शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

वैभववाडी रणझुंजार संघाला विजेतेपद

By admin | Updated: January 19, 2015 00:20 IST

ओरोसचा संघ उपविजेता : कणकवलीतील राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धा

कणकवली : येथील मुडेश्वर मैदानावर झालेल्या राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्यात रणझुंझार वैभववाडी संघाने रवळनाथ ओरोस संघावर एकतर्फी विजय मिळवला आणि बाजारपेठ मित्रमंडळाच्या चषकावर आपले नाव कोरले. संघाला १ लाख ११ हजार १११ रूपये बक्षिसादाखल मिळाले. तर उपविजेत्या रवळनाथ ओरोस संघाला ५० हजार १११ रूपये आणि चषक देऊन गौरविण्यात आले. माजी मुख्यमंत्री नारायण राणे आणि सिनेअभिनेत्री सई ताम्हणकर यांच्या हस्ते विजेत्यांना गौरविण्यात आले. रणझुंझार वैभववाडी संघाने सहा षटकांत ६ गड्यांच्या मोबदल्यात ७३ धावा केल्या. या लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या रवळनाथ संघाचे फलंदाज रणझुंझारच्या क्षेत्ररक्षकांनी केलेल्या उत्कृष्ट कामगिरीमुळे अवघ्या ३६ धावांत तंबूत परतले. सामनावीर म्हणून रणझुंझारच्या कृष्णा सातपुते याला गौरविण्यात आले. उपांत्य फेरीतील पराभूत रफ अ‍ॅण्ड टफ वेंगुर्र्ले आणि अभि मांजरेकर कणकवली या दोन संघांना प्रत्येकी ५१११ रूपये देऊन गौरविण्यात आले. कॉलेजचा जनरल सेक्रेटरी झाल्यापासून सहकारी आणि हितचिंंतकांच्या सहकार्याने क्रिकेट स्पर्धा भरवत आहे. सामाजिक बांधिलकीतून हे काम करत आहे. या स्पर्धांमधून खेळाडूंना प्रोत्साहन मिळावे, असे बाजारपेठ मित्रमंडळाचे अध्यक्ष संदेश पारकर म्हणाले. मालिकावीर म्हणून कृष्णा सातपुते (रणझुंझार वैभववाडी), उत्कृष्ट फलंदाज निखील परब (ओरोस), उत्कृष्ट गोलंदाज संदेश पार्टे (वैभववाडी), उत्कृष्ट क्षेत्ररक्षक प्रज्ञेश रटाले (ओरोस), उत्कृष्ट यष्टीरक्षक युवराज (ओरोस) या सर्वांना रोख रक्कम व चषक देऊन गौरविण्यात आले. (प्रतिनिधी)विकासासाठीएकत्र या : नारायण राणेसिंधुदुर्गात दर्जेदार क्रीडा स्पर्धा आणि सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात संदेश पारकर यांचा हात कोणी धरणार नाही. अशा क्रिकेट स्पर्धांमधून राज्य आणि देशपातळीवरील खेळाडू निर्माण व्हायला हवेत. क्रिकेटप्रमाणे जिल्ह्याच्या सामाजिक आणि आर्थिक विकासासाठी संघटीत झाल्यास विकासाला हातभार लागेल, असे माजी मुख्यमंत्री नारायण राणे म्हणाले. राणे नेहमीच सिनेसृष्टीच्या पाठिशी : सई ताम्हणकरमराठी सिनेसृष्टीला दिशा देण्यासाठी नारायण राणे नेहमीच कलाकारांच्या पाठिशी राहत असल्याचे सांगताना सिनेअभिनेत्री सई ताम्हणकर यांनी दुनियादारी चित्रपटाच्या निर्मितीसाठी राणे कुटुंबीयांनी केलेल्या मदतीचा उल्लेख केला. स्पर्धेत यशस्वी खेळाडूंनी पुढील काळात सातत्य ठेवावे, असे सई ताम्हणकर यांनी सांगितले.