शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठीवरून मविआत फूट? काँग्रेसला बोलावले नाही, आता ठाकरेंच्या मेळाव्याला शरद पवार जाणार नाहीत
2
शुबमन धमाका...; इंग्लंडमध्ये द्विशतक ठोकत केली विराटची बरोबरी; 'हे' मोठे विक्रम करत रचला इतिहास!
3
Shubman Gill Double Century : शुबमन गिलचं विक्रमी 'द्विशतक'; अशी कामगिरी करणारा पहिला भारतीय कॅप्टन
4
मोहम्मद शमी दरमहा देणार ४ लाखांची पोटगी; निर्णयावर Ex पत्नी हसीन जहाँ म्हणते- कायद्याचं राज्य आहे..!!
5
"हे दोघे एकत्र येणे म्हणजे, मराठी...; फक्त स्वार्थासाठी एकत्र येताहेत!" नारायण राणे यांचा एकाच वेळी दोन्ही ठाकरेंवर हल्लाबोल
6
Viral Video : पावसात पळत जाऊन दोरीवरचे कपडे काढण्याची गरजच नाही! 'हा' जुगाड सोशल मीडियावर व्हायरल
7
WTC मध्ये २००० धावांसह १०० पेक्षा अधिक विकेट्स! जडेजाच्या नावे झाला वर्ल्ड रेकॉर्ड
8
“शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करावी, त्यासाठी समिती नको”; विजय वडेट्टीवारांची सरकारकडे मागणी
9
थायलंडच्या निलंबित पंतप्रधान शिनावात्रा यांनी सत्ता वाचवण्यासाठी खेळला नवा 'डाव', नेमकं काय केलं?
10
डोक्यावर पदर घेतला नाही म्हणून पती चिडला, पत्नीचा राग लेकराला आपटून काढला! चिमुकल्याचा मृत्यू
11
"तो वाद मराठी-अमराठी नव्हता"; ठाण्यात शिवसैनिकाला झालेल्या मारहाणीवर आदित्य ठाकरेंचे स्पष्टीकरण
12
Smriti Irani : "मुलगा झाला नाही म्हणून आईला सोडावं लागलं घर"; स्मृती इराणींनी सांगितला 'तो' वाईट प्रसंग
13
त्रिभाषा समितीचे अध्यक्ष नरेंद्र जाधव यांनी स्पष्ट केली भूमिका; राज ठाकरेंबद्दल म्हणाले...
14
जगातील या 5 देशांमध्ये राहतात सर्वाधिक हिंदू! टॉप टेनमध्ये 3 मुस्लीम देशांचाही समावेश, चकित करणारी आहे आकडेवारी
15
दिशा सालियान प्रकरणी आदित्य ठाकरे स्पष्टच बोलले; म्हणाले, “गेल्या ५ वर्षांत ठराविक लोक...”
16
“धारावी पुनर्विकास की देवनार डम्पिंग डील? २,३६८ कोटींचा ‘कचरा प्रकल्प’ कोणाच्या फायद्याचा?”
17
लुटेरी दुल्हन! नवऱ्याला भाऊ बनवलं अन् दुसरं लग्न केलं; रोख रक्कम, दागिने घेऊन झाली पसार
18
एकाच ताटात किती जण जेवतात? शिवभोजन थाळी लाभार्थ्यांचा हा व्हिडीओ बघितला का?
19
आत्महत्या की हत्या? डॉक्टर महिलेच्या मृत्यू प्रकरणाची सखोल चौकशी करा- उपसभापती नीलम गोऱ्हे
20
पाकिस्तानी संघ भारतात येणार, आशिया कप खेळणार; केंद्र सरकारची परवानगी

