शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

माकडतापाचे आणखी दोन बळी

By admin | Updated: March 29, 2017 23:36 IST

मृतांची संख्या आठ : साथीने थैमान घातल्याने परिसरात भीतीचे वातावरण

बांदा : बांदा परिसरात गेले काही दिवस माकडतापाने थैमान घातले असून, या तापाने बुधवारी आणखी दोघाजणांचा बळी घेतला आहे. बुधवारी सकाळी दीपाली दिलीप नाईक (वय ४५, रा. निगुडे-तेलीवाडी) व सूदन शंकर परब (४४, रा. बांदा-सटमटवाडी) यांचा माकडतापाने गोवा-बांबोळी येथे उपचारादरम्यान मृत्यू झाला. दोघांवर गोवा-बांबोळी येथे गेले काही दिवस उपचार सुरू होते. आतापर्यंत बांदा परिसरात माकडतापाने आठजणांना आपला जीव गमवावा लागला आहे.आतापर्यंत बांदा प्राथमिक आरोग्य केंद्रातून १८८ तापसरीच्या रुग्णांचे रक्त नमुने तपासणीसाठी पाठविले आहेत. त्यापैकी ६९ रुग्णांना माकडतापाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. तापसरीच्या रुग्णांमध्ये दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. बांदा प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कर्मचाऱ्यांसह अतिरिक्त ४ डॉक्टर, ५ आरोग्य कर्मचारी, ३ सुपरवायझर, ४ आरोग्यसेवक कार्यरत आहेत. मार्च महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून तापसरीच्या रुग्णांमध्ये घट झाली होती. मात्र, गेल्या आठ दिवसांपासून पुन्हा तापसरीच्या साथीने डोके वर काढले आहे. निगुडे-तेलीवाडी येथील दीपाली नाईक या गाळेल येथे माकडतापबाधित क्षेत्रात काजू गोळा करण्यासाठी जात असत. १२ मार्च रोजी त्यांना ताप आला होता. १३ मार्च रोजी त्यांना बांदा प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल केले होते. मात्र, त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत नसल्याने त्यांना आजुला (म्हापसा-गोवा) येथे उपचारासाठी दाखल केले होते. त्यांची प्रकृती अधिकच बिघडल्याने अखेर त्यांना बांबोळी रुग्णालयात हलविण्यात आले. तेथेही त्यांची प्रकृती उपचाराला साथ देत नव्हती. अखेर सतरा दिवसांच्या झुंजीनंतर बुधवारी सकाळी त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. त्यांचा मृत्यू माकडतापानेच झाला असल्याचा वैद्यकीय अहवाल प्राप्त झाला आहे. त्यांच्या पश्चात पती, मुलगा, मुलगी असा परिवार आहे. नाईक यांची आर्थिक स्थिती खूपच हलाखीची आहे. नाईक यांचे पतीही मोलमजुरीची कामे करतात. (प्रतिनिधी)