शहरं
Join us  
Trending Stories
1
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
2
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
3
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
4
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
5
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
6
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन
7
राजा रघुवंशी हत्याकांडाची पुनरावृत्ती; पैसे देऊन गुंड बोलावले, पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं!
8
आम्ही मोसादचं हेडक्वार्टर उडवलं, इस्रायली मिलिट्री इंटेलिजन्सलाही निशाणा बनवलं; इराणचा मोठा दावा
9
IND vs ENG : तेंडुलकर-अँडरसन ट्रॉफीसह आता मालिका विजेत्या कर्णधाराला दिले जाणार 'पतौडी मेडल'
10
मस्करीची झाली कुस्करी! मित्राने चिडविले म्हणून ठोसा मारला, त्याने हॉस्पिटलमध्ये जीव सोडला
11
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
12
Kareena Kapoor : "मी २ महिने शाहिदच्या मागे लागलेली, खूप सारे SMS करायची, मी पहिली व्यक्ती होती, जी..."
13
'सद्दाम हुसेनसारखी अवस्था...', इस्रायलचा इराणचे प्रमुख अयातुल्ला अली खमेनी यांना थेट इशारा
14
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
15
"तो मरेल, जनरेटर चालू करा..."; डायलेसिस करताना लाईट गेली, आईसमोर लेकाचा तडफडून मृत्यू
16
“काँग्रेसकडे प्रेरणादायक काही नाही; नेतृत्वहीन, नात्यागोत्याचा पक्ष झाला”: अशोक चव्हाण
17
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
18
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
19
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
20
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?

दुचाकी चोरणारा होमगार्ड ताब्यात

By admin | Updated: March 24, 2015 00:17 IST

मालवण पोलिसांना यश : बसस्थानकावरील चोरी प्रकरण

मालवण : तीन महिन्यांपूर्वी मालवण बसस्थानकावर उभी करून ठेवलेली दुचाकी चोरीप्रकरणाचा शोध लावण्यात मालवण पोलिसांना यश आले असून या प्रकरणी पोलिसांनी संतोष हिंदळेकर या मालवणातील होमगार्डला सोमवारी ताब्यात घेतले आहे.मालवण पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मालवण सर्जेकोट येथील संध्या दशरथ जामसंडेकर या कुडाळच्या ग्रामीण रुग्णालयात नोकरीस असणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांनी १३ डिसेंबर २०१३ रोजी सायंकाळी आपल्या मालकीची प्लेजर दुचाकी (एम. एच. ०७, आर-८६२३) ही मालवण बसस्थानकावर उभी करून त्या कुडाळ येथे कामास गेल्या होत्या. दुसऱ्या दिवशी म्हणजेच १४ डिसेंबर रोजी सकाळी त्या मालवण बसस्थानकावर आल्या असता त्यांना उभ्या करून ठेवलेल्या जागी दुचाकी दिसली नाही. म्हणून त्यांनी शोधाशोध केली. मात्र ती न मिळाल्याने त्यांनी मालवण पोलीस स्थानकात अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल केला होता.याप्रकरणी पोलिसांनी तपास सुरु केला होता. या तपासात मालवणातील होमगार्ड संतोष हिंदळेकर याला पोलीस स्थानकात बोलविण्यात आले. त्याचप्रमाणे तक्रारदार संध्या जामसंडेकर यांनाही बोलविण्यात आले. संबंधित संतोष हिंदळेकर याने आपल्याला ही दुचाकी आपल्या मानलेल्या बहिणीच्या नवऱ्याने दिली आहे, असे मालवण पोलिसांना सांगितल्याचे समजते. मालवण ठाण्याचे पोलीस हेडकॉन्स्टेबल कोकणी हे याबाबत अधिक तपास करीत आहेत. (प्रतिनिधी)दुचाकीला बनावट नंबरप्लेट लावलीमालवणातील दुचारी चोरी प्रकरणी होमगार्ड संतोष हिंदळेकर याच्या ताब्यातील दुचाकीची तपासणी केली असता ती जामसंडेकर यांच्या मालकीची असल्याचे स्पष्ट झाले. या दुचाकीचा मूळ नंबर बदलून त्याठिकाणी दुसरी बनावट नंबरप्लेट लावण्यात आली होती. या प्रकरणात पोलिसांनी संतोष हिंदळेकर याला ताब्यात घेतले.