गणपतीपुळे : कोकण निसर्गसौंदर्याने नटलेले आहे. मालगुंडसारख्या गावातदेखील विपूल निसर्गसौंदर्य असल्याने या ठिकाणी पर्यटकांचा ओघ दिवसेंदिवस वाढत आहे. या कारणाने पर्यटन वाढीसाठी अधिक प्रयत्न व्हावेत व मालगुंड गाव पर्यटनाच्या नकाशावर यावा, हा प्रमुख उद्देश डोळ्यासमोर ठेवून सागरी महोत्सव सुरू आहे. यामुळे मालगुंडच्या पर्यटनाला चालना मिळू शकेल. या भागाचा नजीकच्या कालावधीत कायापालट होणार असून, यापुढे भविष्यात अशा प्रकारचे विविध महोत्सव झाल्यास येथील पर्यटन व्यवसायाला खऱ्या अर्थाने बळकटी मिळेल, असा आशावाद आमदार राजन साळवी यांनी व्यक्त केला.मालगुंड ग्रामपंचायत व पर्यटन समिती, मालगुंड यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या सागरी महोत्साव २०१४चे उद्घाटन रविवार, २८ रोजी सायंकाळी मालगुंड खारभूमी मैदान येथे आमदार राजन साळवी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी गोविंदराव शिंदे बोलत होते.याप्रसंगी रत्नागिरी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष जगदीश राजापकर, सभापती प्रकाश साळवी, संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष गजानन पाटील, मालगुंडच्या सरपंच साधना साळवी, अनघा साळवी, उपसरपंच प्रसाद पाटील, पर्यटन समितीचे अध्यक्ष राजेंद्र शिंदे, पंचायत समितीच्या माजी सदस्या सोनिया शिंदे, ग्रामपंचायत सदस्या शुभदा मुळ्ये, श्वेता खेऊर, लिला घवाळी, दीक्षित उपस्थित होते. या महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी टी. व्ही. कलाकार राजन पाटील यांची मुख्य उपस्थिती खास आकर्षण ठरली.या महोत्सवात आमदार राजन साळवी व अनघा साळवी यांचा सत्कार समितीतर्फे राजेंद्र शिंदे व मालगुंडच्या सरपंच साधना साळवी यांच्याहस्ते करण्यात आला. तसेच जि.प. अध्यक्ष जगदीश राजापकर, सभापती प्रकाश साळवी, राजन पाटील, समीर दिक्षीत, गजानन पाटील आदींचा सत्कार समितीतर्फे करण्यात आला.तसेच विशेष व्यक्तींचा गौरव म्हणून समितीतर्फे मालगुंड गावात योगदान प्राप्त व्यक्तींमध्ये सैनिकी सेवेत कार्यरत विजय हुमणे, वास्तू विशारद अनन्या केळकर, शवविच्छेदक अशोक सोनार, हर्षवर्धन साईवाला आदींचा सत्कार करण्यात आला. (वार्ताहर)उद्घाटनानंतर रात्री ८ वाजता पहिला कार्यक्रम म्हणून मालगुंड येथील श्री चंडिका जाखडी कलापथकाने सादर केलेला जाखडी नृत्याचा कार्यक्रम विशेष लक्षवेधी ठरला. हास्यसम्राट आनंद बोंद्रे यांनी सादर केलेला सांगितीक कलाविष्कार सर्वांची वाहवा मिळवून गेला.
मालगुंडमध्ये पर्यटनवाढीसाठी विविध महोत्सव व्हावेत
By admin | Updated: December 29, 2014 23:42 IST