शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
2
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
3
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
4
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
5
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
6
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
7
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
8
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
9
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
10
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
11
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
12
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
13
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
14
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
15
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
16
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
17
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
18
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
19
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
20
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
Daily Top 2Weekly Top 5

राजिवडा येथून दोन बहिणींचे अपहरण

By admin | Updated: July 16, 2017 23:57 IST

राजिवडा येथून दोन बहिणींचे अपहरण

लोकमत न्यूज नेटवर्करत्नागिरी : शहरातील राजिवडा परिसरात दोन सख्ख्या बहिणींचे अपहरण झाल्याच्या घटनेने खळबळ उडाली आहे. याप्रकरणी अज्ञाताविरोधात शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अपहरण झालेल्या तरुणींपैकी एक वीस वर्षीय, तर दुसरी १७ वर्षीय असल्याचे पोलिसांनी सांगितले.मिळालेल्या माहितीनुसार, हसीब अब्दुल हमीद फणसोपकर (४७, राजीवडा रत्नागिरी) यांची पत्नी व दोन मुली १४ जुलै रोजी रात्री जेवण करून टीव्ही पाहत बसल्या होत्या. वडील हसीब फणसोपकर हे लवकर झोपी गेले, तर आई मध्यरात्री दोन वाजेपर्यंत या मुलींसोबत टीव्ही पाहत होती. त्यानंतर या दोन्ही मुली वरच्या मजल्यावर झोपण्यासाठी गेल्या होत्या. त्यानंतर त्यांची आईही खालच्या खोलीत झोपी गेली.रविवारी पहाटे आईला जाग आली. सर्वप्रथम ती आपल्या मुलींना उठविण्यासाठी गेली. त्यावेळी तिच्या दोन्ही मुली तेथे नसल्याचे दिसून आले. त्यामुळे तिने पती हसीब फणसोपकर यांना उठवून सगळी हकिगत सांगितली. वडिलांनी परिसरात या मुलींचा शोध घेतला, परंतु त्या सापडल्या नाहीत. घरातील वापरण्यात येणारी मोबाईलची सीम कार्डेही गायब असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यामुळे त्यांनी तत्काळ शहर पोलीस ठाणे गाठून आपल्या मुलींचे अपहरण झाल्याची तक्रार दिली. त्यानुसार पोलिसांनी भारतीय दंड विधान कलम ३६३ नुसार अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.