी बरीच ठिकाणे बदलल्यानंतर आता श्री मानसीश्वरजवळील मैदानात ही मच्छीविक्री स्थिरावली आहे.बाजारपेठेवर परिणाममच्छीविक्रीच एका बाजूला गेल्याने मुख्य बाजारपेठेवर त्याचा परिणाम झाला आहे. याचा मोठा फटका प्रामुख्याने पालेभाजी, विड्याची पाने, बेकरी उत्पादने, रिक्षा व्यावसायिक, हॉटेल्स, कोल्ड्रींक्स दुकाने आणि सुवर्णकार यांना बसला आहे. एकमेकांवर अवलंबून असलेले हे व्यवसाय असल्याने मच्छीविक्री महत्त्वाची आहे.

वेंगुर्ल्याचे नियोजित मच्छीमार्केट लवकरात लवकर होणे हे मच्छी विक्री महिलांच्या दृष्टीने अत्यंत आवश्यक आहे. प्रस्तावित मच्छी मार्केटची आम्ही पहाणी केली असून आम्हांला सुयोग्य अशी रचना तेथे होत आहे. त्यामुळे अर्थव्यवस्थेला चालना मिळेल.- श्वेता हुले, मच्छी विक्रेती

मच्छीमार्केट ही वेंगुर्ल्याची एक शान आहे. सध्या सुसज्ज मच्छीमार्केट इमारतीचे काम सुरू आहे. लवकरच हे मार्केट सर्वांसाठी खुले होणार आहे. यामुळे शहरातील व्यापाराबरोबरच मच्छी विक्रेत्यांची गैरसोय, वाहतूक कोंडीचाही प्रश्न निकाली निघणार आहे.- दिलीप गिरप,नगराध्यक्ष

 

टॅग्स :fishermanमच्छीमारMarketबाजारsindhudurgसिंधुदुर्ग