शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
4
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
5
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
6
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
7
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
8
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
9
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
10
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
11
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
12
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
13
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
14
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
15
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
16
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
17
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
18
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
19
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
20
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
Daily Top 2Weekly Top 5

दोन तालुक्यांचे दाखले एकाच अधिकाऱ्याकडे

By admin | Updated: June 13, 2015 00:25 IST

निपटाऱ्यासाठी कसरत : जबाबदारी एकाकडेच

रत्नागिरी : विविध दाखल्यांवर सह्या करण्याची जबाबदारी उपविभागीय अधिकाऱ्यांकडे दिली असल्याने आता येथील अधिकाऱ्यांवर संगमेश्वर आणि रत्नागिरी या दोन तालुक्यांमधील दाखल्यांवर सह्या करण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. त्यामुळे या कार्यालयाच्या इतर कामांबरोबरच दाखल्यांचाही निपटारा करताना कसरत करावी लागत आहे.पूर्वी दाखल्यांवर सह्या करण्याची जबाबदारी जिल्हाधिकाऱ्यांनी विविध प्रांतांबरोबरच इतर उपजिल्हाधिकारी यांच्याकडेही दिली होती. प्रत्येक अधिकाऱ्याला वार ठरवून देण्यात आले होते. मात्र, तो अधिकारी रजेवर वा दौऱ्यावर असेल तर त्याच्या वाराला त्या दाखल्यांवर दुसरा अधिकारी सह्या करीत नसे. जबाबदारी झटकण्याचे काम सुरू होते. अन्य अधिकाऱ्याच्या कामाच्या दिवशीच्या दाखल्यावर मी का सही करू, अशी वृत्ती बळावली होती. यामुळे जनतेची कामे खोळंबून राहात होती. अशावेळी नागरिकांचे अनेक दाखले प्रलंबित राहू लागले होते. काही अधिकाऱ्यांकडूनच सह्यांचे काम वेळेवर होत नसल्याने हजारो दाखले रखडले होते. त्यामुळे नागरिकांमधून मोठ्या प्रमाणावर नाराजी व्यक्त केली जात होती.मात्र, आता हे काम उपविभागीय अधिकाऱ्यांकडे देण्यात आले आहे. या रत्नागिरी उपविभागीय कार्यालयांतर्गत रत्नागिरी आणि संगमेश्वर हे दोन तालुके येतात. सध्या बारावी आणि दहावीचे निकाल लागल्याने या मुलांना शैक्षणिक कामकाजासाठी दाखल्यांची गरज भासत आहे. या अधिकाऱ्यांकडे अधिवास, राष्ट्रीयत्व, जातीचे दाखले यांची जबाबदारी दिलेली आहे. बारावीचा निकाल लागल्यानंतर थोड्याच दिवसात दहावीचाही निकाल लागला आहे. त्यामुळे आता या विद्यार्थ्यांना पुढील प्रवेशासाठी आवश्यक असणारे दाखले मिळवण्यासाठी धडपड सुरू आहे. येथील उपविभागीय अधिकाऱ्यांकडे संगमेश्वर आणि रत्नागिरी तालुक्याची जबाबदारी आहे. त्यामुळे आता नियमित प्रशासकीय जबाबदारी सांभाळतानाच या दाखल्यांवर सह्या करण्याची जबाबदारी आली आहे. दौरे, विविध बैठका, दैनंदिन कामकाज आणि सध्या दाखल्यांचा भार सांभाळावा लागत असल्याने मोठीच कसरत करावी लागत आहे. दाखले देताना आवश्यक ते कागदपत्र तपासून त्यावर सह्या करावी लागत असल्याने दाखल्यांचे काम रेंगाळत आहे. त्यातच दाखल्यांसाठी आवश्यक असणारी कागदपत्र तपासून देताना काही कर्मचाऱ्यांकडून नागरिकांना नाहक त्रास दिला जात आहे. त्यामुळेही दाखले सह्यांसाठी जाताना अधिक कालावधी लागत आहे. त्यामुळे एकाच उपविभागीय अधिकाऱ्यावर सह्यांचा भार टाकण्याऐवजी इतर अधिकाऱ्यांकडे जबाबदारी दिल्यास दाखल्याचा निपटारा होईल, अशी प्रतिक्रिया व्यक्त होत आहे. (प्रतिनिधी)