शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

भास्कर जाधवांवर वायकर यांचा पलटवार

By admin | Updated: November 19, 2015 00:43 IST

विकास आराखड्यात असमतोलपणा असल्याचा आरोप निराधार

रत्नागिरी : जिल्हा नियोजन मंडळाच्या या वर्षाकरिता केलेल्या दीडशे कोटींच्या विकास आराखड्यात असमतोलपणा असल्याचा आमदार भास्कर जाधव यांचा आरोप निराधार आहे. निधीचे वाटप नियमानुसार व तालुकावार समान होणार आहे. आधीच्या पालकमंत्र्यांनी आपल्याच भागात १४ कोटींपेक्षा अधिक निधी वापरून अन्य भागांवर अन्याय केला होता. अन्य आमदारांना विकासासाठी केवळ २ ते अडीच कोटी रुपयेच मिळाले होते, असा आरोप पालकमंत्री रवींद्र वायकर यांनी आज (बुधवार) पत्रकारपरिषदेत केला. जिल्हा नियोजन मंडळाची बुधवारी आढावा बैठक घेण्यात आली. त्यावेळी आराखड्यानुसार विकासकामांच्या प्रस्तावाची काय स्थिती आहे, याची माहिती वायकर यांनी अधिकाऱ्यांकडून घेतली. या बैठकीनंतर आयोजित पत्रकारपरिषदेत ते बोलत होते. यावेळी सरकारच्या एक वर्षांच्या काळात जिल्ह्यात केलेल्या विकासकामांचा अहवाल सादर केला. या अहवालाचे प्रकाशन करण्यात आले. मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडून अधिकाऱ्यांना मिळणाऱ्या वागणुकीबाबत तक्रारी आल्या. त्यानुसार आपण त्यांच्याशी याआधी चर्चा केली आहे. तरीही त्यात सुधारणा न झाल्यास अ‍ॅक्शन घेणे भाग पडेल, असे ते म्हणाले. (प्रतिनिधी) राज यांचा आरोप चुकीचा महापौर बंगल्याची जागा सेनाप्रमुख ठाकरे यांना खूप प्रिय होती. त्यामुळे तेथे स्मारक उभारण्याचा निर्णय योग्यच असल्याचे शिवसेनेचे मत आहे. याबाबत राज ठाकरे यांचा आरोप चुकीचा आहे. स्मारकाला विरोध करणाऱ्या राज यांचा काकांबाबतचा आदरभाव गेला कुठे, असा सवाल वायकर यांनी केला. ...तर मी भाग्यवानच माझ्या मातोश्री क्लबसाठी ५ एकर जागा दिली जाते, तर ठाकरेंच्या स्मारकासाठी अडीच एकर जागा का ? असे वक्तव्य राज ठाकरे यांनी केले होते. त्याबाबत वायकर म्हणाले, या प्रकल्पाच्या ठिकाणी सेनाप्रमुखांचे स्मारक झाले तर मी भाग्यवान समजेन. परंतु ज्याठिकाणी सेनाप्रमुख वावरत होते, बैठका घ्यायचे ते त्यांचे प्रिय ठिकाण महापौर बंगल्याचेच आहे, असेही ते म्हणाले.