शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता श्रेयस तळपदेवर गुन्हा दाखल; उत्तराखंडमधील घोटाळा प्रकरण, आलोक नाथ यांचेही नाव...
2
राहुल गांधी निराश, त्यांच्या नेतृत्वात काँग्रेसने ९० निवडणुका हरल्या; अनुराग ठाकूरांचा हल्लाबोल
3
"राहुल गांधींचे सर्व आरोप खोटे आणि निराधार" निवडणूक आयोगाचे प्रत्युत्तर!
4
पत्रकाराचा फोन, बूथ मंत्र अन् ८० टक्के टार्गेट...; निवडणुकीसाठी अमित शाहांनी आखला 'प्लॅन'
5
पुढचे २४ तास फ्रान्स सगळंच बंद! रस्त्यांवर उतरणार तब्बल ८ लाख लोक; काय आहे कारण?
6
पंतप्रधान मोदी आणि नेपाळच्या हंगामी PM सुशीला कार्की यांचा फोनवरून संवाद, काय झाली चर्चा?
7
१० रुपयांची बाटली... तीन भावांनी मिळून केली कमाल, आता त्यांच्या प्रोडक्टची गल्ली-गल्लीत आहे चर्चा
8
संरक्षण करारानुसार पाकिस्तानला युद्धात साथ देण्याचा शब्द देणाऱ्या सौदी अरेबियाची ताकद किती?
9
डोनाल्ड ट्रम्प पिच्छा सोडेना! आता भारताला टाकले ड्रग्ज उत्पादक, पुरवठा करणाऱ्या देशांच्या यादीत 
10
‘राहुल गांधींचा ‘वोटचोरी’बाबतचा कांगावा म्हणजे…’, ते पत्र दाखवत भाजपाचा पलटवार 
11
सोन्यातील तेजी शेअर बाजारासाठी धोक्याची घंटा? काय आहे 'निक्सन शॉक' घटना? ब्रोकरेज फर्मने सांगितलं सत्य
12
निवडणूक आयोगाने 'आधारहीन' म्हणत राहुल गांधींचे आरोप फेटाळले, 'त्या' मतदारसंघात काय घडलं होतं तेही सांगितले
13
५० लाखांचा फ्लॅट घ्यायचा की गावी त्याच पैशांची जमीन? सोशल मीडियावर वाद सुरु झाला...
14
VIRAL : एकमेकांना पाडलं, केस धरून हाणलं; भर बाजारात नवरा-बायकोमध्ये जुंपली!
15
मी रमी खेळत होतो कशावरून? मंत्री माणिकराव कोकाटेंनी रोहित पवारांना कोर्टात खेचलं, अब्रुनुकसानीचा दावा दाखल
16
भलामोठा डिस्प्ले, उत्कृष्ट कॅमेरा, दमदार बॅटरी; 'हे' ६ फोन ६००० पेक्षा कमी किंमतीत उपलब्ध
17
दीपिका पादुकोणची 'कल्की 2898 एडी' सिनेमातून एक्झिट, कारण आलं समोर
18
राहुल गांधींना निवडणूक आयोगातून कोण मदत करतेय? दाव्याने खळबळ
19
Shukra Pradosh 2025: पती-पत्नीचे बिघडलेले नातेही सुधारेल; शुक्र प्रदोषावर करा 'हे' उपाय!
20
प्रसिद्ध अभिनेत्रीचा मुलगा; ३६ व्या वर्षीही बॉलिवूडमध्ये करतोय संघर्ष; आता मिळाली मोठी संधी