दोनशे गावे, चार संरक्षक

By admin | Updated: August 30, 2015 22:48 IST

खेड तालुका : वनकर्मचारी विम्यापासून वंचित

श्रीकांत चाळके- खेड  --तालुक्यातील वन विभागांमध्ये काम करणाऱ्या अधिकाऱ्यांची संख्या फारच कमी आहे. खेड तालुक्यात २०० गावांतील वनांचे संरक्षण करण्याचे काम केवळ ४ वनसंरक्षक करीत आहेत. डोंगराळ असलेला हा तालुका भौगोलिकदृष्ट्या विस्तीर्ण असल्याने या ४ वनसंरक्षकांना विविध अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. एवढेच नव्हे तर वन्य प्राण्यांनी हल्ला केल्यास कर्मचाऱ्यांना विमाही मिळत नसल्याने कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.तालुक्यात १ वनरक्षक तब्बल ५० गावांतील वनांचे संरक्षण करीत आहे़ शिवाय वन विभागाखेरीज या वनसंरक्षकांना मालकी क्षेत्रातही बरेचसे काम करावे लागते. काही परिमंडळे, परिक्षेत्र आणि नियतक्षेत्रामध्ये काम करावे लागते.़ तालुक्यातील या कर्मचाऱ्यांना तर दापोली आणि चिपळूण येथील परिक्षेत्र कार्यालयाअंतर्गतही काम करावे लागते. कामाचा अतिरिक्त बोजा या कर्मचाऱ्यांना आणि अधिकाऱ्यांना सहन करावा लागत आहे. अनेक गावांमध्ये मालकी वनक्षेत्र मोठ्या प्रमाणात असल्याने कामाचा अतिरिक्त बोजा वाढतो. या मालकी वनक्षेत्रामध्येही वन्य प्राण्यांचा वावर असल्याने सातत्याने गावांच्या संपर्कात राहावे लागते. अशावेळी दररोज ६० किमीपेक्षा जास्त अंतरावर देखरेख ठेवावी लागते. याकरिता वाहन गरजेचे आहे. या विभागामध्ये खेड तालुक्यासाठी एकही वाहन नाही. वनसंरक्षकांना स्वत:च्या दुचाकीवरूनच घटनास्थळी जावे लागते. विविध प्रकारच्या अपुऱ्या साधनसामुग्रीअभावी या वनसंरक्षकांना वन्यप्राणी हाताळण्याचे काम करावे लागते. बिबट्या विहिरीत पडणे, त्याची शिकार होणे आणि तो फासकीत अडकणे अशा विविध घटनांच्या वेळी प्रथम वनसंरक्षकांना पोेहोचवावे लागते. कामाचा व्याप पाहता या विभागाला तालुकानिहाय चारचाकी वाहन देणे अनिवार्य झाले आहे. वन्यप्राण्यांकडून कर्मचाऱ्यांवर हल्ला झाल्यास तसेच शासकीय कामानिमित्त प्रवास झाल्यास या प्रवासादरम्यान अपघात झाल्यास या कर्मचाऱ्यांना कोणतीही मदत मिळत नाही. तशी तरतूदही नाही. या विविध असुविधांनी ग्रस्त असलेल्या या वनसंरक्षकांना सातत्याने असहकार्याची आणि असुरक्षिततेची जाणीव होत असल्याने त्यांचे मनोबलही खचत आहे. वन्यप्राण्यांपासून मानवी जीविताचे आणि वृक्षवेलीचे संरक्षण करण्याचे काम अहोरात्र करणाऱ्या या कर्मचाऱ्यांना आणि अधिकाऱ्यांना शासनाने आवश्यक अशा सुविधा देण्याची मागणी होत आहे.अतिरिक्त कामांचाही बोजाया वनरक्षकांना नियतक्षेत्रामध्ये शासकीय वनक्षेत्रात वृक्ष संरक्षण करणे, अतिक्रमण होऊ न देणे, पशुसंवर्धनाची कामे करणे, वन्यप्राण्यांची शिकार होऊ न देणे, विनापरवाना लाकूडतोड आणि वाहतूक होऊ न देणे, सतत गस्त घालणे, वृक्षतोड परवाना चौकशी, मूल्यांकन चौकशी, नोटीसा पोहोच करणे, पशुधन हत्येप्रकरणी चौकशी करणे, मनुष्यावर हल्लाप्रकरणी चौकशी करणे, पीक नुकसानाची चौकशी करणे आणि पंचनामा करणे आणि ते संबंधित कार्यालयात सादर करणे, पर्यायी वृक्षलागवड करणे, वनपालाला तक्रार अर्ज करून चौकशी करणे, गुन्ह्याकामी चौकशी करणे, नुकसानभरपाईचे धनादेश पोहोच करणे, आवश्यक त्यावेळी पोलीस स्थानकात संपर्क साधणे शिवाय विविध प्रसंगांमध्ये कौटुुंबिक कलह निर्माण झाल्यास सुवर्णमध्य काढणे, अशी कामे करावी लागतात.