वैभववाडी, सावंतवाडीला वादळी पावसाने झोडपलेकणकवली : सध्या उष्म्यात झालेली प्रचंड वाढ, दिवसेंदिवस वाढणारी उष्णता यामुळे हैराण झालेल्या सिंधुदुर्ग जिल्हावासीयांना पावसाने बुधवारी काहीसा दिलासा दिला. सावंतवाडी तालुक्यातील वेर्ले, शिरशिंगे व सांगेली या भागात वादळी वाऱ्यासह पाऊस बरसला. वैभववाडी तालुक्यात पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या. त्यामुळे आठवडा बाजाराला आलेल्यांची तारांबळ उडाली. मालवण, कुडाळ तालुक्यांत ढगाळ वातावरण होते. देवगड तालुक्यात शिरगाव परिसरात पहाटे रिमझिम पाऊस पडला. सावंतवाडी तालुुक्यातील वेर्ले, शिरशिंगे, सांगेली परिसरात वादळी वाऱ्यासह बुधवारी पाऊस पडला. त्यामुळे ग्रामस्थांची एकच त्रेधातिरपीट उडाली.
वैभववाडी, सावंतवाडीला वादळी पावसाने झोडपले
By admin | Updated: May 3, 2017 23:10 IST