शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

दोन बाजारपेठा भररस्त्यावर

By admin | Updated: March 12, 2015 23:55 IST

वाहनचालकांना त्रास : दोडामार्ग तालुक्यातील समस्या--वार्तापत्र दोडामार्ग

वैभव साळकर - दोडामार्ग  दोडामार्ग आणि साटेली- भेडशी या तालुक्यातील दोनच मोठ्या बाजारपेठा आहेत. तालुक्यातील जनतेचा बाजारहाट याच दोन्ही बाजारपेठांतून होतो. शनिवार आणि रविवार हे या दोन्ही बाजारपेठांच्या आठवडा बाजारांचे दिवस. मात्र, दोन्ही आठवडा बाजारासाठी ग्रामपंचायतींनी आवश्यक ते ‘मार्केट’ उभे न केल्याने आठवडा बाजारादिवशी परगावाहून येणारे व्यापारी मुख्य राज्यमार्गावरच आपले ‘बस्तान’ मांडतात. यामुळे वाहतुकीचा मोठा खोळंबा होत असल्याचेच चित्र पहावयास मिळते. या राज्यमार्गाचा वापर करण्याचा ज्या वाहनचालकांचा हक्क आहे, त्यांना मात्र बाजारादिवशी जीव मुठीत धरून वाहने हाकावी लागतात. शिवाय मार्केटअभावी भाजी विके्रत्यांचा तर मोठा धिंगाणा असतो. बाजार संपला की टाकाऊ भाजी आणि भाजीचे करंडे दोन्ही बाजारपेठातील हमरस्त्यावरच टाकून ते काढता पाय घेतात. त्यामुळे मग नागरिकांना दुर्गंधी आणि त्यापासून उद्भवणाऱ्या ‘जर्जर’ आजारांना तोंड द्यावे लागते. तालुक्यातील अत्यंत महत्त्वाच्या अशा साटेली-भेडशी आणि दोडामार्ग या दोन्ही बाजारपेठेतील समस्या तेथील ग्रामपंचायत आणि लोकप्रतिनिधी यांनी निकालात काढणे नागरिकांच्या हिताचे ठरेल. दोडामार्ग तालुक्यातील तालुका ठिकाणचा दोडामार्ग आणि पूर्वकाळापासूनची साटेली- भेडशी या दोन्ही बाजारपेठा अत्यंत महत्त्वाच्या आहेत. दोन्ही बाजारपेठात शनिवार व रविवारी आठवडा बाजार भरतो. गेल्या अनेक वर्षांपासून या बाजारपेठांचा आठवडा बाजार भरत असतानाही ‘मार्केट’चा प्रश्न मात्र मार्गी लागलेला नाही. समस्यांवर मात करत नागरिकांना शेवटी ‘बाजारहाट’ करावीच लागते. पिंपळेश्वर देवस्थान(गांधी चौक) येथून दोडामार्गची बाजारपेठ चारही बाजूंनी विस्तारली आहे. तिलारी-गोवा, बांदा-आयी गांधी चौकातून चारही दिशांनी जाणाऱ्या हमरस्त्यांवर बाजारपेठ विस्तारली आहे खरी, मात्र दोडामार्गचा आठवडा बाजार हा आयी व तिलारी मार्गाच्या दुतर्फाच भरला जातो. दोडामार्गात रविवारी भरणाऱ्या आठवडा बाजारदिवशी मार्गावरून वाहने हाकणे आणि वाहने पार्क करणे यासाठी वाहनचालकांच्या नाकी दम येतात. कारण एरवी दरदिवशी दोडामार्ग गांधीचौक ते तिलारी रोडवर पंचायत समिती कार्यालयापर्यंत राज्यमार्गावर मोकळ्या जागेत मालवाहतूक, एस.टी. गाड्या आणि प्रवाशी वाहतूक करणारी सर्व वाहने तीन व सहा आसनी रिक्षा उभ्या असतात. मात्र, बाजारदिवशी जागाच नसल्याने त्या सर्वांना तेथून वाहने मिळेल त्या जागेत पार्क करावी लागतात. वाहनांची जागा व्यापारी बळकावतात. शेवटी नागरिकांनाच मिळेल तशी वाट काढत ‘बाजार’ करावा लागतो. साटेली-भेडशीतील स्थिती तर दोडामार्गपेक्षा बिकट आहे. तालुक्यातील एकूण ५९ गावांपैकी ३0 ते ३५ गावांचा बाजार याच बाजारपेठेतून होतो. सर्वांत जुनी बाजारपेठ अशी ओळख असलेल्या या बाजारपेठेची अवस्थाही आजघडीलाही पूर्वीसारखीच आहे. नियमित बाजारपेठेच्या रंगढंगात जरी बदल झाला असला तरी आठवडा बाजार पूर्वीच्या ढंगात भरतो. वरचा बाजार चर्च ते खालचा बाजार दामोदर सभागृह अशी साटेली- भेडशी असा विस्तारला आहे. मात्र, दोडामार्ग- तिलारी राज्यमार्गाच्या दुतर्फाच ही बाजारपेठ आहे. आठवडा बाजारासाठी दोडामार्गप्रमाणे साटेली-भेडशीतही स्वतंत्र बाजारपेठेची व्यवस्था नाही. परिणामी साटेली-भेडशीतही बाजारादिनी येणाऱ्या व्यावसायिक राज्यमार्गाच्या दुतर्फाच आपले बस्तान मांडतात. बाजारपेठांबाबत नाराजीबाजारात नागरिक आणि वाहनचालक यांना मोठी कसरत करावी लागते, तर व्यापारीही या कसरतीतून सुटलेले नाहीत. साटेली-भेडशी बाजारपेठेत रस्त्यांच्या गटारांअभावी पावसाचे बाजारपेठ आणि रस्त्यावर घुसणारे पाणी त्यांना नाकीदम आणते. नागरिकांना तर नाक मुरडत बाजार करावा लागतो. या ‘यातनामय’ प्रवासामुळे नागरिकांतून दोन्ही बाजारपेठांबाबत तीव्र नाराजी आहे.