शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या महायुद्धानंतर प्रथमच युरोपावर युद्धाचे ढग; पोलंडने सीमेवर तैनात केले ४० हजार सैनिक
2
नेपाळची संसद भंग, निवडणुकीच्या तारखांची घोषणा; शुक्रवारी रात्री शेजारील देशात काय काय घडलं?
3
देशभरातील घरे होणार स्वस्त; ग्राहकांना थेट लाभ देण्याची क्रेडाईची मोठी घोषणा
4
UN परिषदेत १४२ देशांसह भारतानं उचललं मोठं पाऊल; अमेरिका अन् इस्रायलला बसला झटका, काय घडलं?
5
फवाद-वाणी कपूरचा 'अबीर गुलाल' भारतातही रिलीज होणार, पहलगाम हल्ल्यानंतर झाला होता बॅन
6
पोस्टाची जबरदस्त स्कीम; महिन्याला करा 'इतकी' गुंतवणूक देईल ₹४० लाखांचा रिटर्न, जाणून घ्या संपूर्ण गणित
7
आजचे राशीभविष्य- १३ सप्टेंबर २०२५: आर्थिक लाभाचा दिवस, पण वाणीवर संयम ठेवा
8
मराठा समाजाला अगोदर मिळालेले आरक्षण नकोय का? रद्द करायचे का?; ओबीसी नेते छगन भुजबळांचा सवाल
9
महाराष्ट्राविना देशाचा गाडा न चाले! देशात सर्वाधिक रोजगार, कंपन्या अन् पेन्शनधारक राज्यात
10
स्पाईसजेट विमानाचे चाक टेकऑफ घेताना निखळले; एकाच चाकावर मुंबईत लँडिंग, मोठी दुर्घटना टळली 
11
'महादेवी'चा निर्णय उच्चस्तरीय समितीने घ्यावा, सर्वोच्च न्यायालय; हत्तीण मठाकडे पाठविण्यास ‘पेटा’चा विरोध
12
विशेष लेख: ‘जेन झी’च्या डोक्यात ही खदखद कुणी भरली आहे? 
13
पतीचे भाकीत ठरले खरे ; डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्यावरून ठेवले नाव
14
जेन झीने महिलेच्या हाती सोपविली नेपाळची धुरा, एकमताने सुशीला कार्की नव्या पंतप्रधान
15
अग्रलेख: मान्सून तिबेटात, धस्स भारतात! मानवी उपद्व्यापच कारणीभूत
16
कुर्डूतील मुरुम उत्खनन बेकायदेशीरच आहे; पालकमंत्री जयकुमार गोरेंचा खुलासा
17
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मणिपुरला भेट देणार; पाच राज्यांचा दौरा 
18
चॅटजीपीटीनं त्याला पाठवलं मृत्यूच्या दारात; घशातील त्रास, AI ने काय दिला सल्ला?
19
‘भारत मोठा झाल्याची भीती वाटते म्हणून टॅरिफ लावला’; सरसंघचालक मोहन भागवतांचे मोठे विधान
20
केवळ शब्दांनी नव्हे, तर आपल्या मुलांना महात्मा गांधीजींप्रमाणे वर्तनातून शिकवा -मोरारीबापू

ऊर्जा चांगल्या कामासाठी वापरा

By admin | Updated: June 30, 2015 21:52 IST

अमोल मडामे : गोपुरीत व्यसनमुक्ती निर्धार प्रबोधन शिबिर

कणकवली : देशात तरुणांची संख्या ६५ टक्के आहे. या युवा वर्गाची ऊर्जा परिवर्तनाच्या कामासाठी वापरल्यास देश बलशाली होण्यास वेळ लागणार नाही. यासाठी जाणकारांनी युवा वर्गासमोर सातत्याने सकारात्मक विचार ठेवले पाहिजेत. युवा वर्गाकडून होणाऱ्या चुकांसाठी त्यांना दोष देत बसण्यापेक्षा त्यांच्यातील ऊर्जा चांगल्या कामासाठी वापरूया, असे प्रतिपादन नशाबंदी मंडळ, मुंबईचे संघटक अमोल मडामे यांनी गोपुरी आश्रमात केले. राष्ट्रसेवा दल कणकवली शाखेच्या युवा वर्गासाठी एकदिवसीय व्यसनमुक्ती निर्धार प्रबोधन कार्यशाळेत ते बोलत होते. अमोल मडामे म्हणाले की, जगात १६ टक्के लोक अतिमद्यपान करतात. त्यात भारतातील मद्यपींचे प्रमाण ११ टक्के आहे. भारताच्या एकूण लोकसंख्येपैकी १५ कोटी लोक जास्त दारू पितात. याचा परिणाम ७५ कोटी लोकांवर होतो. व्यसन हा जगातील आणि आपल्या देशातील मोठा अतिरेकी आहे. व्यसन माणसे आणि कुटुंबे उद्ध्वस्त करते. आईवडील जर व्यसनी असतील, तर त्यांच्यामुळे त्यांची मुले व्यसनी होण्याची शक्यता ४०० टक्के असते. वरचे उत्पन्न असणाऱ्या व्यक्ती व्यसनांकडे जास्त वळतात. त्याप्रमाणे ग्रामीण आणि झोपडपट्टीतील नागरिक संगतीने व्यसनांकडे कधी वळतात त्यांना कळत नाही. यातून मालाड-मालवणीसारख्या घटना घडतात. व्यसन सोडवायचे असल्यास मनाचा निर्धार असणे गरजेचे असते. हा निर्धार व्यसनमुक्ती कार्यशाळा, समुपदेशन आदी मार्गातून निर्माण करता येतो. व्यसने सातत्याने प्रबोधन करूनच सोडवता येणे शक्य आहे. शासन व्यसने सोडविण्यासाठी निर्णायक क्षमतेपर्यंत येऊ शकत नाही. व्यसन म्हणजे आजारच आहे. कार्यशाळेसाठी जिल्हा संघटक अर्पिता मुंबरकर, संकल्प प्रतिष्ठानचे अध्यक्ष मुराद अली शेख, गोपुरी आश्रमाचे अध्यक्ष डॉ. राजेंद्र मुंबरकर, सत्यशोधक विद्यार्थी संघटनेचे सुदीप कांबळे, दर्पण सांस्कृतिक मंचचे संस्थापक उत्तम पवार, राष्ट्रसेवा दल कणकवली शाखाध्यक्ष सृष्टी तावडे आदी पदाधिकारी उपस्थित होते. (प्रतिनिधी)घेतली व्यसनमुक्तीची शपथनशाबंदी मंडळ महाराष्ट्रच्या सरचिटणीस वर्षा विलास म्हणाल्या की, युवा वर्गाने पुढील पिढी जबाबदार आणि व्यसनमुक्त बनविण्यासाठी आधी स्वत:साठी आणि आपल्या समाजाला व्यसनांपासून दूर नेण्यासाठी सतर्क रहायला हवे. यावेळी शाहीर रामकृष्ण डिगसकर यांनी गीत व भारुडांच्या माध्यमातून व्यसनांचे दुष्परिणाम युवकांसमोर मांडले. या कार्यशाळेनंतर सायंकाळी शिवाजी चौक ते बुद्धविहार अशी प्रबोधन प्रचार फेरी काढण्यात आली. या प्रचार फेरीच्या समारोपप्रसंगी बुद्धविहारात युवा वर्गाला नगराध्यक्षा अ‍ॅड. प्रज्ञा खोत यांनी आयुष्यभर व्यसनमुक्त राहण्याची शपथ दिली.