शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
4
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
5
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
6
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
7
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
8
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
9
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
10
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
11
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
12
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
13
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
14
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
15
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
16
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
17
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
18
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
19
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
20
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
Daily Top 2Weekly Top 5

अज्ञात आजाराने शेळ्या दगावल्या

By admin | Updated: June 21, 2017 00:25 IST

नुकसान भरपाईची मागणी : मेंढपाळ व्यावसायिकांत खळबळ

लोकमत न्यूज नेटवर्क कडावल : किनळोस येथील शेतकऱ्याचे तीन नर बोकड व एक शेळी अज्ञात रोगामुळे सोमवारी दगावले. पूर्ण वाढ झालेल्या या जनावरांची किंमत सुमारे साठ हजार असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. संबंधित शेतकऱ्याला नुकसान भरपाई देण्यात यावी, अशी मागणी होत आहे. दरम्यान, चार शेळ्या एकाचवेळी दगावल्यामुळे गावातील मेंढपाळ वर्गात खळबळ माजली आहे. किनळोस येथील अर्जुन सावंत व त्यांच्या कुटुंबीयांचा शेळीपालनाचा जोडधंदा आहे. मागील तीन पिढ्यांपासून हे कुटुंब पारंपरिक शेळीपालन करत आहे. सावंत हे रोजच्याप्रमाणे सोमवारी आपल्या शेळ््यांना चरविण्यासाठी जंगलात घेऊन गेले होते. सायंकाळपर्यंत सर्व शेळ््या सुरक्षित होत्या. मात्र, सायंकाळी घरी परतल्यानंतर काही शेळ््या अचानक अत्यवस्थ झाल्या. त्या चालताना तोल जाऊन पडू लागल्या. काही वेळ त्यांच्या शरीराला कंप सुटला व थोड्याच वेळात चार शेळ््या गतप्राण झाल्या. मृत झालेल्या चार शेळ्यांपैकी तीन पूर्ण वाढ झालेले विक्रीयोग्य नर बोकड, तर एक मादी होती. पूर्ण वाढ झालेल्या या चार बोकडांची किंमत सुमारे साठ हजार असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. कळपातील चार शेळ्या अचानक दगावल्यामुळे सावंत कुटुंबीय हवालदिल झाले आहे. किनळोस गाव अतिशय डोंगराळ असून येथील भौगोलिक परिस्थिती शेळीपालनास अनुकूल असल्याने या गावातील अनेक शेतकरी शेतीला जोडधंदा म्हणून पूर्वापारपासून शेळीपालन व्यवसाय करत आहेत. मटणासाठी बोकडाला असलेली मागणी व मिळणाऱ्या बाजारभावामुळे काही नवीन तरूणही या व्यवसायाकडे आकर्षित झाले असून, त्यांनीही जोडधंदा म्हणून हा व्यवसाय स्वीकारला आहे. मात्र, गेल्या काही वर्षांपासून विविध रोगांमुळे शेळ््या मृत होण्याच्या प्रमाणात वाढ झाली आहे. विशेषत: पावसाळ््याच्या दिवसात अचानक आजार उद्भवून शेळ्या तडकाफडकी मृत होण्याचे प्रकार वाढत आहेत. विविध आजारांमुळे शेळ््या-मेंढ्या दगावत असताना दुसरीकडे बिबटे व कोळसुंद्यांसारख्या हिंस्त्र प्राण्यांची वक्रदृष्टीही या व्यवसायावर पडत आहे. बिबटे व कोळसुंद्यांनी गेल्या काही वर्षात येथील मेंढपाळांच्या शेकडो शेळ््या-मेंढ्या फस्त केल्या आहेत. काही वर्षांपूर्वी याच नुकसानग्रस्त कुटुंबाच्या मालकीच्या सतरा शेळ््या कोळसुंद्यांनी एकाच वेळी ठार केल्या होत्या आणि आता पुन्हा चार शेळ््या अचानक दगावल्यामुळे सावंत कुटुंब हतबल झाले आहे. या कुटुंबाला नुकसान भरपाई देण्यात यावी, अशी मागणी होत आहे. या घटनेमुळे गावातील मेंढपाळवर्गात खळबळ माजली आहे.