शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

‘त्या’ वादावर अखेर तोडगा

By admin | Updated: September 28, 2016 23:59 IST

महादेवाचे केरवडेमध्ये बैठक : गावकरी-मानकऱ्यात सामंजस्याचा निर्णय

माणगाव : महादेवाचे केरवडे येथील मानकरी, गावकरी व ग्रामस्थ यांच्यातील वादावर अखेर समन्वय बैठकीतून तोडगा काढण्यात आला.  यापुढे ज्या गावकरी मंडळींना ग्रामदेवतेच्या देवळात नारळ फोडणे, भटजी येण्याबाबत आडकाठी न आणणे व वैयक्तिक वादापोटी एखाद्याला वाळीत टाकणे हे प्रकार थांबविण्यात येणार असल्याचा निर्णय घेण्यात आला. यावेळी ग्रामस्थांनी सामंजस्यपूर्वक मते मांडल्याने बैठक उत्साहात पार पडून गावाच्या समृद्ध वाटचालीस नवी सुरूवात झाल्याची मते व्यक्त करण्यात आली. महादेवाचे केरवडे मालाचीराई येथील कविटकर-सावंत आदी ग्रामस्थांनी पोलिसांकडे आपले नारळ ग्रामदेवतेच्या देवळात ठेवू न देणे, आपल्याकडे लग्नसमारंभासाठी आडकाठी आणणे व वैयक्तिक वादापोटी एखाद्याकडे इतरांनाही जाण्यास मज्जाव करणे आदी बाबतीत निवेदन दिले होते. या नियोजनाची दखल घेऊन गावातील समझोता व गाव एक संघ राहण्याच्या दृष्टीने अ‍ॅड. किशोर शिरोडकर, सरपंच पंढरीनाथ परब, माजी सरपंच बाळ केसरकर, अ‍ॅड. चंद्रशेखर परब आदींनी बुधवारी समन्वयाची बैठक घेतली. ही बैठक महादेवाचे केरवडे ग्रामदैवत श्री रवळनाथ पावणाई मंदिरात पार पडली. या बैठकीस सावंतवाडीचे उपविभागीय पोलिस अधिकारी प्रविण चिंचाळकर, कुडाळ पोलिस निरीक्षक हेमंतकुमार शहा, माणगावचे साहायक पोलिस उपनिरीक्षक चव्हाण यांसह पंढरीनाथ परब, अ‍ॅड. किशोर शिरोडकर, बाळ केसरकर, मधुकर परब, मंगेश परब, राजन सावंत, विजय म्हाडगूत, राजू कविटकर आदींसह गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी प्रत्येकाने आपला हक्क व कर्तव्य पार पाडताना इतरांना त्रास होईल असे वर्तन न करण्याबाबत एकमत झाले. ज्या लोकांच्या तक्रारी होत्या, त्यांच्या म्हणण्याप्रमाणे त्यांचे नारळ ठेवणे, लग्न समारंभ आदीबाबतीत मानकरी लागतील, तशी पूर्वकल्पना मानकऱ्यांना द्यावी. नारळ ठेवायचा असल्यास तशीही कल्पना द्यावी. असे यावेळी ठरविण्यात आले.सण समारंभात देवळात सर्व ग्रामस्थांचे नारळ ठेवणे, गाऱ्हाणी करण्याबाबत समन्वय तोडगा काढण्यात आला. यामुळे ग्रामस्थांमध्ये समाधान व्यक्त करण्यात आले. (प्रतिनिधी)हेवाळेकर प्रकरणाची पुनरावृत्ती नकोमहादेवाचे केरवडे येथील ग्रामदेवतेच्या देवळात काही ग्रामस्थांचे नारळ ठेवले जात नसल्याबाबत तक्रार हेवाळेकर प्रकरणाशी सर्व केरवडेवासीयांचा काही संबंध नसून, या प्रकरणामुळे संपूर्ण राज्यात गावाची बदनामी झाली. याची पुनरावृत्ती होऊ नये, म्हणून घेण्यात आलेल्या समन्वयक बैठकीत अशा प्रकरणाची पुनरावृत्ती होणार नसल्याचा सर्वानुमते निर्णय घेण्यात आला. गावाच्या समृद्ध वाटचालीची सुरूवातमहादेवाचे केरवडेतील गावकरी-मानकऱ्यांतील वाद गेली कित्येक वर्षे सुरू होता. यावादामुळे गावात कोणत्याही चांगल्या कामाची निर्मिती झाली नाही. उलट गावाची बदनामीच होत होती. पण या समन्वय बैठकीतील सर्व मान्य तोडग्याने गावाच्या समृद्ध वाटचालीचे नवे पर्व सुरू झाल्याच्या भावना व्यक्त करण्यात आल्या.