शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

कुडाळमधील पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत वैभव नाईकांना अश्रु अनावर

By महेश विद्यानंद सरनाईक | Updated: December 2, 2024 19:16 IST

आता पुन्हा एकदा नव्याने आपल्याला सुरुवात करायची आहे : वैभव नाईक

कुडाळ : माझा पराभव हा लढाई करून झाला आहे. पराभव स्वीकारला असून कोणतीही कारणे द्यायची नाहीत आता पुन्हा एकदा नव्याने आपल्याला सुरुवात करायची आहे, अशी प्रतिक्रिया कुडाळ तालुका पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत माजी आमदार वैभव नाईक यांनी दिली. यावेळी नाईक भावुक झाल्याने त्यांना हुंदका अनावर झाला.कुडाळ तालुका उद्धवसेना पक्षाची सोमवारी बैठक वैभव नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत झाली. यावेळी जिल्हाप्रमुख संजय पडते, उपजिल्हाप्रमुख अमरसेन सावंत, नागेंद्र परब, युवासेना जिल्हाप्रमुख मंदार शिरसाट, महिला जिल्हा संघटक श्रेया परब, कुडाळ शहरप्रमुख संतोष शिरसाठ, तालुकाप्रमुख राजन नाईक तसेच सर्व आजी-माजी लोकप्रतिनिधी तसेच सर्व शिवसैनिकांनी सोमवारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.यावेळी वैभव नाईक यांनी सांगितले की, आपण सर्वांनी लढाई लढली. माझ्यासाठी संघर्ष नवीन नाही, संघर्ष नेहमीच करत आलो आहे. या मतदारसंघाने दोन वेळा आमदार केले आताही ७२ हजार लोकांनी मतदान केले असून या सर्व जनतेसाठी पुन्हा एकदा उभा राहणार आहे. सर्वांचे प्रश्न समस्या सोडवण्यासाठी वेळप्रसंगी रस्त्यावर उतरून आंदोलन छेडू. जे शेवटपर्यंत राहतील त्यांच्यासाठी काम करत राहणार. यावेळी संजय पडते यांनी सांगितले की, मतभेद बाजूला ठेऊन एकसंध रहा, सर्व कामे शिवसेनेच्या माध्यमातून झाली, सर्व गावागावात नाईक पोहचले, आपली ताकद तशीच ठेवा यापुढे यश आपलेच आहे.

मला आमदार म्हणू नकाआता मी आमदार नाही. त्यामुळे मला कोणीही आमदार म्हणून हाक मारू नका. वैभव नाईक या नावाने हाक मारली तरी चालेल. कारण पदे ही येतात, जातात ती कायमस्वरूपी नसतात आणि मी आमदारकी मिरवायची म्हणून कधीही मिरवली नाही. दुसऱ्या पक्षात देण्यासाठी मला अनेक प्रलोभने दाखवण्यात आली. परंतु आम्ही आमच्या पक्ष नेतृत्वाशी ठाम राहिलो पक्षाशी ठाम राहिलो हललो नाही.

काम न करणाऱ्यांच्या जागी नवे पदाधिकारी नेमाआम्ही निवडणूक विचारावर लढवली मात्र विरोधकांनी वेगवेगळे मुद्दे आणले. जे निवडून आले त्यांना मी या अगोदरच शुभेच्छा दिल्या आहेत, त्यांनी चांगलं काम करावं. पक्ष संघटनावाढीबाबत त्यांनी सांगितले की जे पदाधिकारी काम करीत नाहीत त्या ठिकाणी नवीन पदाधिकारी नेमण्यात यावेत.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गVaibhav Naikवैभव नाईक kudal-acकुडाळ