शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
6
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
7
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
8
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
9
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
10
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
11
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
12
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
13
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
14
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
15
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
16
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
17
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
18
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
19
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
20
Latest Marathi News LIVE: डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
Daily Top 2Weekly Top 5

एक दिवस शाळेसाठी उपक्रम अविस्मरणीय!

By admin | Updated: July 8, 2016 01:03 IST

३९१ शाळा : नांदगाव येथे जिल्हाधिकाऱ्यांची भेट

सिंधुदुर्गनगरी : एक दिवस शाळेसाठी हा उपक्रम सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ३९१ शाळांमधून राबविण्यात आला. जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी कणकवली तालुक्यातील नांदगाव मधलीवाडी शाळेत तर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शेखर सिंंह यांनी मालवण तालुक्यातील शिरवंडे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नं. १ येथे भेट दिली. जिल्ह्यातील विविध अधिकाऱ्यांनी एक दिवस शाळेसाठी हा उपक्रम अविस्मरणीय केला.समाजातील सर्व घटकांना शिक्षणाचे महत्व पटवून देणे, प्राथमिक शाळेतील शिक्षणाचा दर्जा वृध्दींगत होण्यासाठी मौलिक सूचना करणे, शालेय पोषण आहार योजनेतील भोजनाचा दर्जा तपासणे, शाळांतील त्रृटींचा आढावा घेणे व उपाययोजना सूचविणे, बालकांशी समरस होऊन त्यांच्यातील आत्मविश्वास वाढीसाठी उपाययोजना सूचविणे, पटांगण, ग्रंथालय, स्वच्छता गृह आदी सुविधांची पाहणी करणे, शालेय पाठ्यक्रमातील विषयांखेरीज विद्यार्थ्यांचे सामान्य ज्ञान वाढीसाठी वर्गनिहाय मार्गदर्शन करणे आदी बाबत आजच्या या उपक्रमांतर्गत अधिकारी वर्गाने नेमून दिलेल्या शाळांचा दिवसभर आढावा घेतला. शाळा भरताना सुरवातीस सादर होणारे राष्ट्रगीत, पाठ, वृत्तपत्र वाचन, दिनविशेष याच बरोबर समुहगान, दुपारच्या सत्रात पटांगणावर सादर केलेले क्रीडा प्रकार, स्वच्छ परिसर, परिसरातील वृक्ष लागवड, वर्ग शिक्षकांची शिकवितानाची तन्मयता, विद्यार्थांशी विषयानुरुप साधलेला संवाद, विद्यार्थी वर्गाचे चिकित्सक प्रश्न, अंगभूत असलेल्या गुणांचे सादरीकरण या सर्व बाबींमुळे बहुतांशी अधिकारी वर्ग प्रभावित झाले. वर्गावर तासिका घेण्याचा अनुभव अत्यंत सुखद होता. बऱ्याच वर्षांनी लहान विद्यार्थी होण्याचा अनुभव व या विद्यार्थ्यांशी वेगळ्या विषयांवर संवाद साधण्याची अनुभूती आनंददायी होती अशी प्रतिक्रियाही एक दिवस शाळेसाठी या उपक्रमात सहभागी झालेल्या अधिकारी वर्गाने व्यक्त केली. एक दिवस शाळेसाठी या उपक्रमाचा सिंधुदुर्ग जिल्ह्यात दुसरा टप्पा २१ जुलै २०१६ रोजी आयोजित करण्यात आला आहे. (प्रतिनिधी)दुसरा टप्पा :२१ जुलैला एक दिवस शाळेसाठी या उपक्रमाचा सिंधुदुर्ग जिल्ह्यात दुसरा टप्पा २१ जुलै २०१६ रोजी आयोजित करण्यात आला आहे.