मालवणच्या ३५ कोटींच्या अर्थसंकल्पास मान्यता

By admin | Updated: February 27, 2015 23:24 IST

नगरपालिका सभा : विरोधी नगरसेवकांकडून टीका

मालवण : मालवण नगरपालिकेची अर्थसंकल्पीय सभा नगराध्यक्ष अशोक तोडणकर यांच्या अध्यक्षतेखाली गुरूवारी सायंकाळी झाली. यावेळी ४ लाख ४५ हजार ७०० रूपयांच्या शिल्लकेसह एकूण ३५ कोटी ८३ लाख ६४ हजार रूपयांच्या अर्थसंकल्पास मान्यता देण्यात आली.मालवण शहर पर्यटनदृष्ट्या विकसीत होत असताना मालवण नगरपालिकेच्या अर्थसंकल्पात पर्यटन वाढ, पालिकेची उत्पन्न वाढ, आरोग्य सुविधा, नवे प्रकल्प यासाठी कोणतीही तरतूद केलेली नाही. गेल्यावर्षीप्रमाणेच नव्या वर्षी अर्थसंकल्प केवळ जमा-खर्च मांडणारा अर्थसंकल्प असल्याची टीका मालवण शहर विकास आघाडीचे नगरसेवक नितीन वाळके, माजी उपनगराध्यक्ष महेश जावकर यांनी केली. तर काँग्रेसचे नगरसेवक सुदेश आचरेकर यांनी नागरिकांवर कोणताही कराचा बोजा न ठेवता अर्थसंकल्प मांडल्याचे समर्थन केले.यावेळी काँग्रेसचे नगरसेवक सुदेश आचरेकर यांनी पालिका प्रशासनाने अर्थसंकल्पांना नागरिकांच्या डोक्यावर कोणत्याही प्रकारचा कर न लादता हिताच्यादृष्टीने अर्थसंकल्प सादर केला, अशा शब्दात त्यांनी समर्थन केले.यावर प्रशासनाची बाजू मांडताना मुख्याधिकारी अरविंद माळी यांनी, पालिकेचे स्वत:चे उत्पन्न कमी असल्याने खर्चाचा विचार केला गेला नाही. पर्यटन, आरोग्य, रस्ते या पायाभूत सुविधांसाठी वेगळे बजेट न करता नगरोत्थान, दलितवस्ती योजना या योजनांतून अपेक्षित बाबी पूर्ण करण्याचा पालिकेचा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले. उत्पन्न कमी असल्याने पालिकेला निधी उभारणे शक्य नसल्याचे माळी यांनी सांगितले. माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर यांनी, नगरपालिकेचे आर्थिक उत्पन्न बुडविणाऱ्या करवसुली विभागाच्या कर्मचाऱ्यांच्या मानधनातून वसुली करावी, अशी मागणी केली.मालवण शहर हद्दीत भरड ते एसटी स्टॅण्ड परिसरात फेरीवाल्यांची संख्या वाढली आहे. रस्त्याच्या दुतर्फा हातगाड्या असताना आरोग्य विभाग कारवाई करीत नाही. त्यांच्यावर कारवाई करा, अशा सूचना नगरसेविका पूजा करळकर यांनी केल्या. नगरसेवक नितीन वाळके यांनी मालवण नगरपरिषदेने वर्षभरापूर्वी प्लास्टिक बंदी परिणामकारक राबवली होती. आता मोहीम थंडावली असल्याचा आरोप केला. माजी उपनगराध्यक्ष महेश जावकर यांनी नगराध्यक्षांकडून लोकप्रतिनिधींच्या अपेक्षा होत्या, मात्र आता अपेक्षाभंग झाला. नगराध्यक्षाचा आक्रमकपणा नाहिसा झाला असल्याचे सांगितले. (प्रतिनिधी)लोकप्रतिनिधींनी स्वत:च्या भूमिकेवर ठाम रहावेकारवाई करण्यासाठी मोहीम हाती घेतल्यावर काही लोकप्रतिनिधींचा मतांच्या राजकारणासाठी कारवाई करू नये. प्रशासनाला असे फोन केले जातात. यामुळे कारवाईच्या भूमिकेवर लोकप्रतिनिधींनी ठाम रहावे, मात्र नंतर माघार घेतल्यास गप्प बसणार नाही. - अशोक तोडणकर, नगराध्यक्षप्रशासनाने अर्थसंकल्पाची औपचारिकता पूर्ण केलीभविष्याचा विचार करून पर्यटनवाढीसाठी पालिकेने अर्थसंकल्पात भरीव तरतुदी सुचविणे गरजेचे असताना प्रशासन मागील वर्षाप्रमाणे नव्या वर्षी अर्थसंकल्प मांडते. मालवण पालिकेने केवळ इतर नगरपालिकांचा, शहरांचा आदर्श घेत स्वप्न बघावित का? नागरिकांच्या हिताच्यादृष्टीने अर्थसंकल्प मांडला जावा. यापूर्वीच्या अर्थसंकल्पाची औपचारीकता प्रशासनाने पूर्ण केली आहे.- महेश जावकर, नगरसेवककर वसुलीचा आलेख उतरता कसा?भाजी मंडई व मच्छिमार्केट वसुलीसाठी पालिकेचे कर्मचारी असताना वसुलीच्या टक्केवारीत वाढ होणे अपेक्षित असताना दरवर्षी घट का होते? गेल्या तीन वर्षात ३ लाख रूपये आर्थिक उत्पन्न बुडाले आहे. कर्मचाऱ्यांकडून वसुली होत नसेल तर वसुलीसाठी अभिकर्त्यांची नियुक्ती करण्यात यावी.- महेंद्र म्हाडगुत, नगरसेवकअर्थसंकल्पात जनतेचे प्रतिबिंब दिसले पाहिजेपर्यटनदृष्ट्या मालवण शहर विकसित होत असताना पर्यटनवाढीसाठी पालिकेच्या उत्पन्न वाढीसाठी कोणतीही तरतूद अर्थसंकल्पात केली नाही. अर्थसंकल्पात जनतेचे प्रतिबिंब दिसले पाहिजे. मात्र पालिकेचा अर्थसंकल्प केवळ जमा-खर्च मांडणारा आहे. - नितीन वाळके, नगरसेवक