शहरं
Join us  
Trending Stories
1
'एक बैठक घेण्यासाठी मनोज जरांगेंना आमदार १०-१५ लाख रुपये देतात'; लक्ष्मण हाकेंचा गंभीर आरोप
2
Lalbaugcha Raja 2025 : 'ही शान कोणाची... लालबागच्या राजाची!!"; बाप्पाच्या सजावटीत यंदा खास काय?
3
लाडकी बहीण योजनेच्या गैरवापराची चौकशी करणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
4
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
5
Bigg Boss 19 Premiere : नव्या पर्वाची दणक्यात सुरुवात! 'ही' आहे पहिली स्पर्धक
6
Bigg Boss 19: घरात होणार गँगवॉर! 'गँग्स ऑफ वासेपूर' फेम अभिनेत्याची 'बिग बॉस'मध्ये एन्ट्री
7
युक्रेनने रशियावर मोठा हल्ला केला, अणुऊर्जा प्रकल्पाजवळ ड्रोन हल्ला; स्वातंत्र्यदिनी मोठी कारवाई केली
8
महिन्याला १ लाख कमवायची निक्की; तरीही का बंद केला ब्युटी पार्लरचा व्यवसाय? वडिलांनी सांगितलं कारण, म्हणाले...
9
पूजाचं ऐकलं अन् पुजारानं हा निर्णय घेतला! निवृत्तीनंतर स्वत: शेअर केली 'अनटोल्ड स्टोरी'
10
सुनेला जाळून मारण्यात मुलाची केली मदत; दिल्लीच्या निक्की भाटी प्रकरणात सासूला अटक!
11
स्कॉर्पिओ, बुलेट, रोख रक्कम आणि सोने; एवढे सगळे देऊनही निक्कीला रोज रात्री मारहाण करायचे, बहिणीने केले धक्कादायक खुलासे
12
विद्यार्थ्याचा पाय घसरला, शिक्षक वाचवायला गेले; वेरुळच्या जोगेश्वरी कुंडात बुडून दोघांचा मृत्यू 
13
'कभी खुशी कभी गम' फेम अभिनेत्री झाली आई, ३४व्या वर्षी दिला गोंडस लेकीला जन्म
14
'सन्मानजनक निरोप द्यायला हवा होता...', पुजाराच्या निवृत्तीवर शशी थरुर यांची भावनिक पोस्ट
15
Ganpati 2025: शिव ठाकरेच्या घरी वाजत गाजत आले गणपती बाप्पा, इतकी सुंदर मूर्ती की नजरच हटेना, पाहा व्हिडीओ
16
Asia Cup 2025: आशिया चषकात सर्वाधिक सामने जिंकणारे टॉप-५ कर्णधार!
17
भारतानंतर आता युरोपचाही अमेरिकेला मोठा धक्का; 'या' दोन देशांनी 'एफ ३५' फायटर जेट्स खरेदीला दिला नकार!
18
राहुल गांधींच्या सुरक्षेत मोठी चूक; तरुण Kiss घेऊन पळाला, व्हिडिओ व्हायरल...
19
राज्यात १७ लाख कर्मचाऱ्यांना बाप्पा पावला! पगाराबाबत सरकारने घेतला महत्त्वाचा निर्णय
20
"मी सोहमला सांगितलंय लग्नानंतर वेगळं राहायचं...", सुचित्रा बांदेकर स्पष्टच बोलल्या, म्हणाल्या- "एकत्र राहून रोज..."

३,८४१ जणांकडून नोटाचा वापर

By admin | Updated: October 21, 2014 23:44 IST

विधानसभा निवडणूक : सर्वाधिक सावंतवाडी मतदारसंघात

गिरीश परब - सिंधुदुर्गनगरी विधानसभा निवडणुकीदरम्यान महायुती आणि आघाडी तुटल्याने मतदारांना यंदा उमेदवारांचे एकापेक्षा अनेक पर्याय उपलब्ध होते. तरीदेखील यापैकी कोणताही उमेदवार आमच्या दृष्टीस पात्र नसल्याचा निष्कर्ष काढून जिल्ह्यातील तब्बल ३ हजार ८४१ मतदारांनी ‘नन आॅफ द अबोव्ह’चा (नोटा) अधिकार वापरला आहे. नोटाचे मतदान होणारी विधानसभेची ही पहिलीच निवडणूक आहे. या अगोदर गेल्या लोकसभेला ‘नोटा’ हा पर्याय होता. १९ आॅक्टोबरला नुकत्याच पार पडलेल्या निवडणूक प्रक्रियेतील मतमोजणीच्या निकालानंतर नोटाचा सर्वाधिक वापर हा सावंतवाडी मतदारसंघात तर दुसऱ्या स्थानावर कणकवली मतदारसंघात नोटाचा वापर करण्यात आला आहे तर तिसऱ्या स्थानावर कुडाळ विधानसभेचा क्रमांक लागतो.निवडणुकीच्या रिंगणातील उमेदवार मान्य नसेल तर अनेक मतदार गेल्यावर्षापर्यंत मतदान न करण्याचा पर्याय निवडत होते. मात्र नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीदरम्यान पहिल्यांदाच मतदानाच्या यंत्रावर ‘नोटा’च्या स्वतंत्र बटणाचा समावेश झाला. नोटा पर्याय असलेली लोकसभा ही पहिलीच निवडणूक ठरली होती. त्यानंतर आता विधानसभेत या ‘नोटा’ पर्यायाचा वापर करण्यात आला होता.कणकवली विधानसभा मतदारसंघात कणकवली, देवगड व वैभववाडी हे तालुके येत असून त्यामध्ये १ लाख ५५ हजार ५३८ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. त्यातील १३८१ मतदारांनी नोटा हा पर्याय निवडला. कुडाळ विधानसभा मतदारसंघात कुडाळ व मालवण हे दोन तालुके येतात. यामध्ये १ लाख ४० हजार ४५८ मतदारांनी मतदान केले होते. त्यातील ९४९ मतदारांनी ‘नोटा’ला पसंती दिली. तर सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात सावंतवाडी, वेंगुर्ला व दोडामार्ग हे तीन तालुके येतात. या तीन तालुक्यातून १ लाख ४५ हजार ३४८ मतदारांनी मतदान केले होते. त्यातील १५११ मतदारांनी नोटा पर्याय निवडला. असे जिल्ह्यात एकूण ४ लाख ४१ हजार ३४४ एवढे मतदान झाले होते. त्यातील तब्बल ३ हजार ८४१ मतदारांनी ‘नोटा’ला पसंती दिली आहे.यंदाच्या विधानसभा निवडणुकीत महायुती व आघाडी संपुष्टात आल्याने उमेदवारांची संख्या कमालीची वाढली होती. वेगवेगळे तर्कवितर्क लढविले जात होते. मात्र कुणालाच मत न देता गप्प राहण्यापेक्षा ‘नोटा’ बटण दाबणेच मतदारांनी पसंत केले. त्यामुळे जिल्ह्यात ३ हजार ८४१ मतदारांनी ‘नोटा’चे बटण दाबले.मतदारांकडून नोटाचा वापर...मतदारसंघएकूण मतदान नोटा मतेकणकवली१,५५,५३८१३८१कुडाळ१,४०,४५८९४९सावंतवाडी१,४५,३४८१५११एकूण४,४१,३४४३८४१