शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
"मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
3
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
4
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
5
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
6
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
7
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
8
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
9
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
10
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
11
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
12
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
13
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
14
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
15
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
16
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
17
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
18
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
19
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
20
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले

वाशी मार्केटमध्ये ८० हजार पेट्यांची आवक

By admin | Updated: May 6, 2015 00:18 IST

हापूस आला रे...: आवक वाढल्याने दर गडगडले

रत्नागिरी : उष्मा वाढल्यामुळे आंबा लवकर तयार होऊ लागला आहे. अवकाळीतून वाचलेला आंबा शेतकरी मार्केटमध्ये विक्रीस पाठवित आहेत. सध्या वाशी मार्केटमध्ये रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि रायगड जिल्ह्यातून ८० हजार पेट्यांची आवक होत आहे. मार्केटमधील एकूण आवक लक्षात घेता दररोज तीन ते चार टन आंबा परदेशी निर्यात केला जात असल्याची माहिती मुंबई कृषी उत्पन्न समितीचे माजी संचालक संजय पानसरे यांनी ‘लोकमत’ शी बोलताना दिली.वाशी मार्केटमध्ये रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यातून पाठवण्यात येणाऱ्या आंबा पेट्यांची आवक दिवसेंदिवस वाढू लागली आहे. उकाडा वाढल्यामुळे आंबा तयार होत आहे. आवक वाढल्यामुळे दरामध्ये प्रचंड घसरण झाल्याचे दिसून येत आहे. ६०० ते अडीच हजार रुपये दराने पेट्यांची विक्री सुरु आहे. अवकाळी पावसामुळे आंब्यावर डाग पडले आहेत. चांगल्या दर्जाच्या आंब्याला मात्र दर चांगला मिळत आहे. हा दर टिकावा, अशी मागणी करण्यात येत आहे.वाशी मार्केटमधून दररोज तीन ते चार टन आंबा न्युझीलंड, युरोप, अमेरिका, मॉरिशस, आखाती देशात निर्यात होत आहे. मार्चच्या पहिल्या आठवड्यापासून वाशी मार्केटमध्ये आंब्याची आवक सुरु झाली. सुरुवातीला पेटीला २ ते ५ हजार इतका दर मिळत होता. परंतु आवक वाढल्याने दरामध्ये घसरण झाली. १५०० ते ४००० पर्यंत भाव खाली आला. त्यानंतर भावामध्ये आतापर्यंत सातत्याने घसरण झाल्याचे निदर्शनास येत आहे.अधूनमधून पडणाऱ्या पावसामुळे फांद्या तुटणे, झाडे कोसळणे आदी प्रकारामुळे आंब्याचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. शिवाय वाढत्या तापमानामुळे आंबा मोठ्या प्रमाणावर भाजत आहे. परदेशी निर्यात सुरु झाल्यामुळे आंब्याचे दर स्थिर राहाणे अपेक्षित होते. जेणेकरुन शेतकऱ्यांचे आतापर्यंतचे झालेले नुकसान काहीअंशी भरुन निघण्यास मदत झाली असती. झाडांना घालण्यात येणारी खते, मोहोर आल्यापासून वापरण्यात येणारी कीटकनाशके, कीटकनाशकांचे वाढते दर, इंधन खर्च, मजूरी, आंबा तयार झाल्यानंतर मार्केटमध्ये पाठवेपर्यंत करण्यात येणारा वाहतूक खर्च, हमाली, दलाली आदी खर्च वगळता शेतकऱ्यांना मिळणारे उत्पन्न नगण्य आहे. त्या तुलनेत व्यापारी गब्बर होत आहेत.गतवर्षी या दिवसात लाख ते सवा लाख पेट्या विक्रीला येत असत. मात्र, यावर्षी उत्पादन घटल्याने ८० हजार पेट्याच विक्रीला आहेत. दरवर्षीच्या तुलनेत दररोज ५० ते ५५ हजार पेट्याची आवक घटली आहे. शेतकरी आंब्याची वर्गवारी करून निवडक आंबा भरून पेट्या वाशी, पुणे, अहमदाबाद मार्केटमध्ये पाठवत आहेत. कोल्हापूर मार्केटमध्ये पिकलेला आंबा पाठविण्यात येत आहे. पेट्या भरून उरलेला आंबा किलोवर कॅनिंगसाठी टाकण्यात येत आहे. सध्या कॅनिंगचा दर ३० ते ३१ रूपये किलो दराने आहे. वृत्तपत्रातून कॅनिंगचे दर जाहीर करण्यात येत असतानाही ग्रामीण भागात मात्र २८ ते २९ रूपये दराने आंबा विकत घेण्यात येत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे किलो मागे २ ते ३ रूपये नुकसान होत आहे. ग्रामीण भागातील शेतकऱ्यांची चक्क फसवणूक सुरू आहे. बाजारपेठेत अन्य राज्यातील आंबाही दाखल झाला आहे. नीलम, केशर, राघू, कर्नाटक लालबाग जातीचे आंबे विक्रीला आले आहेत. आंब्याची विक्री किलोवर करण्यात येत आहे. रत्नागिरी हापूससाठी मात्र रूमालाखाली बोटांच्या हालचालीवरून दर ठरविला जात आहे.सध्या पेटीला ६०० ते २५०० रूपये इतका दर देण्यात येत असला तरी शेतकऱ्यांना त्यातून मिळणारा दर मात्र प्रत्यक्षात अल्प आहे. (प्रतिनिधी)वाशी मार्केटमध्ये रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि रायगड जिल्ह्यातून ८० हजार पेट्यांची आवक.दररोज तीन ते चार टन आंबा होतो परदेशी निर्यात.मार्चच्या पहिल्या आठवड्यापासून वाशी मार्केटमध्ये आंब्याची आवक सुरु.आवक वाढल्याने दर झाले कमी.भावामध्ये सातत्याने घसरण सुरुच.रत्नागिरी हापूसचा लिलाव बोटांच्या हालचालीवरून.जिल्ह्यात एकूण ६५ हजार १०९ हेक्टर क्षेत्रावर आंबा पिकाची लागवड करण्यात आली आहे. पैकी ५८ हजार ८३७ हेक्टर क्षेत्र उत्पादनक्षम आहे. अवकाळी पावसाने जिल्ह्यातील ६४,८७४ शेतकऱ्यांचे आंबा पिकाचे नुकसान झाल्याचे निदर्शनास येत आहे. २०,७१८ हेक्टर क्षेत्रावरील आंबा पिकाचे नुकसान झाले आहे. यावर्षीही अवकाळी नुकसानीबरोबरच दरातील घसरण यामुळे शेतकऱ्यांच्या पदरी निराशा आली आहे.